मैगी आठवणींतली
मैगी आठवणींतली...
तसं अगदी पहिली मैगी कधी खाल्ली आठवत नाही, हट्ट करून खाल्ली जायची हे आठवतय! मग एकटं रहायची वेळ आली की आईच घरी मैगी पैकेट्स ठेवायची, (किंवा मी ठेवायला लावायचो) नंतर कॉलेजच्या असाइनमेंट करताना मध्येच अचानक भूक लागली की सो कॉल्ड २मिंटाची मैगी ६मिनट ढवळुन थंड होऊन गिचकट होण्या आधी संपवायची! नंतर नुसती मैगी खायचा कंटाळा यायला लागला.. टॉमेटो, कांदा, जीरं, मटार थोडं कच्चे तेल मारून खायचो, त्यावर मस्त कोथींबीर! शेफ वगैरे झाल्यासारखं वाटायचं.
मग शिमला कुल्लू मनालीला गेलेलो, तिथे कुफ्री नावाच्या ठिकाणी खाल्लेली आठवत्ये मैगी, मस्त धुकं होते, १२-१३° वगैरे तापमान असेल आणि तिथे मैगीचे २-३स्टॉल्स होते! मैगीचा दीवाना वगैरे नसलो तरी तो मौसम आणि मैगी फैन माझी बायकोमुळे मी पण मैगी व्होरप्ली! गरमागरम वाफाळलेला तो बाउल आणि रम्य परिसर... बेस्ट कॉम्बो होता!
मग परत वेळ आली एकटे जगायची, मुंबईत २वर्ष काढली तेव्हा नाइलाज म्हणून अधुन मधून मैगी खायचो!
मग दुबइत आलो... मैगीचा वैताग आलेलाच, त्यात ईथे मसाला फ्लेवर मैगी मिळायचे नाही! इथले फेल्वर्स म्हणजे करी, चिकन आणि चीज. मग मी 'टॉप रॅम्मन' घ्यायचो.
नाइलाज नाही पण, बायकोला आवडते मैगी त्यामुळे घरी स्टॉक असतोच, त्यामुळे आयुष्यात महिन्यातून एकदा तरी मैगी पोटात जायचीच!
आता २०-२५ वर्षानंतर जे काही हे मैगी प्रकरण जन्माला आलय त्यात काही 'सरप्राइज फ्याक्टर' नाहीये! लोकांना माहीती आहेच की मैगी इज नॉट गुड फॉर हेल्थ, कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केल्यास त्याचा दुष्परिणाम होणारच, मग ती गोष्ट कुठलीही असो, वाइट किंवा चांगली! त्यात मैगी आधिपासून बदनाम असल्यानी मोठी गदा पडली आहे.
असो... मैगीमुळे खुप आठवणींना उजाळा मिळतो ही एक महत्वाची बाजू! अजुनही माझ्या आयुष्यात एक पारले-जी बिस्किट पुडा सोडता कुठल्याच पैकेज फूड मध्ये इतकी इमोशनल ऐट्टेचमेंट नाही जितकी मैगी मध्ये.
#सशुश्रीके | ५ जून २०१५
Comments
Post a Comment