सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…


"घ्या कादंबरी मस्त
पहा तरी हातात घेऊन
सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…"

आणि पुढे बरच काही सांगत होता आणि विकत होता एक 'राज ठाकरे' सारखा दिसणारा माणूस, मी नेमका मोबाइलवरच होतो तेव्हा, संध्याकाळची ट्रेन होती, पुणे-मुंबई.
त्याचं ते 'Advertising' ऐकून खूप लोकांचे कान त्याने आकर्षले असणार ह्यात वाद नाही, आईने त्याला हात केला, नेमाडेंचा 'हिंदू' पासून इनामदारांच 'राउ' अशी १०-१२ पुस्तकांना कडेवर घेऊन लोकांना तो आवाहन करत होता… "पहा तरी हातात घेऊन… पैसे नाही हो पडत बघायला! घ्या घ्या… वाचन वाढवा!"

आईने 'राउ' घेतलं हातात, मी म्हणालो आईला हळूच "आई हे ओरिजिनल नाहीये…" आणि हेच त्याला ही सांगितलं, तो म्हणाला अहो हेच आहे ओरिजिनल, झेरोक्स वालं पण असतं! पण सध्या नाहीये माझ्याकडे!" मी किंमत विचारली, "अडीचशे फक्त!" मी मनात विचार केला की आता काय ह्याचाशी हुज्जत घालून उपयोग! ह्या प्रिंटींगच्या क्षेत्रात्लाच मी, मला काय हा अम्जाउन सांगतोय! पण असो… आईने भाव करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मी अडीचशे त्याला देऊ केले.


"घ्या कादंबरी मस्त
पहा तरी हातात घेऊन
सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…"

त्याचं हे बडबडणं पुढच्या डब्यात चालू झालं!

काय पण म्हणा… पूर्ण वाक्य आठवत नाहीत पुढची पण दिल खुश करून टाकलं त्यांनी त्याच्या ह्या कवितेनी!

#सशुश्रीके । २ जुन २०१६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...