Posts

आबा... सुपेकर आबा

Image
Supekar Aba - All parts (Including the last one The 5th) आबा, सुपेकर आबा (भाग-१) त्यांना 'आबा' म्हणालो कारण त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हा अन्वया (माझी माझी साडे तीन वर्षाची मुलगी) होती कडेवर, मला म्हणाले अरे तुझ्याबद्दल खूप ऐकले आई कडून, आज भेट झाली… आनंद झाला :) ३ महिन्यापुर्वीच आलेत आमच्या '११२ श्रीयोग' मध्ये भाडेकरू म्हणून, घरी मुलगा, मुलगी आणि बायको,  मुळचे परभणीचे! त्यामुळे भाषेला मस्त तिखट फोडणी, मजाच त्यांच्याची गप्पा मारायच्या म्हणजे! जुनी गाणी, हिंदुस्तानी क्लासिकल, अध्यात्म… आणि त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी… बास! मस्त खरपूस खमंग थालीपीठच जणू हातात आणि साथीला त्यांच्या हावभावांची सोलकढी! त्यांचं बोलून पोट भरायचं नाही आणि माझं ऐकून! मोजून एकवीस दिवस असेन, त्यात मधले २-३ दिवस सोडले तर रोज सकाळी / दुपारी / संध्याकाळी भेट व्हायचीच. ह्या २१ दिवसांत माझा सकाळचा ठरलेला पोग्राम होता ह्यावेळी घरी, आई आणि मी चालायला जायचो आल्यावर मस्त चहा पोहे झाले की हातात लांब हिरवा पाइप घेऊन झाडांना पाणी घालणे, वरच्या मजल्यावरून आबा हाक माराणे, चहा झाला का? विचारणे वगैरे… मग मी ...

'सुका मेवा'

Image
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष ! तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही, वय साठ असून तरुणाला लाजवेल असे, त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही! राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात, सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू. (माझ्या वडलांच्या बालमित्र आनंद गानू ह्यांचे चुलत बंधू) त्यांच्या घरी भाड्याने एका खोलीत राहतात. घरात, घरात म्हणजे त्या एका खोलीत त्यांची बायको, पलंगावरच... म्हणजे त्यांना चालता फिरता यायचं नाही, जे काही करायचं ते सर्व बेड वरच. त्या दोघांना जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा लहान होतो... त्यामुळे त्यांच्या ह्या परिस्थितीचा फारसा 'सीरियसनेस' नव्हता. मला ते आठवतात ते त्यांच्या 'सुका मेवा' साठी! मी जेव्हा जेव्हा गानू कुटुंबीयांकडे जायचो, तेव्हा तेव्हा परदेशी काकांच्या दरवाज्या पाशी आलो की, "समीर, ये बेटा..." असा आवाज यायचा, माझे चपला/बूट काढून झाले की पाय थेट त्यांच्या घराच्या फरशीवर, मला बघून 'जिलेबी' मधल्या त्या जाहिरातीतल्या मुलाच्या चेहऱ्यावर जसे हावभाव अ...

तहान

त तहा तहान तहान तहान कधी आईच्या प्रेमाची कधी बापाच्या शाब्बाशीची कधी आजी-आजोबांच्या लाडाची कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची कधी प्रेयसीच्या झलकेची कधी बायकोच्या मिठीची कधी मुलांच्या ओढीची कधी मिटते कधी वाढते कधी लहान कधी महान तहान तहान तहान तहान म्हणजे तडफड तहान म्हणजे वणवण तहान म्हणजे कोरड तहान अगदी कहर तहान नाही संपत तहान ठेवते जिवंत तहान मिळवे पाणी तहान चाळवे भूक तहान करवे तमाशा तहान एक आशा तहान हीच भक्ती तहान हाच परमेश्वर तहान कधी पुण्य तहान कधी पाप तहान शिकवी तहान घडवी तहान तहान तहान तहा त #सशुश्रीके | १५ जानेवारी २०१५

डबल दंड!

Image
२००५ च्या वेळची गोष्ट, मी सांताक्रूझला हॉटेल 'ह्यात' समोर एका एड अजेंसी मध्ये कामाला होतो, दर शुक्रवारी रात्री/बेरात्री (कामाच्या लोड जसा असेल तसा, कधी कधी शनिवारी पहाटे/सकाळी ही निघालेलो आहे) निघायचो पुण्याला, माझा फर्स्ट क्लास पास होता लोकलचा, किंग्सर्कल - सांताक्रूज - किंग्सर्कल, पण नेमका शुक्रवारी लोच्या व्हायचा, तिकिटाला रांगेत कोण उभे राहणार, आणि मग दादर पर्यंत जाण्यासाठी फर्स्टकलास उतरून सेकण्ड क्लास ला कोण जाणार! म्हणजे दोन गुन्हे एका मागो माग एक, पहिला म्हणजे तब्बल तीन स्टेशन्स विना तिकीट आणि तो ही फर्स्टक्लास मध्ये! २-३ वेळेला केला हा प्रकार, पण अपराध्याची भावना घे/ठेऊनच, बिंदास नाहीच. पण मग तो दिवस आलाच, मस्त वेळेत निघालेलो कामं आटपून, माहीम येताच साक्षात टीसी आला डब्यात, मला विचारणी केली, मी गपचूप पास दाखवला 'काही न बोलता.' टीसी ने ही 'काही न बोलता' दादर आल्यावर हात धरून मला प्लॅटफॉर्म वर आणले. माझ्याकडे जेमतेम पुण्याला बसनी जाता येईल इतकेच पैसे, मनात म्हणालो झालं! आता आज कसला जातोय मी पुण्यात 'वेळेत' जरा तोंड पडलेलं पाहून म्हणाला...

आपला 'फील्लमी' #सशुश्रीके

Image
'इश्क'सिनेमा लागलाय टीव्हीवर, ९७चा मूवी...  तेव्हाच जुदाई, परदेस, विरासत, यशवंत, चाची४२०, औझार, दिल तो पागल है वगैरे सिनेमे आलेले... खूप सिनेमे पाहिले, तेव्हा अरुण / विशाल थिएटर मध्ये स्टॉल चे १० आणि बाल्कनीचे १५ रुपये तिकीट असे आणि सायकल स्टँडचं २रुपये, हातात जास्तीचे पैसे असतील तर त्याचे शेपू समोसे आणि अजून पैसे असतील तर माझा/थम्सअप/लिमका... माझा एक सिनियर मित्र होता उमेश म्हणून, तो नसला तर मी एकटाच सिनेमा पाहायला जायचो, नवी सांगावी पासून ते दापोडी सायकल वरून, मध्ये रेल्वे फाटक लागायचे, ते ओलांडले की बाजारात खरे शेंगदाणे घ्यायचे खिशात कोंबायचे... की थेटरात खादाडगिरी सुरु! लोकांना कळलं की म्हणायचे एकटा काय जातोस सिनेमाला!? मला काहीच गैर वाटायचं नाही, नंतर मुंबईला जॉब लागला.. तिथे ही एकटाच पहायला जायचो, राहायला किंग्सर्कल.. चालत चालत सायनला जायचो, हम-तुम, मैंने प्यार क्यू किया, इक्बाल हे २००५चे सिनेमे मी तिथे पाहिले. मग दुबईत एकटा सिनेमा पाहायची वेळ अगदी १-२वेळाच आली, पण एकटा सिनेमा पहायची मजा आणि दुःख वेगळंच... सिनेमा चांगला असो नसो, थिएटर मध्ये बसायचा आनंद ...

नवीन वर्ष

नवीन वर्षात काय नवीन असणारे!  प्रत्येक दिवस नवीनच असतो ना!!  काय कौतुक राव ह्या नवं वर्षाचं,  पण बहुतेक सगळ्यांना नवं वर्षाची नवी रेजोलुयशनं चालू करायची असतात तर काहींना मागच्या वर्षी केलेली रेजल्युशनांना 'जान्दो' करत अजून काहीतरी तीर मारायचे असतात! कोणी डायरीचं पाहिलं पान, तर कोणी जिमचा दरवाजा उघडतो,  कोणी एखादं व्यसन बंद करतो तर कोणी 'जंकफूड' हे सर्व एक आठवड्या पासून एक महिन्यापर्यंत लोक्स टिकवतात,  मग फेब्रुवारी उगवतो, उत्साह हळू हळू मावळत जात असतो,  मे पर्यंत ७०% लोकांच्या नकळत ते सर्व 'रजोल्युशन'चे समीकरण साफ बदलले/विसरलेले असतात. मग नोव्हेम्बर येतो... मग "बघता बघता संपलं की रे वर्ष! कसल्ले सपासप जातात राव दिवस" असे संवाद सगळीकडून ऐकायला मिळतात. मग बारावा महिना उजाडतो मावळायला!  आणि मी असाच काहीसा स्टेटस अपडेट टाईप करतो. #सशुश्रीके | ३१ डिसेम्बर २०१५

फार्गो सीजन टू

Image
फार्गो सीजन टू फार्गो नावाचा एक इंग्रजी चित्रपट येऊन गेलाय, त्या चित्रपटावरच आधारित एक मालिकाही सुरु झाली, एक सर्वसाधारण माणूस परिस्थिती मुळे कसा अपराधी होतो ह्याची उत्तम मांडणी केली आहे, ब्लॅक कॉमेडी अप्रतिम! असो, त्याच मालिकेचा दुसरा सीजन आलाय ह्या वर्षी, मागच्याच आठवड्यात दहावा आणि शेवटचा एपिसोड पाहिला, कथानक आहे मिनेसोटा ह्या अमेरिकन भागातील दोन माफीयांच्या भांडणाचं, त्या भांडणात खूप व्यक्तीचित्र त्यांची कहाणी अगदी सखोलीने मांडली आहे. फार्गो सीजन 2 जास्त आवडला कारण 1979 चा अमेरिकन काळ ज्या पद्धतीने मांडलाय... तोडच नाही! त्यावेळचे कपडे, केशरचना, गाड्या, इमारती अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या पर्यंत सर्वच बाबतीत 1979! 👍 म्हणजेच 'आर्ट डिरेक्षन' बाबतीत फार्गो टीमला मी 10/10 देईन! ह्या सीजन मध्ये अजून एक जमेची बाजू म्हणजे 'सस्पेन्स', होय पहिल्या भागात ठेवलेला एक विषय मध्ये मध्ये उकरत थेट शेवटच्या भागात डोके काढतो! त्याच काळातली विविध गाणी वापरून अगदी उपयुक्त ठिकाणी त्यांचा वापर करून दिग्दर्शकानी उत्तम कामगिरी केली आहे, बारकाव्यांबद्दल सांगायचं झालं ...