आनंद गानू.
जगातली सर्वात आवडती व्यक्ती कोण, असा कोणी प्रश्न विचारला तर नक्कीच
डोळ्यासमोर काही चेहरे येतात, पहिला चेहरा असतो, नेहमी पहिला तो म्हणजे आनंद काका
आनंद गानू.
आनंद गानू.
कपाळावर गंध, कानात वाळा जंन्नत-ए-फिरदौस किंवा अशाच कुठल्यातरी अत्तराचा कापूस, कोपर्याच्या आणि मनगटाच्या मध्ये फोल्ड केलेला फुल शर्ट, पॅन्ट, हातात अंगठ्या, कोल्हापुरी किव्वा बाटा चप्पल असा साधा आमचा आनंद काका, आणि सतत हसतमुख 😊 म्हणजे आनंद काका ला कोणी पाहिलं तर तुमचा मूड कसा ही असो, तुमच्या चेहऱ्यावर नकळतच एक आनंद छटा उमलणारच, बर मी ही अतिशयोक्ती करत नाहीये, आनंद काका माहीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी लिहिलेल्या वर्णनाला १०१% पाठिंबा मिळणार हे नक्की! 👌
तर, असा हा बाबांचा मित्र पण, त्यांचं बालपण एकत्रच गेलं... ब्राम्हण वाडीत काका राहायचे जवळच्याच एका इमारतीत माझे वडील, अरुण-आनंद अशी जोडी. बाबांबद्दल खूप नवीन नवीन काय काय सांगायचा काका, हो.. माझ्या साठी नवीनच ना, तुझे बाबा गाड्या काय छान काढायचे, सरळ रेश तर पट्टीविना वगैरे, बाबा असे तसे, आणि मी पण हे सर्व ऐकून आपण किती नशीबवान आहोत, असे बाबा आणि काका मिळालेत अश्या दुनियेत हरवून जायचो. 😇
सुदैवाने बाबांना फोटोज काढायची खूप आवड, त्यामुळे आनंद काकांचे खूप फोटो पण आहेत अलबम मध्ये, अगदी तरुपणापासूनचे आता पर्यंत, माझ्या मुंजीतले व्हीडिओ रेकॉर्डिंग पण आहे, एक छान सिरीज होईल फ्रॉम ब्लॅक हेर टू व्हाईट हेर!
त्यांना अगदी लहानपणा पासून ओळखतो पण स्वभाव मात्र आहे तसाच... कधी कोणा बद्दल वाईट बोलणार नाहीत, उलट वाईट असून त्यात चांगलं काय आहे अशी अजब माहिती तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त! हे असलं अजब अनुभवायला मिळणं आजच्या जगात जवळजवळ अशक्य आहे.
त्यात कमालीचे अध्यात्मिक, शेयर बाजाराची खोलवर माहिती असलेले, बॅंकेत कामाला असल्याने आर्थिक घडामोडींवर ही बारकाईने नजर असलेले, गप्पीष्ट, अतिशय प्रेमळ, थोडक्यात देव माणूस!
मी मुंबईत कामाला होतो तेव्हा जवळ पास २ वर्षे मी राहिलो ब्राह्मण वाडीत, काकांच्या बाजुलाच खोली होती त्यात मी आणि अजुन तीघे कोंबलेलो असायचो, झोपायला खाट अन सकाळी अंघोळ इतकाच संबंध त्या खोलीशी माझा. पण सकाळी आणि रात्री काकांशी भेट व्हायची, रोज छोट्या कधी मोठ्या गप्पा व्हायच्याच. पुण्यात घर असल्याने क्वचितच वीकेंड घालवला असेंन तिथे. तेव्हा त्यांच्या घरी आजोबा त्यांची बायको, ऐश्वैर्या काकू (नावाप्रमाणे माणसं असतात ह्याचं उत्तम उदाहरण) आणि लेक गायत्री, सुन्दर आवाज, खुप हुशार आणि एकदा हसायला लागली की ब्रेक नसलेल्या वाहानासारखी! आता आजोबा गेले, गायत्री लग्न होऊन सासरी, आणि मी दुबईत, पण whatsapp मुळे हाय हॅलो वगैरे चालू असतेच.
आज सगळं हे लिहायचा उद्देश म्हणजे त्याचा वाढदिवस आहे आज, त्याला वाढदिवसाच्या आपल्या सर्वांकडून शुभेच्छा! 🤗
#सशुश्रीके | २८ एप्रिल २०१८
Comments
Post a Comment