Posts

ऐकता ही येईल असा एक सिनेमा!

Image
तर काय ना आज सकाळी ऑफिसला जाताना गाणी ऐकायचा मूड नव्हता गाणी ऐकायचा मूड नसला की मी कथाकथन ऐकतो, पूलं/वपु वगैरे पण आज तो पण मूड नव्हता. एक कल्पना सुचली, काही हिंदी चित्रपट आहेत आवडते ज्याचे संवाद न संवाद पाठ आहेत. त्यातलाच एक म्हणजे 'आनंद' ( Anand movie ) आपल्या सर्वांच्या आवडत्या गुलज़ारांचा, ऋषिकेश मुखर्जी साहेबांचा... एक न एक सीन प्युअर गोल्ड राव! तर मी काय केलं... ब्लूटूथ ला लावला फोन न सुरु केला मूवी... टायटल पासून राजेश खन्ना - रमेश देव च्या घरी राहायला येई पर्यंतचे संवाद ऐकले.. ऑफिस ला पोहोचे पर्यंत. सगळे प्रसंग रस्त्यावर ... सिग्नलवर जणू प्रोजेक्ट होत होते! अगदी जेव्हा पहिल्यांदा १९९० च्या आसपास पाहिलेला हा चित्रपट, मावशी कडे राहायचो मी तेव्हा, दूरदर्शन वर लागलेला दुपारी, जेवणाची वेळ होती, माझी मावशी स्वभावाला जामच कडक, तिने रागावून बघीतलं तरी तळहाताला घाम येईल असली कडक! जाम घाबरायचो मी तीला... हा पिक्चर लागला आहे हे बघताच तिने रिमोट बाजूला ठेवला आणि म्हणाली समीर हा सिनेमा बघ... आयुष्यात कुठल्याही बाईला रडताना पाहिलं नव्हतं, त्यात माझ्या मावशी सारखी...

Second track

आपण मनातल्या मनात विचार करताना बोलत असतो ना काहीतरी, त्या संवादाला सेकंड ट्रॅक ... म्हणजेच आपला दुसरा आवाज म्हणतात म्हणे. लिहिताना पण येत असतो, किंवा काही विचार करताना. पण माझ्या बाबतीत आता हा आवाज केटेगराईजड झाला आहे आजकाल, उदाहणार्थ, गाडीत असताना राग / आनंद नुसार मित्रांच्या आवाजात 'सेकंड ट्रॅक' येतो ऐकू! एखाद्या ठरावीक संगीताबद्दल ज्या व्यक्तीला कळतं त्या व्यक्तीच्या आवाजात दाद देतो! असे बरेच आवाज भिन्न भिन्न विषयानुसार सेव्हड झालेत 'सेकंड ट्रॅक' च्या यादीत. मज्जा येते, व्हॉइस ओव्हर टाकल्याचा फील...   काय काय रसायन दडलेलं असतं बघा मेंदूत! #सशुश्रीके । १७ एप्रिल २०१९

पाणी चालूच, नळ वाहतोय बदाबदा!

परवा एका हॉटेलात गेलेलो, जेवून झाल्यावर हात धुवायला बेसिनला... माझे हात धुवुन झाले रुमाल काढला चेहरा पुसला, समोर एक तरुण त्याचे हात धुवून झाल्यावर चेहरा आरश्यात बघत टाइम पास करत होता, १०-२०सेकंद झाली त्याचा टाइम पास सुरूच... पाणी चालूच, नळ वाहतोय बदाबदा! १: तेव्हा माझ्यातला क्रांतिकारी त्याच्या जवळ गेला,  बेसिनच्या त्याच नळावर त्याचं डोकं इतकं जोरात आपटलं की रक्त वाहू लागले नाकातून,  म्हणालो वाहू दे मदत येई पर्यंत. २: तेव्हा माझ्यातला गांधी नळाजवळ गेला,  नळ बंद केला, हसत हसत म्हणालो...  "नळ बंद करायला विसरलात का आपण!?" ३: माझ्यातला मी पाहात बसलो...  आणि निघून गेलो! आजकाल 'मी' असलेले खूप आहेत जगात, जास्त करून आपल्या अवती भवती! आणि आपण म्हणतो आपण बदलल्या शिवाय देश कसा बदलेल! लाज वाटत आहे लिहिताना, पुढच्या वेळी असं काही घडलं तर क्रमांक एक करण्याची कितीही इच्छा असली तरी आवाक्यात असलेला क्रमांक २नक्की निवडीन. 🙏🏽 मी #सशुश्रीके

अभिनंदन... अभिनंदन!

Image
वो रुके थे लिफ्ट के लिये, मुझे लगी थी चाय की प्यास... जा राहा था चुपचाप पॅन्ट्री मै, पीछे से आई हलकी सी आवाज! हुई खुजली उनको... पुछा बडी दिलदारी से हमको! वो - भाई कैसे हो मै - बस, खुश हू! वो - अभिनंदन... अभिनंदन! मै - हा मेरा खत्म हुआ टेन्शन, आप अपनी सुनाओ. ☺ लिफ्ट खुली, जनाब चल दिये! हम मन ही मन मे बहोत हस लिये! #TrueStory 🙏🏽 #सशुश्रीके 

आनंदी गोपाळ

Image
खरं तर हल्ली लिहायचा खूप कंटाळा येतो! म्हणजे आळस वाढलाय असो... वीकेंड ला अमृता (बायको) , सूर(मैत्रीण) आणि नीलम (मित्र) ) गेलेले ह्या मूवी ला, मी आणि आई (शुभदा) अन्वया(मुलगी माझी) साठी थांबलो, मला पण जाता आलं असतं पण मी इतका 'कीन' नव्हतो, का कुणास ठाऊक, रिव्हुज भारी होते, गाणी पण छान तरी बघायचा का नाही ह्यावर स्वतःशीच दुमत होत होतं, पण मग घरच्या लोकांनीच "बघ रे, मस्तय... सुंदर अभिनय... मिनिमम मेकअप" असा घरगुती रिव्ह्यू दिल्या नंतर राहावे ना, ऑफिसातून ६:३०ला निघून ७:१५ला घरी आलो, येताना अमृताला माझं आणि आईचं तिकीट काढायला लावलं, मग संध्याकाळचं ऑफिसचं ट्राफिक कापत १०मिनिटाच्या रोड वर ३०मिनीट काढत पोचलो, ७:५०च्या शो ला ८:०५ला, शेजारच्या एका अगडबम्ब देहाला "कधी सुरु झाला हो?*" असं विचारलं त्यानेही अगदी कौजुअली "काही जास्त नाही, जस्ट इन्ट्रोडक्शन मिस केलत... ३/४मिनिटेच झाली, जास्त नाही" असं सांगितलं न मला जरा बरं वाटलं. 😂 आता चित्रपटा बद्दल... मी अभ्यास करून, गूगल वर नावं वगैरे शोधून कलाकार किंवा इतर मंडळींची नावं लिहीत रिव्ह्...

आठवण

Image
झोपच येत नव्हती, आठवणी खोदत होतो... आणि चक्क पैसे सापडले! १०/२०/२५/५० पैसे काही रुपये... पुरलेली नाणी! आक्षीतल्या (गावातील) दाराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला शोभेची झाडे होती त्यातल्या एका झाडाच्या मुळांपाशी पुरुन ठेवलेली नाणी दिसली थेट!, डोळे चमकले... आजी कडे अरेंज / लिमलेट गोळ्या, गोळे, कोल्ड्रिंक साठी सारखेच पैसे मागायचो... त्यापेक्षा हातात उरलेल्या (उरवलेल्या) चिल्लरचा फायदा तरी करून घेऊ, झाडाला पैसे लागतील... तेव्हढाच कमावता होईन मी! सुट्टी संपल्यावर आक्षीच्या अंगणाचे गेट ओलांडल्यावर तेच गेट पुन्हा कधी दिसेल ह्या विचारात मुंबईला परतायचो... नंतरची सुट्टी कधी अर्ध्या वर्षाने कधी वर्षाने येणार... आक्षीतलं ते झाड! त्याबद्दल विसर पडलेला, सुट्टी नेहमी प्रमाणे आक्षीत... एकदा जेवताना अचानक... आजीने एका रुमालाला गाठ मारून ठेवलेली जड वस्तू माझ्या समोर आणून ठेवली! मी हसलो, ती पण हसली... "असे पैसे... जमिनीत पुरून मिळाले असते तर!" आठवण आहे ही, आठवणी मौल्यवान असतात, आठवणी पुरलेल्या असतात, खोदून का होईना सापडतात, कधी आजी कधी कोणी दुसरं! आणि हो... माझं नेहमीचं आवडतं वाक...

सच्या आकलेकर.

Image
'सच्या'... सचिन ह्या नावाला बहुतेक करून सर्वच जण सच्याच् संबोधतात, तसच ह्याला पण... अभिनव कलामहाविद्यालय पाषाण मधील आमचा २ वर्ष सीनियर खेळाडू... मस्त काम... पेंटिंग्स कड़क मारायचा आणि अजुन ही मारतो! व्हॉलीबॉल, क्रिकेट मध्ये नेहमी मैदानावर हजर... बुटका पण बऱ्यापैकी बळकट शरीर... बोलायला कोल्हापुरी टच... अन हसला की नक्कीच आकाष दिसायचं त्याला... आणि त्याला काय दिसतय वरती म्हणून समोरचा पण वर बघणार... मग काय, जोक असला काय न नसला काय, आकाश बघायला मजा यायची! अजूनही येते... 'अस्सय होय' हे त्याचं ठरलेलं उत्तर! थोडक्यात काय, येडगाव ला जाऊन पेढं खाणारा हा! लै बाराचा, हाहाहा! खुप धमाल हो... ह्यांच्या ग्रुप पण सही होता... सगळे एक से एक अवली... अणि हो पोरी पण! लफडं केलेलं / होतं एक, पण काय... पुढे भगाकार गुणाकार जमले नाहीत, मग काय अपेक्षे प्रमाणं गणित चुकलं म्हणा... असच काहीतरी! पण आता छान बायको आहे... न एक पोराचा बाप आहे, नोकरी सोडून स्वतःचा छोटा सेटअप आहे... साइड बाय साइड पेंटिंग्स पण ओढतोय, टच वुड... एकंदरीत मस्त चाललै गड्याचं! रडत असतो की काय तेच ...