Posts

Showing posts from March, 2015

सदा...नंद

Image
॥श्री॥ सदा...नंद मुळचा देवरुखचा, माझी त्याची ओळख झाली भारती विद्यापीठला असताना, ज्यांना फौंडेशनला अभिनव कालामहाविद्याला मिळाला नाही दाखला, त्यांनी त्यांच्या त्यांच्या आई-वडलांनी कष्टानी कमावलेल्या १०-२०हजारची फोडणी देऊन घेतला दाखला… त्यातलेच आम्ही देघे ही! कॉलेजचे पहिलेच वर्ष… नवीन मीत्र, नवीन शिक्षक, सगळच नवीन, पण आम्ही छान मित्र झालो लवकरच, तेव्हा तो रहायचा त्यांच्या मासाजींकडे, घरी मावशी… आणि मासाजी, जुना वाडा होता आणि त्याचं घर रत्नागिरीत, देवरूख… तिथे आई आणि लहान भाऊ… गजा म्हणायचा तो भावाला. घरी शेती वगैरे. आंबा नारळ... वगैरे अगदी टीपीकल रत्नागिरी प्रकार. असो, सदा गायचा सही! (अजून ही गातो म्हणा)… जरासा उदित नारायण टाईप चेहरा होतो त्याचा गाताना, आणि हसताना पण तसाच, हाव-भाव, ऊंची ही… पण किशोर कुमारची गाणी गायचा… मस्त वाटायचं! त्याची प्यांन्ट नेहमी बेंबीच्या वर असायची, जाम चिडवायचो ह्यावरून त्याला! फोटो काढून घेताना बत्तीशी अशी दाखवायचा की जणू कॉल्गेट च्या जाहिरातीची रंगीत तालीम वगैरेच करतोय, आणि शिव्या तर काय… पक्क्या कोकणातल्या, *बाझवलान, काय सांगतोस काय मेल्या!* असला परफे...

STRESS!

हल्ली तरुण वयातच हाय बीपी, शुगरचे प्रोब्लेम्स व्हायचे प्रमाण वाढलेत राव! माझ्या मामालाच ३६-३७वयाच्या असताना एकदा हार्टअट्टेक येऊन गेलाय, ३०वर्षाच्या एका मित्राला शुगर डीटेक्ट झालेली.. आणि पर्वाच एक जवळच्या मित्राला अंग जड़ वाटायला लागले विशेष करुन डावा हात... रात्री १२वाजता इमर्जंसी तपासणी केली... दुसऱ्या दीवशी रिपोर्ट मध्ये 187ब्लडप्रेशर डीटेक्ट झाले, खुप स्ट्रेस घ्यायचे परिणाम! डॉक्टर म्हणाले दुबैत राहायचे असेल तर स्ट्रेस घेऊ नका...ते जमत नसेल तर दुबई सोडा! हल्ली कामात स्ट्रेसचे प्रमाण वाढले आहे अश्यात अवेळी जेवण / कमी झोप + योगा /व्यायाम ह्या बबतीतली उदासीनता... एकूणच स्ट्रेस लेवल डोक्यवारुं मनावर घेतल्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय! सर्वांनाच आनंदी राहायला जमत नाही.. किवा आनंदी राहणे म्हणजे जे काम आवडते तेच करणे हे ही आता चौकटीच्या बाहर जात आहे (एक्स्ट्रा वर्किंग आवर्स)... उपाय काय!? • भोसड्यात जाओ दुनिया मी बरा माझे काम बरे • लै झाली दुनियादारी • मी कशाला स्ट्रेस घेऊ... देतो त्यापेक्षा... असे विचार करण्याऱ्यांची संख्या वाढत जाणार नक्कीच! ‪#‎ सशुश्रीके‬

'किर्रक्केट'

Image
॥श्री॥ क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस! आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे' . .. हे असले सु(कु)संवाद टेस्ट असल्यावर ५दिवस/मर्यादीत षटकांत अमर्याद वेळी आदळायचे अणि कानावर नो एंट्री चा बोर्ड फिक्स करून माझ्यासारखी निर्लज्ज मुलं मनसोक्त आनंद घ्यायचे! जिंकले तर सिकंदर हारले तर 'यार...हार जीत तो चलती रहती है' असा माच्युअर कंटेंट मारून पुढच्या मैच साठी कैलेंडरवर नोंद करून हातात बैट आणि स्टूल (स्टम्प) घेऊन 'इमैजिनेशन'युक्त सचिन अंगात आणत जो काही बैट घुमवायला जी मजा यायची! ...

काल... म्हणजे २०मार्च... बाबांना जाऊन एक तप उलटले.

काल म्हणजे २०मार्च... बाबांना जाऊन एक तप उलटले. एक व्यक्ती नसणे ह्याचा किती फरक पडू शकतो... ह्याची वारंवार जाणीव होत असते... अगदी वर्तमानापर्यंत! वडील नसणे हे तेव्हा तर ईतकं जाणवतं जेव्हा लोकं विचारतात आई वडील कुठे राहतात/असतात... मग बाबा नाहीत हे सांगायला शब्द थोड़े पडतात... आता स्वतः मी बाबा आहे, मूल काय असते ह्याची हळू हळू जाणीव होउ लागली आहे, चिंता आनंद ह्यांची भेळ असते बाबा असणे म्हणजे, बाबांचं मन जाणून घ्यायला तेव्हा मी जरी लहान असलो तरी त्यांच्या आठवणींमुळे त्यांना वारंवार भेटता येतं! त्यांनी माझ्यासाठी खुप एपिसोड्स मनात रेकॉर्ड करवुन ठेवलेत... त्यासाठी देवाला प्रचंड धन्यवाद! खुप लाहानपणापसुनचे बाबा आणि शेवटपर्यंतचे बाबा अगदी बारकाव्या सहीत आहेत... त्यांच्या हांतावरच्या नसा, कपाळावरचा भांग, फ्रेंच दाढी, आपल्या लोकांत दिल खुलास बोलायची स्टाइल, लोकांबद्दलचा आदर, धार्मिक ओढ, टेक्नोलॉजी/वाहनप्रेम, चित्रकला कौशल्य आणि बरच काही. अजुन काही लिहायचं सूचत नाही... जुनी लिंक परत शेयर करतो *अरुण म्हणायचे त्यांना... पाळण्यातले नाव श्रीकृष्ण!* http://sashushreek...

आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे!

लेटेस्ट किस्सा - आत्ताच प्येंट्री मध्ये मी मिसळ आणलेला डबा विसळायला गेलेलो तिथे आमच्या ऑफिस मधले काम करणारे २ पाकिस्तानी आले १ मिनिट दोघेही गप्प, मी गाणी गुणगुणत होतो… परवाच हारलेले, तरीही मी आपलं शांत, काही विषय काढला नाही… त्यातला एक म्हणतो "क्या समीर भाय आपको क्या लागता है? ऑस्ट्रेलिया जीत जाएगा सेमी फायनल!" मी न वळताच उत्तरलो… "जनाब आप लिखते भी उलटे है और सोचते भी उलटे ही … हाहाहा वैसे दिल केहता ही के इंडिया जीतेगा और दिमाग ऑस्ट्रेलिया… और में दिल पे लेता हु दिमाग पे नही" दोघे हसत निघून गेले… जाताना त्यांना थांबवून बोललो… "फायनल में कोई भी हो, छुट्टी ले रहा हु… :) " आता दिवसभर ह्या गोष्टीचा विचार करत बसतील, का विचारला प्रश्न का घातले बोट! आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे! #सशुश्रीके । २२/०३/१५

*शाब्दिक कोट्या*

|| श्री || *शाब्दिक कोट्या* कधी कधी कळतात शाब्दिक कोट्या लोकांना पण काहीना.. नाही कळालं की मला कळुन चुकतं की ह्यांना कधी त्या शब्दांचा पुष्पगुच्छ देऊ नए बे दूणे शून्य होतो बे शब्दांची गर्दी होते मग किती ही एकटा असलास तरी... लिफ्ट मध्ये! उणे *ड* मजला आला की ढकलुन द्यावसं वाटत अश्या पब्किकला #सशुश्रीके | १९ सप्टेंबर २०१४

पायऱ्या, लिफ्ट मजले आणि मी...

॥श्री॥ पायऱ्या, लिफ्ट मजले आणि मी... पहिल्या दोन्ही तितक्याच महत्वाच्या... जितका मजला! फरक इतकाच की मजले जिथे जास्त तिथे लिफ्ट पायऱ्यांना मागे टाकते आणि जिथे मजले कमी तिथे लिफ्ट 'खालीच' राहते. सुदैवाने लिफ्ट बद्दल एकदाच वाईट अनुभव आला... तो ही इतका गंभीर नाही, पण तरी विसरलो नाहीये, काही प्रसंग अगदी घडलेत तसे फ्रेम बाय फ्रेम आठवतात त्यातला हा एक.. खुप लहान होतो... नक्की आठवत नाही पण नक्कीच शाळेत जाण्या आधी इतका लहान... डोहा कतारच्या शेरेटन हॉटेल मधली लिफ्ट असावी, मी घाई घाई करत पटकन लिफ्ट मध्ये घुसलो... वळून बघतो तर आई बाबा बाहेर आणि लिफ्टचे ते काचेचे दरवाजे बंद!... मी बघतोय... वरती अकरा वगैरे मजले गेले...गंगा जमुना...त्या २-३मिनिटांत बादल्या भरून रडत होतो... ते पांढरे बगळे (कंदूरा घातलेले शेख लोक) बघुन तर अजुनच भीती वाटत होती, मधलं काही आठवत नाही लिफ्ट चा दरवाजा अचानक उघडला आणि बाबा दिसले समोर... आणि मी फेरारीसारखा पिकअप घेत त्यांना जी काही धडक दिल्ये!... जीव मुठीतून थेट मिठीत! त्यानंतर लिफ्ट हा विषय जरा नाजुक पद्धतीनं पाहिला मी... घुसलो की बाहेर पडायचे ...

आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

Image
आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे... कधी रीकामं पाहिलच नाही, त्यात मध्येच १जण असा यायचा जो नंबर लाउन गेलेला असायचा, अजुन चीडचीड, असो,  जुनी गाणी ठीक लागली/लावली तर ठीक, पण ९०ची कुमार शानू हिट्स लागले/लावले की माझं डोकं फीरायचं/फीरतं! मग वेळ जायचा पोस्टर्स पाहण्यात, वेगवेगळ्या फालतू चेहर्यांचा मस्तकावरचे विविध ढंगाच्या चित्रविचित्र केश-रंजना, बापरे विचारू नका, असले आउट ऑफ़ घीस वर्ल्ड वाले कट्स! त्यांकडे बघुन झालं की मग निरनीराळ्या तेलाच्या, क्रीमांच्या... बाटल्या! तिथून नजर जायची, अरश्याकडे... ते अरश्यासमोर  आरसा आणि त्यातले इंफीनाइट प्रतिबिंब... १० तुम्ही आणि बाकीचे १०... डोळे आणि डोकं गरगरायचया आत मी दुसरीकडे बघणार तर कोणीतरी काखेचा खजाना दाखवत डोके वर करुन उभा... मग ते बघुन न बघितल्या सारखं करत 'माझा नंबर कधी येणार!?' ह्याची खात्री करण्यासाठी विचारायचं... की तो बोलणार 'बसा की निवांत काय घाई!?' इतक्या आरामत ते केस कापणं चालू असतं काही विचारू नका... जसं काही हां त्याच्या आयुष्यातला शेवटचा 'कष्टम्बर' आहे! असो... माझी वेळ आली बसायची की, ठरल्याप्रमाणे मी संगाय...

काहीतरी लिहायचे आहे...

• असे होते... म्हणजे खेळायचे असते पण नेमका बॉल नसतो बैट असते! नुसत्या बैटनी काय कारायचे!? • कधी कधी स्केचिंग किवा काहीतरी गिरवण्याचा मूड असतो, कागद असतो पण साला एक पेन  किव्वा पेंसिल नाही सापडत आजुबाजुला. • अनेक वेळ असे पण झालेले की फीरायचय पण बाइक मध्ये पेट्रोल नाहीये. • बहुचर्चित सिनेमाची खुप वाट बघुन मग टिकिट विक्री सुरु झाल्या झाल्या अडवांस बुक करून टिकिट काढलय, हरवू नये म्हणून जपून ठेवलय पण आयत्या वेळेला ते सापडत नाहीये! • येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे येतच आहेत, म्हणून अवघड प्रश्नांच्या उत्तरा साठी वेळ वाया घालवत, येणाऱ्या उत्तरांच्या प्रश्नांसाठी वेळ न उरणे / शाई संपणे आणि परीणामी कमी मार्क मिळून फजीती होणे! • अक्खा प्रवास झोपे वर ताबा मिळवून नेमके उतरायच्या स्टेशनच्या आधीच्या स्टेशनला सतत उघडा ठेवलेला 'डोळा लागणे'...मग काय करा कसरत, प्लेटफार्म बदला ट्रेन बदला वगैरे वगैरे... • अश्या छोट्या-मोठ्या मनस्ताप देणाऱ्या गोष्टी घडल्यात आयुष्यात...आता अजुन एक भर! \\\ लिहायचय पण सुचत नाहीये /// आता ह्यावर लिहीतोय! २-३ दीवस झाले काही लिहिलं नाहीये... काहीतरी लिहायचे आहे...

हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट!

हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट! कॉलेजच्या वेळी वडापाव, मिसळ, साबू खिचडी, पोहे...क्वचीतच वडा सांबार, डोसे... कच्छी दाबेली किंवा सैंडविच असले प्रकार हाणायचो, सकाळचा नाश्ता ते संध्याकाळची भूक... ५-१०-१५ रूपयात पोटाला आधार मिळायचा... त्यातल्यात्यात महाग पण उत्तम पदार्थ म्हणजे लक्ष्मी रोड वरचे एक उपहार गृह... नाव नेमके आठवत नाही पण तिथे उत्तम मराठी पदार्थ मिळायचे... उदा. मटार करंज्या वगैरे, महाग होते पण दर्जा पण तसाच! मग मुंबईत जॉबला असताना पुण्यात यायचो वीकेंडला तेव्हा तो मधला फ़ूडकोर्ट.. तीथला २५रुपयाचा वडापाव ऐकून डोळे फीरायचे... बाकीच्या गोष्टीतर विचारायलाच नको! २००३मध्ये डोमिनोज पिझ्झा आणलेला बाबांनी..२५०-३०० रुपये... मला घरी आईने किम्मत विचारल्यावर कळालं... नंतर २००४ मध्ये पुण्यात मैकडोनाल्ड सुरु झाले असेल, पण कधीच गेलो नाही... ते बर्गर वगैरे प्रकरण कधी आवडलच नाही, २००७ मध्ये दुबईत आलो... इथे मैकडोनाल्डच काय तर जगतले सगळे फ्रेंचायझीज कानाकोपऱ्यात, पण वेज असल्यामुळे सबवे सैंडविच नायतर वेज-बर्गर / फ्रेंच-फ्राइज / डोनट्स इथपर्यंतच मजल... आणि दुसरा पर्याय म्हणजे मुम्बई चौ...

BREAKING BAD

Image
BREAKING BAD... नाव वॉल्टर व्हाइट, वय एकूणपन्नास...करतो काय!? प्राध्यापक आहे... केमिस्ट्री टीचर, पगार पुरत नाही, म्हणून काय करतो!? एका गैरेज मध्ये गाड्या धूवायचं काम! घरी कोण कोण असतं... बायको आणि एक मतीमंद मुलगा, वॉल्टरचे मित्र, नातीवाइक सर्व त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीतले... त्यात वॉल्टरला कळतं की त्याला कैंसर आहे आणि एक वर्ष वेळ आहे! पुढे काय... कुटुंबाला कसं सांभाळणार, घर खर्च कसा होणार... पुढे काय... तो घरी ह्या सर्व विचारांनी पाऊल टाकणार, 'सरप्राइज'... त्याची जवळ जवळ सर्व मित्र मंडळी आणि जवळचे नातेवाईक त्याच्या घरी त्याला बर्थडे 'सरप्राइज' पार्टी द्यायला आलेले असतात, अर्थात बायकोनी प्लान केलेले असते सर्व, ह्याला हसावं का रडावं कळत नसतं... सगळे आनंदी असतात, त्या सर्व लोकांमधे वॉल्टरचा सालाही आलेला असतो, DEA (Drug Enforcement Administration) मध्ये मोठ्या पोस्ट वर असतो तो, टीव्ही वर न्यूज़ चालू असतात तेव्हा बातमी मध्ये त्याचाच उल्लेख, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक लोकांना श्रेडर (वॉल्टर चा साला) आणि त्याच्या DEA टीमनी छापा घालून अमुक अमुक पैसे आण...

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक'

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक' बोरिवलीत आम्ही राहायचो तेव्हाची गोष्ट, २-३रीत असेन, नेहमीप्रमाणे शाळेत गेलेलो, मुलं-मुली एकत्र असलेला वर्ग, 'ठरल्याप्रमाणे' महिन्यातून ३-४ वेळेला कोणा न कोणाचातरी वाढदिवस असायचाच, तसा एका मुलीचा वाढदिवस होता, 'ठरल्याप्रमाणे' चोकलेटं वाटपाचा प्रोग्राम घडला, 'ठरल्याप्रमाणे' किस-मी नावाची फेमस(अजून ही) चोकलेटं वाटली, 'ठरल्याप्रमाणे' २-३ मोठी पाकीटं ४ जण आपापल्या बाकांच्या रांगेत वाटत होती, 'ठरल्याप्रमाणे' प्रत्येकी २ असे गणित. पण 'अचानक' मधली सुट्टीच्या आधीच म्हणजे जेवणाच्याही आधी मुलांच्या पोटात 'अचानक' दुखायला लागले! ५-६ जण सोडून (त्यात मी आणि २ जण ज्यांनी 'ती' चोकलेटं पचवली होती आणि २-३ जणं ज्यांनी 'ती' चोकलेटं खाल्ली नव्हती) 'अचानक' जवळ जवळ सर्वच मुले डोळे वर करत पोटाच्या आजूबाजूला हात गरागरा फिरवत उलट्या काढत दिसत होती, शाळेच्या सर्व मास्तरीण आणि शिपायांच्या तोंडाचे 'अचानक' १२ वाजलेले कळत होते, सर्व मुलांना एका मागोमाग रिक्षात कोंबून जवळच्या हॉस्पिट...