तू झोप...

अंगाई गाते हं...
तू झोप...
जा स्वप्नांच्या दुनियेत...

भीज पावसात, खेळ चिखलात,
मार उड्या गाद्यांवर, कर उद्योग नको ते,
पहा कार्टून्स दिवसभर, खा चॉकलेट्टं न बिस्किट्टं,
पी कोल्ड्रिंक न आंबट ढाण ताक,
चोख ते पेप्सीकोले,
काले खट्टे, वाळा न आरींज गोळे,
बघ टीवी डोळांच्या काचा होई पर्यंत,
ऎक ती धांगड-धिंगा गाणी,
फीर त्या भर उन्हात अनवाणी,
उशीरा झोप, उशीरा उठ
उठ आता तरी उठ,
उठ की घालू कंबरड्यात लाथ?

आई... आई पाचच मिनटं!
अजून माझी बॅटिंग यायच्ये,
बॉल हरवला की आलोच!

अरे!

डोळे उघडले...
आता ऑफिस
आता चहा कॉफी
आता ट्राफिक आणि दगदग
आता बॉस आणि प्रेजेंटशन
आता क्लाएंट आणि मीटिंग्स
आता फायली आणि कॅलक्युलेटर

पण,

'अंगाई' पासून...
'उठ रे बाळा'
ऐकण्यासाठी तो गळा...
मागे वळून पळा...
असेल तोच लळा


अंगाई गाते हं...
तू झोप...


#सशुश्रीके | १७ ऑगस्ट २०१६ | ०१.५५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...