आपला 'फील्लमी' #सशुश्रीके

'इश्क'सिनेमा लागलाय टीव्हीवर, ९७चा मूवी... 
तेव्हाच जुदाई, परदेस, विरासत, यशवंत, चाची४२०, औझार, दिल तो पागल है वगैरे सिनेमे आलेले... खूप सिनेमे पाहिले, तेव्हा अरुण / विशाल थिएटर मध्ये स्टॉल चे १० आणि बाल्कनीचे १५ रुपये तिकीट असे आणि सायकल स्टँडचं २रुपये, हातात जास्तीचे पैसे असतील तर त्याचे शेपू समोसे आणि अजून पैसे असतील तर माझा/थम्सअप/लिमका... माझा एक सिनियर मित्र होता उमेश म्हणून, तो नसला तर मी एकटाच सिनेमा पाहायला जायचो, नवी सांगावी पासून ते दापोडी सायकल वरून, मध्ये रेल्वे फाटक लागायचे, ते ओलांडले की बाजारात खरे शेंगदाणे घ्यायचे खिशात कोंबायचे... की थेटरात खादाडगिरी सुरु!

लोकांना कळलं की म्हणायचे एकटा काय जातोस सिनेमाला!? मला काहीच गैर वाटायचं नाही, नंतर मुंबईला जॉब लागला.. तिथे ही एकटाच पहायला जायचो, राहायला किंग्सर्कल.. चालत चालत सायनला जायचो, हम-तुम, मैंने प्यार क्यू किया, इक्बाल हे २००५चे सिनेमे मी तिथे पाहिले.

मग दुबईत एकटा सिनेमा पाहायची वेळ अगदी १-२वेळाच आली, पण एकटा सिनेमा पहायची मजा आणि दुःख वेगळंच...

सिनेमा चांगला असो नसो, थिएटर मध्ये बसायचा आनंद जास्त असायचा, दुःख इतकंच होतं की पुण्यात असताना सायकल पंचर व्हायची त्यात डोकं फिरायचं आणि मुंबईत असताना पायतोड करायला लागायची, आणि पावसाळ्यात तर अजून चिडचिड.

कोणी सोबतीला नसेल तर निराश न होता एकटा सिनेमा पाहायचं सोडलं नाही! कारण ह्या जगात सिनेमा थेटरात बघण्यासारखं काही नाही...

आपला 'फील्लमी' #सशुश्रीके











Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!