सही कशाला हवी, सही माणसं हवीत!



बोरीवलीत असतानाची गोष्ट, गोखले विद्यालयात होतो, ३/४ थीत असेन, शाळेत आम्हाला एक फॉर्म दिला, हेल्पेज इंडिया संबंधित, घरोघरी जायचं आणि पैसे गोळा करायचे, सगळ्यांनाच एक एक कागद दिलेला, नाव / पत्ता / सही आणि पुढे रक्कम वगैरे तक्ता असलेला कागद.

मला तर खरं हे करायला आवडायचं नाही, पण प्रत्येकाला करणं भाग होतं, मी ओळखीच्या लोकांना आधी भेटायचो, मग घरी आलेल्या पाहुण्यांना, मग सोसायटीची अनोळखी दारं असं आठवडा भर तरी चाललं असेल, तो फॉर्म कधी एकदा पूर्ण भरतोय असं झालेलं.

शेवटी आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पण गेलो, एका अनोळखी दरवाज्याची बेल वाजवली, एका आजोबांनी उघडला दरवाजा, मी त्यांना फॉर्म दाखवला, त्यांनी चष्मा नीट अड्जस्ट करून फॉर्म पाहिला, आणि हसत हसत ५ रुपयांची नोट दिली, मी त्यांना त्यांचं नाव वगैरे लिहायला सांगितलं, त्यांनी हातानेच नको नको केलं, म्हणाले तू तुझ्या नावाने देशील का? (किव्वा असच काही तरी बोलले, मला नक्की आठवत नाहीत त्यांचे शब्द) त्यांचा हात थरथरत होता, वयामुळे असेल... असो, मी काही बोललो नाही, फॉर्म वर त्यांचं नाव लिहिलं... त्यांची सही नाही मिळाली!

तो दिवस आहे आणि आजचा, मला कधी कोणाची सही मागण्यासाठी जे आकर्षण लागतं ते नाहीच.

सही कशाला हवी, सही माणसं हवीत!

#सशुश्रीके । २४ एप्रिल २०१८

Comments

  1. सम्या... हेल्प एज इंडिया चा फॉर्म मी पण घेतला होता. सगळं माझ्या वडिलांनी केल होत. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सगळी धनराशी जमा केली होती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...