तहान


तहा
तहान
तहान तहान
कधी आईच्या प्रेमाची
कधी बापाच्या शाब्बाशीची
कधी आजी-आजोबांच्या लाडाची
कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची
कधी प्रेयसीच्या झलकेची
कधी बायकोच्या मिठीची
कधी मुलांच्या ओढीची
कधी मिटते कधी वाढते
कधी लहान कधी महान
तहान तहान तहान
तहान म्हणजे तडफड
तहान म्हणजे वणवण
तहान म्हणजे कोरड
तहान अगदी कहर
तहान नाही संपत
तहान ठेवते जिवंत
तहान मिळवे पाणी
तहान चाळवे भूक
तहान करवे तमाशा
तहान एक आशा
तहान हीच भक्ती
तहान हाच परमेश्वर
तहान कधी पुण्य
तहान कधी पाप
तहान शिकवी
तहान घडवी
तहान तहान
तहान
तहा
#सशुश्रीके | १५ जानेवारी २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!