माय नेम इज जॉर्ज...
माय नेम इज जॉर्ज... (भाग-१)
कांसच्या त्या निमुळत्या गल्यांमधुन कधी स्वतःच्या तर कधी कैमेऱ्याच्या नजरेतून मी अखंड पायतोड करत होतो,
आजचा दिवस शेवटचा होता,
उद्याची फ्लाइट,
जितके लवकर निघता येईल तितक्या लवकर रूम सोडलेली,
सकाळी ९.४५ वाजले असतील, यूरोपात उन्हाळ्यातला दिवस मोठा...
त्यामुळे बऱ्यापैकी सूर्य आग सोडत होता पण कमाल अशी की ती आग कांसला येई पर्यन्त जणू गायब होत होती!

असो... गेल्या ५ दिवसात गेल्या ४ वर्षात केली नसेन इतकी पायतोड केली होती, त्यामुळे पायांनी माझ्या शरीराला प्रत्येक पावलावर 'मी किती महत्वाचा अवयव आहे' ह्याची जाणीव करवुन द्यायचे ठरवले होते! त्यात त्या गल्ल्यांयामधुन मध्येच एक ठिकाण असे आले जिथे न संपणाऱ्या पायऱ्या!... आधीच पायांचे १२ वाजलेले, त्यात १३वा मजला, हो हो संपतच नव्हत्या, पण माझा कैमरा आणि मी, जणू तो माझ्या अंगाचाच एक भाग. दोघे न थकता आपापली कामे करत होतो.
डोळे मिचकावतो आपण, तसे कैमऱ्याचे शटर पाडत होतो, तेवढ्यात एक म्हातारा,अती म्हातारा नाही पण नक्कीच ६०ठी ओलांडलेला असावा, मला पाहुन म्हणाला की कुठला कैमरा आहे तुझा!? मी म्हणालो 'हा निकॉन आहे' निकॉन एकता क्षणीच तो म्हणाला की मी पाहिले आहे खुप 'गूगल' वर की कैननचे कैमरे चांगले आहेत फ़ास्ट आहेत, मी म्हणालो... हो हो मान्य आहे पण मला निकॉनचे कलर्स खुप आवडतात, म्हणून मी निकॉन ला प्राधान्य देतो, मग त्यानी मला त्याचं नाव सांगितले, 'माय नेम इज जॉर्ज...' म्हणाला माझ्या नावानी पैनारामिओ ह्या वेबसाइट वर सर्च कर, माझे फोटोज बघ, हे ऐकल्यावर मी डिटेल्स लिहून घेतले मोबाइलवर, माझं कार्डही दीले त्याला, हे सगळ् बोलता बोलता आम्ही पायऱ्या चढत होतो, मी फोटो काढत होतो, तो ही मी जी फ्रेम टिप्तोय ती फ्रेम किती चांगली आहे आणि सेम फ्रेम त्यानिही टिपल्ये वगैरे! मग म्हणाला, असो.. मित्रा तू कर मस्त फोटोग्राफी कदाचित आपण भेटुच इथेच असलो आजुबाजुला तर, मी ही त्याला 'परत भेटू' करत... पुढच्या पायऱ्या चढू लागलो.
(क्रमशः) #सशुश्रीके । ३० जून २०१५
जॉर्ज ची गूगल+ प्रोफाइल लिंक- http://plus.google.com/
माय नेम इज जॉर्ज... (भाग-२)
दार्जिलिंगसारखा परिसर आणि खुप सुंदर फुलेपाने, अप्रतिम घरे. काहींवर ग्राफिटी, वळणा वळणाला सुंदर वेली, फ्रेंच कला अगदी ठासुन भरलेली, मी त्या किल्ला वजा म्यूजियमच्या समोरच्या तटबंदी सारख्या उंच भागात गेलो, अजुन पायऱ्या! काही पर्याय नव्हता.. पुढे एक सीगल पक्षीही होता, तो काही उडायचे नाव घेईना, त्याला ही कैद केले मग कैमेऱ्यात, त्या भागातुन काय सुंदर दिसत होते कान्स, तेवढ्यात जॉर्ज परत दिसला, 'वाह आपण परत भेटलो' आम्ही एकमेकांकडे बघुन असे हसलो जसे काही खुप वर्षांपासून ओळख वगैरे आहे!
त्याने मला सांगितले की तो आता अमुक अमुक ठिकाणी जाणार आहे, मी म्हणालो की तुला हरकत नसेल तर मी ही येतो तुझ्याबरोबर, तो म्हणाला हो हो... का नहीं! अश्या प्रकारे आम्ही आमचा प्रवास चालू केला, त्याला अट घातली की ६वाजेपर्यंत मला परत जायचे आहे, ७ला अवार्ड सेरेमनी असेल त्यामुळे ७च्या आत मला 'पाले दे फेस्टीवाल'ला पोहोचायचे आहे! तो म्हणाला हो, काही हरकत नाही, आम्ही पायऱ्या उतरत बस पकडायला निघालो, मला फ्रेंच तर काय ओ का ठो कळत नाही, ह्याला जेमतेम इंग्लिश त्यापेक्षाही बेताचं फ्रेंच जमतं, त्यामुळे येण्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 'बॉंजूर' (नमस्कार) आणि काही मदत/विकत/बोलून झाल्यावर वगैरे 'मख्सी' (धन्यवाद) संवाद चालू होते.
बस स्टॉप येइ पर्यन्त विषय काय!? मग मी त्याचा इंटरव्यू घ्यायला सुरुवात केली! वय काय - ६४, मी म्हणालो माझ्या बरोबर दुप्पट वयाचा आहेस तू! बर मग तुला मुले किती - १मुलगा आहे जो बर्लिनला असतो, छोटी कामें करतो सेररिअल्स मधून वगैरे, दिसतो कधी कधी टीवी वर, पण काही ख़ास नाही. मी म्हणालो, होईल होईल, कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही! असो, मग मी विचारलं त्याला भेटतोस की नाही, म्हणाला मला फॅमिली आवडत नाही, मला फिरायला आवडतं... लग्न झाले आहे त्याचे, त्याला ३वर्षाची लहान मुलगी आहे! मी म्हणालो वाह... मला पण ३वर्षाची मुलगी आहे! पण हे ऐकून आश्चर्य वाटलं की जॉर्जला त्या वेळी नातीचं नाव आठवेना! म्हणाला आत्ता पर्यंत एकदाच भेटलोय नातीला... मला ते ऐकून कसंतरीच झालं! मग मी विचारलं, बायको कुठाय आत्ता तुझी, म्हणतो ती घरी असते तीला फिरायला जमत नाही, (खुप नंतर बोलण्यातुन कळालं की त्यानी लग्न कधी कलेच नाही सद्ध्या जी त्याची 'गर्लफ्रेंड' तीला ५ मुले आणि ती काय काय करतात वगैरे सांगितले) हे सर्व ऐकून मी नुसता डोळ्यांच्या बाव्हल्या उचलण्याखेरीज काही करू शकत नव्हतो!
(क्रमशः) #सशुश्रीके । २जुलै २०१५
(क्रमशः) #सशुश्रीके । २जुलै २०१५
माय नेम इज जॉर्ज... (भाग-३)
तसे पाहिले तर तो खुप असे शब्द वापरत होता जे इंग्लिश मध्ये फार कमी किंवा वेगळ्या गोष्टींकारीता वापरल्या जातात, उदाहणार्थ... बिग साठी तो ग्रैंड शब्द वापरायचा... सुरुवातीला नाही कळालं, पण ३-४वेळा एखादा शब्द ठराविक वाक्यात वापरला की समजायला लागते! अजुन एक शब्द... पेरिसो! म्हणजे त्याला पैराडाइज (स्वर्ग) म्हणायचे होते. 'ओह्ह ला ला'... आणि 'ओह्ह नो नो' हे तर त्याच्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी असायचेच! आणि त्याचे हावभाव बोलताना हातांची हालचाल, हे सर्व मला लिहायचे आहे ह्याची जाणीव ठेऊन माझ्या डोळ्यांची लेंस भरभर फोकस करत होती. शक्य तितके साठवले जॉर्जला ह्या हिरव्या डोळ्यांनी, त्याची मिशी ही यूनिक होती, जुन्या चित्रपटांच्या नायकांसरखी... राज कपूरची असायची ना अगदी तशीच.
असो, बस साठी बसस्टॉप वर आम्ही थांबलो, तिथे मला त्यानी २०नम्बर ची बस आपल्याला जिथे जायचे आहे तिथे जाते (अक्ख्या दिवसात त्यानी आरामात १५-२०जागांची नावे सांगितली असणार, पण मला अजिबात आठवत नाहीत, आणि हे असे मी लिहिणार ह्याचा दृष्टान्त ही मला तेव्हाच झालेला) बस मध्ये चढल्यावर आम्हाला समोरासमोर जागा मिळाली, तो बस जाते त्या दिशेला बसला, मी उलटा, त्याचा बाजुचा माणूस... जो विंडो सीट वर बसलेला तो जेव्हा निघाला, तेव्हा मला जॉर्ज म्हणतो 'तुला इथे बसायचे आहे का!?' मी आळशीपणे मान हलावुन नकार दीला, तर म्हणतो... मला असे उलटे बसवत नाही! मी ऐकल्यावर हसलो. २-३मिनिटे अशीच शांत गेली.
मग तोच म्हणाला... आपण येताना ट्रेननी जाउ! कारण बस फार घूमून फिरून जाते, ट्रेननी आपण १०मिनिटांत पोहोचु! मी मान हलवली, तेवढ्यात आमचा स्टॉप आला, खाली उतरताच आम्ही ट्रेन स्टेशनच्या डीशेनी निघायला लागलो, कारण वेळापत्रक बघायचे होते, आणि तसा वेळेचा अंदाज घेऊन पुढचा प्रोग्राम ठरवायचा होता.
स्टेशन वर गेलो, इन्फ़ॉर्मेशन सेंटर काय तर अक्ख ओफ़्फ़िसच बंद होतं, तिथे एका टीवी वर आम्हाला जी ट्रेन हवी होती ती आज चालू नाही असे त्याला कळले, मला म्हणाला जॉर्ज, आपल्याला जातानाही बसनीच जावे लागणार! मी म्हणालो ठीक आहे, काही हरकत नाही, ६नाही तर निदान ७च्या आत तरी आपण पोहचुच! जॉर्ज म्हणाला, हो हो नक्कीच!
आम्ही स्टेशन हून परत आलो, वाटेत येताना एक आइसक्रीम पार्लर होते, तिथे आम्ही थांबलो, जॉर्जनी त्याचा स्मार्ट नसलेला फोन काढला, आणि त्याचं बोलणं सुरु झालं, मी त्याच्या बैगेत पहिलेले ओरेंजिनि ज्यूस घेतले, काय रिफ्रेशिंग होते, संत्राच्या पाकळ्या आणि जरासा सोडा असलेले कोल्ड्रिंक! झकास फ्रेश झालो, त्याचा फोन संपल्यावर त्यानी आइसस्क्रीम घेतले, मग मी बजुलाच अस्लेल्या फळांच्या दुकानातुन अर्धा किलो चेर्रीज घेतल्या, आम्ही आमचा उर्वरित प्रवास चालू केला, त्याला म्हणालो... तुला फळे आवडत नाहीत का!? म्हणतो आवडतात, पण ह्या उन्हात नाही आवडत! मी चटकन बोललो, हे उन म्हणजे आमच्या दुबैकरांसाठी काहीच नाही, दुबईत अत्ता ४५-५०°वगैरे तापमान असेल आणि ते ही आर्दतेसह! जॉर्ज भुवया उंच करून हसायला लागला, दुबईचं नाव काढताच त्याने दुबईबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली, दुबईतले शेख, जगतले सर्वात उंच/मोठे/लांब वगैरे रिकॉर्ड मोडायची धावपळ, अश्या प्रश्नावलींची बैग त्यानी उघडली, आणि मी ती बैग छान उलगडून परत लावली ही!
समधानाच्या किल्लीसकट ती प्रश्नाची बैग बाजूला ठेवली. रस्ता जसा वळाला तसे आम्ही ही एका नव्या विषया कडे वळलो.
(क्रमश:)
#सशुश्रीके । ४जुलै २०१५
माय नेम इज जॉर्ज... (भाग-४)
दुपारचे २वाजले असतील आम्ही चालायला लागलो, जॉर्ज म्हणाला आपण एका ठिकाणी जातोय जिथे पर्यटक कमीच जात असतील, एक किल्ला आहे ज्याचे रूपांतर एका प्रायवेट हॉटेलात केले आहे, पण फारच कमी लोकांना ते माहीत आहे, तिथून फार छान दिसते कान्स! बोलता बोलता त्याचा वेग वाढत होता, आणि माझी धाप! ५दिवसांचा शीण जाणवत होता, एके ठिकाणी मी शेवटी थांबलो, जवळच बेंच होता, तिथे माझी बैग अक्षरशः आपटली आणि म्हणालो जॉर्ज जरा थांबू आपण! तो हसत थांबला... माझ्या बैगत असलेला नैपकिन काढून मी चेहरा मान पुसायला लागलो, टोपी आणि सनग्लासेसही काढले, उन्हाळा जरी तापट नसला तरी अखंड चालत असल्यानी मी घमानी श्रीमंत झालेलो, ते बघुन जॉर्ज म्हणाला तुला किती घाम येतोय, बरा आहेस ना!? मी म्हणालो,हो हो मला जरा सामान्य माणसांपेक्षा जास्तच घाम येतो! मी बैगत नैपकिन ठेवला आणि बेंच वर ठेवलेला कैमरा गॉगल आणि हैट घेतली... त्याला हैट आणि गॉगल बद्दल विचारले, जॉर्ज तू इतका फिरतोस मग एखादी कैप का नाही वापरात, त्याचे उत्तर ऐकून जाम आश्चर्य वाटले मला!
ही अशी व्हाइट कैप आणि गोगल्स वगैरे फक्त श्रीमंत लोक घालतात. माझ्या पर्सनेलिटीला ते शोभत नाही! मला काय बोलावें कळे ना, तरी माझा प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवला, म्हणालो अरे तू असा दिवसभर उन्हात फीरतोस तर जरा प्रोटेक्शन म्हणून कैप वगैरे वापरायला काय हरकत आहे! त्यानी स्मितहास्य दीले, मी समजून गेलो.
आता आम्ही एका छोट्या रस्त्यावर अलेलो, किल्ल्याचा मुख्य दरवाजा ओलांडून आत शिरलेलो... वाट निमुळती होत जात होती, पुढे पुढे फरश्या असलेला एकाच माणसाने जाता येईल अशी पायवाट आली, आजंबाजुला झाडांमुळे भर दुपारी अंधार. पक्षी, रातकीड्यांचे आणि आमच्या पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या पाल्यापचोळयाचे आवाज, मी बैगेतला नैपकिन परत काढला आणि मानेभोवती गुंडाळला, जॉर्ज मध्येच मागे वळून आजुबाजूच्या झाडांच्या जाती, त्यांचे महत्व सांगत होता... माझं ह्म्म्म ह्म्म्म चल्लेलं, नागमोडि वळणातून चढ वाढत चल्लेला, आणि माझी धापही. जॉर्ज मात्र वीशीतल्या तरुणा सरखा वीना अडचण चालत होता!
शेवटी एक मोठे झाड दिसले, त्या झाडापलीकडचा सीन अप्रतिम होता! अक्खा कान्सचा परिसर दिसत होता मला त्या जागेवारून! माझ्या तोंडातून सहजपणे 'वॉव' आले! ते ऐकून जॉर्जला ही समाधान मिळाले, म्हणतो हे काहीच नाही अजुन वरती जायचे आहे, तिथून अजुन छान दृश्य दिसेल! हे ऐकून माझ्याकडे जणू पंचर झालेली सायकल आहे पण पुढेच एक पंचर काढणारा माझी वाट बघतोय असला काहीसा प्रसंग घडल्या वर कशी मनःस्थीती होईल अगदी तशीच माझी झालेली!
(क्रमशः)
#सशुश्रीके । ४ जुलै २०१५
माय नेम इज जॉर्ज... (भाग-५)
ते थकलेलं पण उत्साहाची लाच घेऊन टवटवीत झालेले शरीर घेऊन मी जॉर्जच्या मागे निघालो, अजुन पायऱ्या... अजुन उंच! माझ्या पायाला फोड आलेले, हळू हळू माझा वेग, वेग कसला, चालण्याची पद्धत गमतीशीर व्हायला लागली होती.
मानेला बांधलेला नैपकिन, हातात कैमरा, घामाघुम शरीर, थकलेले पाय... आणि समोर मैलोंमील हिरवा श्रीमंत परिसर! गोल्फ कोर्स काय, फ़ार्म होउससच काय, मधेच ट्रेन... लहान मुलांचा खेळच जणू, त्याच्या पुढे नीळेक्षार पाणी असलेला समुद्र, समुद्रकाठावरची लोकांची 'सन्टैन'साठीची गर्दी! काही बेटं.
त्या बेटांकडे बोट दाखवत जॉर्ज म्हणाला 'मी दर वर्षी त्या बेटांवर जातो, त्या बेटांवर जायला सारख्या बोटी अस्तात. अप्रतीम जागा आहे, आणि अजून भरपूर माहिती, अगदी हातांच्या ओंजळीत न मावणारी माहिती मला तो देत होता आणि मी ती फोटोग्राफी करता करता नकळत साठवत होतो. तेवढ्यात जॉर्ज म्हणाला आपण एकटे नाही आहोत इथे, कोणीतरी येतय! त्या नैसर्गिक शांततेत त्याला पायांचे आणि बोलण्याचे आवाज आलेले, एक ३ जण आम्ही पार केलेले अंतर कापत आलेले! एक म्हातारे जोडपे + एक म्हातारा, त्यांना पाहताच जॉर्ज नी 'बोन्जूर' केले त्यांनी ही तसाच प्रतिसाद दिला, मी स्मितहास्य दिले.
तेवढ्यात एक फुलपाखरू आले, त्याला टिपण्यात जॉर्ज मग्न होता, एका जागी न बसण्याच्या त्याच्या गुणधार्मावरून जॉर्ज नाराज होता, माझ्या हातात ५२-२००ची लेन्स होती त्यामुळे लांबून ही मी काही छायाचित्रे टिपू शकत होतो, जोर्ज्ला म्हणालो, चिंता नको मी काढलेत फोटो तुला नक्की पाठवीन, मला तुझा इमेल द्यायला विसरू नकोस!
मग आमची बडबड सुरु झाली परत, एका खाडाचे खोड दाखवून म्हणाला की ह्या झाडांचा उपयोग वाइनच्या कॉक साठी केला जातो… कारण ते आवरण मऊ असते आणि त्यामुळे ते कसे उपयुक्य ठरते वगैरे. परतताना माझ्या पायाची हालत आधी पेक्षा वाईट झालेली, त्याला सहज म्हणालो कि 'चढण्यापेक्षा उतरणे जास्त अवघड असते' तो म्हणाला 'मला उतरायला आवडतं उलट!' माझ्या कपाळाच्या आठळ्या प्रत्येक पावलागणिक वाढत होत्या!
पंक्चर झालेली माझी 'सायकल' आता रस्त्यावर आलेली, मध्येच ट्रेन स्टेशन लागले, आता मात्र तिथे इंफोरमेशन कौंटर चालू होते पण इंफोरमेशन स्क्रीन वर स्पष्ट काळत होते की परतीला लागणारी ट्रेन त्यादिवसाकरीता रद्द झालेली आहे. जॉर्ज म्हणाला, दुर्दैवानी आपल्याला बसनीच जावे लागेल. त्यासाठी अजून १५-२० मिनिटे तरी चालावे लागेल! मी हसतमुखाने 'च्येल्लेंज एक्सेप्तेड' करून माझी 'सायकल' रेटायला लागलो!
(क्रमशः)
#सशुश्रीके । ४ जुलै २०१५
माय नेम इज जॉर्ज... (भाग-६)
बीच च्या बाजूचा रस्ता होता जोर्ज पुढे मी मागे, आता मात्र मी खूपच थकलेलो… वेग कमी झालेला, जॉर्ज वळून म्हणाला 'तुला बाथरूमला जायचे आहे का? मला जायचय!' मी म्हणालो 'नाही मला गरज वाटत नाहीये!' त्यांनी आश्चर्य व्यक्त केले म्हणाला 'ईतके ज्यूस पिऊन ही तुला बाथरूम ला जायचे नाही कमाल आहे!' आम्ही जवळच्या एका बीच मॉल मध्ये बाथरूम आहे का ते बघायला गेलो, 'नो लक' करत आम्ही पुढे चालायला लागलो.
जरा पुढे गेल्यावर मी कंटाळून हातातला कॅमेरा ब्यागेत टाकला, मनात म्हणालो काही छान दिसले फोटो काढण्यालायक तर मोबाइल च्या कॅमेऱ्यातून काढू, तितक्यात एक ब्रिज आला, ३-४ मुलं… बहुतेक ब्रिटीश असावीत, त्यांच्या अक्क्सेंट वरून जाणवत होते! त्यातला एक "मी ब्रिज वरून पाण्यात उडी मारतो', दुसरा म्हणतो 'मारून दाखवतोच' हे सगळे बघून जॉर्ज थोडा काळजीत पडला असावा! म्हणाला 'मी असतो तर उडी नाही मारणार, मला त्या पाण्यात दगड दिसतायत, नशीब खराब असेल आणि डोके वगैरे आपटले तर मारायचा कोणी!…" चालत चालत मागे वळत वळत पहात होता तो, ब्रिज संपला… त्यानी विषय सोडला, ती मुलं तिथेच टाईम पास करत बोलत उभी होती. जॉर्जनी त्यांचा विषय सोडला, म्हणाला 'मी जरा फ्रेंच वागतोय मला माफ कर, एका झाडा मागे जाउन मी सु सु करणार आहे' मी हसत हसत त्याला जाण्याची खूण केली, मला पण लागलेली पण धरून ठेवण्याचा निर्णय घेतला! मनात म्हणालो नको परदेशात अडचणीत यायला नको त्या कारणासाठी, जॉर्ज हसत्मुखी परत आला. आमचा तो शेवटचा वॉक सुरू झाला.
आता डावीकडे मुख्य रस्ता आणि उजवीकडे नीळाक्षार समुद्र आणि अर्धनग्न सनटैन साठी पसरलेल्या मुली/बायका दिसायला लागल्या, मी हा अनुभव कांसला आल्या आल्या ३र्या दिवशीच घेतलेला, जॉर्ज म्हणाला 'तुला ह्या कल्चर बद्दल काय वाटतं… म्हणजे हे बिंदास टोप्लेस बीच वर असलेल्या मुली ह्यांबद्दल!' हे ऐकून मलाच आश्चर्य वाटले जॉर्जचे… जॉर्ज नक्की स्वीत्झर्लंड चा आहे की नारायण पेठी असा काहीसा गमतीशीर प्रश्न मला पडला! मी म्हणालो "मी जेव्हा दुबईत आलो तेव्हा आजू बाजूला फेरारी, लेम्बोर्घीनी, पोर्शे सारख्या गाड्याबाघुन वेडा झालेलो! पहिले १-२ आठवडे माझे त्या गाड्यांना बघण्यातच गेले, माझेही काहीसे तसेच झाले इथे येउन, पण आता काही विशेष वाटत नाही!" हे ऐकल्यावर तो म्हणाला… 'युरोपात हे सामान्य आहे, पण फ्रांस मध्ये हे अतीसामान्य आहे!' आणि कॅमेरा काढून बीचचे फोटो काढायला लागला.
जॉर्ज वळून म्हणाला, "तू तर खूपच हळू चालायला लागलायस! ते लाल खडक बघतोयस… तिथ पर्यंत चालायला लागेल अजून, माफ कर मित्रा मला वाटले जवळ असेल पण अजून १० मिनिटे, बस!' मी लंगडत लंगडत चालणे चालू ठेवले! ती १० मिनिटे काहीच संवाद झाला नाही!
अखेर 'ते' लाल खडक आले, तिथे जॉर्जने फोटो काढले, मी ही ४-५ फोटो घेतले मोबाइल वरून, ब्यागेतून कॅमेरा काढून फोटो काढण्याची ताकत नव्हती, जवळच एक छोटा भोगदा होता ट्रेन ट्रैक ओलांडण्यासाठीचा, तो पार करून आम्ही एका गर्डन मध्ये घुसलो, उजवीकडेच एक बाथरूम होते, मला जॉर्ज म्हणाला… 'तूला जाउन यायचे असेल तर जा, मी इथे बाकावर बसलोय' मी जाउन आलो, त्या गार्डन मध्ये मुलं खेळत होती, त्यांच्या आया त्यांना खेळवत होत्या, प्रसन्न वातावरण होते!
संध्याकाळचे पाच वाजले असतील, गार्डनच्या मधोमध एक छोटे फाउंटेन होते, फक्त २ मांडया आणि त्या मांडयांमधून पाणी पडतंय असं काहीतरी 'अनयुजूअल' फाउंटेन होते ते! ते बघून जॉर्ज म्हणाला 'हे फ्रेंच आर्ट आहे म्हणे!… विचित्रच जरा! तुटलय की असच आहे देवास ठाऊक!' मी हसायला लागलो, मस्त वाटत होते पण… मी शूज काढले, मोजे काढले आणि त्या थंड गवतावर पाय ठेवले, समोरच फाउंटेनचे पाणी होते, मी जॉर्ज ला विचारले, 'त्या फाउंटेन मध्ये पाय सोडून बसलो तर काही प्रोब्लेम नाही ना येणार!?' जॉर्ज म्हणाला 'अरे बिंदास!' मी लगेच जीन्स घुडग्यापर्यंत खेचून जिथे झाडांची सावली पडल्ये अश्या ठिकाणी पाय सोडून १मिनिट बसलो पाण्यात! जॉर्ज मला पाहून हसत होता, मला पाण्यातून पाय बाहेर काढवतच नव्हते! पाय पूर्ण बुडवता ही येत नव्हते, आधीच उजव्या बाजूची जीन्स ओली झालेली, कसाबसे मनाविरुद्ध पाय बाहेर काढून अनवाणी आलो बेंच पाशी. ब्यागेत्ल्या टोवेलनी पाय कोरडे केले, आणि चला निघू म्हणत… मुख्य रस्ता शोधत आम्ही गार्डन बाहेर पडलो!
(क्रमशः)
#सशुश्रीके । ८ जुलै २०१५
माय नेम इज जॉर्ज... (भाग-७)
गार्डन मधून बाहेर पडताच आमच्या समोरून एक बस गेली, पण धावत पळत जाऊन पकडायला जॉर्जबऱ्यापैकी म्हातारा आणि मी 'टेम्परेरी' म्हातारा झालेलो! आम्ही एकमकांकडे 'हेल्पलेस' चेहऱ्यांची देवाणघेवाण करत शांत पणे बस-स्टॉप वर जाऊन उभे राहिलो.
तेवढ्यात एक अप्रतिम जुन्या 'मस्क्युलर' गाड्यांचा ताफा आला! दणदणीत आवाज, एकसेएक रंग संगती असलेल्या, मध्येच दुचाकीही होत्या, माझ्या मनानी फोटो काढायला सुरुवात केली, बैगेतला कैमरा 'मला बाहेर काढ...मला बाहेर काढ!' असे बोम्बलत असताना ही मी दुर्लक्ष केले, डोळ्यात साठवून घेतले सगळे, कारण कैमरा काढण्याच्या नादात मला जे घडतय त्याचा एक सेकंद ही वाया घालवायचा नव्हता (अनुभवाचे बोल) असो... आता लिहिताना जसे घडले, तसेच्या तसे सांगतोय, अगदी 180° पापणी न बंद करता अक्खा ताफा स्कैन केला, ६०-७०रीच्या दशकातल्या जुन्या तगड्या गड्यांची जणू परेड माझ्यासाठी! जॉर्ज ही माझ्यासारखाच हे सर्व पहात होता. सिग्नल हिरवा झाला, आवाज परत वाढला, पापण्या बंद केल्या, झालेली चित्रफीत एकदा परत 'प्ले' करून पाहिली, आनंद झाला.
तीतक्यात जॉर्ज म्हणाला, आपण जरासे लवकर आलो असतो तर 'ती'बस मिळाली असती, मी म्हणालो 'जो होता है अच्छे के लिए होता है, काल मी रात्री मित्रांबरोबर ओल्डटाउन एरियात रात्री गेलो नसतो तर मला सकाळी तोच एरिया पहायची इच्छा झाली नसती, आणि मी तुला त्याच एरियात भेटलोही नसतो आणि खुप काही मिस झाले असते!' हे ऐकून तो म्हणाला, 'हो हो, बरोबर आहे मित्रा, पुढच्या वेळी येशील तेव्हा नक्की कळव, तसा छान प्लान करू!' मी ही 'थंब्स-अप' करून परत रस्त्याकडे पाहायला लागलो, कारण ह्या सर्व संभाषणात अजुन एक बस गेली असती, "बस आली" जॉर्ज हसत म्हणाला की "ही बस आपल्या दोघांकरीता चालेल!" मी ते ऐकून खुप खुश झालो, कारण 'नजर ना लगे इस दिन को' अश्या काही भावना झालेल्या माझ्या त्या क्षणी, उगाच शेवटच्या टप्प्यात चुकीच्या बस मध्ये बसणे, किंवा चुकीच्या ठिकाणी उतरणे वगैरे 'निगेटिव' विचार माझ्या मनात डोकाउ पहात होते.
दोघेही बस मध्ये चढलो, त्यानी त्याचे टिकिट घेतले, मी माझे, दीड यूरो होते टिकिट... बाकीचे खर्च बघता दीड यूरो फारच स्वस्त वाटत होते, अहो इथे कोक किंवा ज्यूस वगैरेची किम्मत २यूरो आणि पाणी ही तेवढ्यालाच म्हणजे तुलना करणेच फालतू, मग त्यामानाने दीड यूरो मधला प्रवास म्हणजे जवळ जवळ फुकट प्रवास असल्यासरखे वाटले!
बस मध्ये सकाळी बऱ्यापैकी कमी गर्दी होती, आता संध्याकाळ झालेली, गर्दी होती बस मध्ये पण आम्ही चढलो तिथे बरेच लोकं उतरले ही त्यामुळे आम्हाला बुड टेकवायला जागा मिळाली, पण लांब-लांब, त्यामुळे जास्त बडबड करता आली नाही, बस होती मस्त, मोठ्या खिडक्या, छप्परलाही मोठी काच त्यामुळे झाडी, इमरती बघायला खुप मजा येत होती! एका एमारतीवर प्रचंड मोठा चार्ली चैप्लिन आणि त्याच्या बरोबर एक मुलगा रंगवलेला, आणि नेमकी सिग्नल वर बस थांबल्या मुळे मी मोबाइल वरून झूम करून वगैरे फोटो घेत होतो. हे सर्व बस मधली मंडळी कौतुकनी(बहुदा) पहात होती, जॉर्ज पण आजुबाजूच्या दुनियेत मग्न झालेला.
शेवटी कान्सचा स्टॉप आला, जॉर्ज माझ्या खुर्ची जवळ आला, म्हणाला 'मी इथे उतरतो, तू पुढच्या स्टॉप वर उतर, तेवढेच कमी चालायला लागेल तुला' हे ऐकून वाइट वाटलं आणि बरं ही, वाइट अश्यासाठी की आता आयुष्यात पुन्हा भेटेल की नाही हा मनुष्य, शक्यता फार कमीच आणि बरं वाटायचं कारण म्हणजे पुढच्या स्टॉप वर उतरल्यानी कमी चालायला लागणार ह्याचे!
जॉर्ज बाहेर गेला, बाहेर गर्दी होती बऱ्यापैकी, त्याचा हात एखाद्या सेलीब्रेटीने प्रेक्षकांना केल्यासरखा दिसला... तो दिसलाच नाही, बस ने वेग घेतला. मी मात्र तिथेच होतो. अजूनही मी तिथेच आहे. वेळ जाते, लोकं जातात, मनाची स्थिती मात्र बदलत नाही! त्याला वेळ लागतो, पण मी खुश आहे, जॉर्ज सारख्या तरुण म्हाताऱ्या माणसाला पाहुन आयुष्यात कधीच थाकायचं नसतं... प्रवास करायचा असतो संपवायचा नसतो! अश्या काही विचारांची मंडई झाली डोक्यात, नकळत पाणी आले डोळ्यात.
असो... त्यानी करून दीलेली ओळख कायम लक्षात राहील, शब्द काही असे होते. "माय नेम इज जॉर्ज... यू कैन फाइंड मी ऑन गूगल!"
#सशुश्रीके
माय नेम इज जॉर्ज... (भाग-१,२,३,४,५,६ आणि ७)
http://sashushreeke.blogspot.com/2015/06/blog-post_30.html

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment