'फ्रीज ची चावी!'
'फ्रीज ची चावी!'
नचिकेत… नची... काका… नचिकेत आहे का! हळूच २इंच फट ठेऊन उघडलेल्या दरवाज्याच्या फटीतून नचीकेतचा डोळा दिसला, आत लावलेल्या सेफटी चैन मुळे त्याला बाहेर येता येत नव्हातं, मी हळूच म्हणालो, येतोस का खेळायला! तो दबक्या आवाजात म्हणाला 'हो, येतो येतो!'मी मग आपला पायर्यांमध्ये चेंडू उडवत बसलो, नचिकेत आलाच उड्या मारत.
आज जरा मूड खेळण्यापेक्षा भटकायचा होता, २-३ ची वेळ म्हणजेच मी माझी 'निळी' दुपार आज वेगळ्या रंगात रंगायला तयार होतो, डोक्यात खुराफतींची मांडियाळी. मी नचिकेत ला म्हणालो तू खाली जाऊन थांब मी आलोच!
मी सांगितलेला ऐकायचा बिचारा कारण मी दादा ना? मी ५वीत आणि तो २रीत! मी खाली आलो, आमची लुनी होती, इतरांपेक्षा उत्तम कंडीशन वाली! मस्त ऑफ व्हाईट + रेड, चावी लावली, पेंडल फिरवलं टूरटूर सुरू, वळून पाहिले, नचिकेतला बसायची खुण केली.
पार्किंग मधून रस्त्यावर… मग मेन रस्ता, मोडेल कोलोनी चा चौक आला! आणि मोकळा रस्ता चित्तरंजन वाटीकेचा!मस्त दुपारचं उन,प्रचंड मोठी गुलमोहराची झाडं... त्यांच्यातून सावली उन्हाचा खेळ करत 'चल मेरी लुना' ची जाहिरातच जणू! आणि त्या सुंदर रस्त्यावर एक स्कूटरला ओव्हरटेक करत, राजेश खन्नाचं 'चला जाता हू…' टाइप्स! अचानक ती स्कूटर आली ना समोर! त्या स्कूटर वरचा ईसम मला बाजूला घे चे हातवारे करत 'चला जाता हू' गाणं तोडून 'रुक जा ओ जाने वाले रुक जा' चा ट्रेक सुरू झाला! मी कसा बसा बाजूला झालो, नचिकेत घाबरलेला आणि मी पण! तो ईसम निघाला सिविल ड्रेस मधला पोलिस! चित्तरंजन वाटीकेच्या त्या रोड वर बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे बंगले आणि त्यांचा सौराक्षणाची जवाबदारी असणायापैकी असावा असा माझा अंदाज. असो...
'कुठे राहतोस, वय काय तुझं असे प्राथमिक प्रश्नानंतरपालकांना घेऊन ये आणि मग लुना घेऊन जा' अशी ओर्डर स्वीकारून पायतोड करत मी घरी पोचलो. झाला प्रकार कळल्यावर जे काय कोपर्यात धुवून काढलाय मला आईने! उलटा झाडू… आणि माझं अंग! आमचा मजला + खालचा मजला दुमदुमला! समीरनी काहीतरी नवीन करून दाखवलाय आज ह्याची खात्रीपडली भर दुपारी परत, खालचे देशमुख काका आले, कसाबसा ड्रामा थांबला. मग अख्या १५-२० मिनिटाच्या पायतोडी च्या मध्ये लेक्चर, असला मोठ्ठा दिवस होता ना तो! त्या पोलिसानी समज देऊन वगैरे मला 'रिहा' केले! परतीच्या वाटेला आईने एक जड प्रश्न विचारला
'आणि तुला चावी कुठून मिळाली?'
माझं उत्तर होतं …
'फ्रीज ची चावी!'
#सशुश्रीके | ३१ ऑगस्ट २०१४ / दुपारचे ३.३०

1नम्बर वाचून एकदम ठंडक पडली काळजात
ReplyDeleteमी खुप उनाड होतो आपणा सारखाच
नंतर लिहेंन एखादा किस्सा
waah waah... vat pahatoy :)
DeleteUlta zadu....ajunahi aathavala ki tharkaap hoto
ReplyDeleteLahan pana pasun asale udyag kart hotas tar...
ReplyDeletehahahahha hoy!
Delete