BREAKING BAD

BREAKING BAD...

नाव वॉल्टर व्हाइट, वय एकूणपन्नास...करतो काय!? प्राध्यापक आहे... केमिस्ट्री टीचर, पगार पुरत नाही, म्हणून काय करतो!? एका गैरेज मध्ये गाड्या धूवायचं काम! घरी कोण कोण असतं... बायको आणि एक मतीमंद मुलगा, वॉल्टरचे मित्र, नातीवाइक सर्व त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीतले... त्यात वॉल्टरला कळतं की त्याला कैंसर आहे आणि एक वर्ष वेळ आहे! पुढे काय... कुटुंबाला कसं सांभाळणार, घर खर्च कसा होणार... पुढे काय... तो घरी ह्या सर्व विचारांनी पाऊल टाकणार, 'सरप्राइज'...

त्याची जवळ जवळ सर्व मित्र मंडळी आणि जवळचे नातेवाईक त्याच्या घरी त्याला बर्थडे 'सरप्राइज' पार्टी द्यायला आलेले असतात, अर्थात बायकोनी प्लान केलेले असते सर्व, ह्याला हसावं का रडावं कळत नसतं... सगळे आनंदी असतात, त्या सर्व लोकांमधे वॉल्टरचा सालाही आलेला असतो, DEA (Drug Enforcement Administration) मध्ये मोठ्या पोस्ट वर असतो तो, टीव्ही वर न्यूज़ चालू असतात तेव्हा बातमी मध्ये त्याचाच उल्लेख, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक लोकांना श्रेडर (वॉल्टर चा साला) आणि त्याच्या DEA टीमनी छापा घालून अमुक अमुक पैसे आणि ड्रग्स जप्त केले वगैरे!

श्रेडर बोलता बोलता वॉल्टरला म्हणतो, वॉल्टर काय करतोय्स उद्या, घरीच बसणार असशील तर ये माझ्या बरोबर... एके ठिकाणी रेड घालायच्ये, बघ आम्ही कशी रेड घालतो, 'थ्रिल्लिंग' अनुभव मिळेल तुला! वॉल्टरला नाही म्हणता येत नाही... तो होकार देतो.

दुसऱ्या दीवाशी ठरल्याप्रमाणे रेड घलाण्याच्या आधी श्रेडर, वॉल्टरला उचलतो आणि अक्खी टीम रवाना होते संदीग्द घटना स्थळी, पहिली तूकडी त्या बंगल्याच्या आत घुसते, दूसरी बंगल्याच्या पुढच्या बाजूला वगैरे सर्व प्रकार सुरु.. वॉल्टर आणि ड्राईवर आणि अजुन एक DEA एजेंट गाडीत बसलेले असतात... रेड सक्सेसफुल होते, पण एक अपराधी मात्र सुटतो, बंगल्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून उड़ी मारून सटकताना वॉल्टर पाहतो त्याला, तो ज्या गाडीने पळ् काढतो त्या गाडीचा नम्बर ही लक्षात ठेवतो वॉल्टर..पण पाहिलेला प्रकार काही सांगत नाही श्रेडरला!

जेस्सी पिंकमन नावाचा माजी विद्यार्थी असतो वॉल्टरचा... तोच जो सटकतो त्या बंगल्यातून... तोच! वॉल्टर त्याच्या घरी त्याची वाट बघत असतो, वॉल्टरला बघताच जेस्सी पळून जायचा प्रयत्न करतो, पण वॉल्टर त्याला थांबवतो... म्हणतो की तुझ्याकडे कॉन्टैक्ट्स आहेत आणि माझ्याकडे ख़ास क्षमता जी तुझ्यात मिसिंग आहे, केमिस्ट्री! आपल्या दोघांचा फायदा आहे ह्यात, तू नाही म्हणालास तर मई पोलिसांकडे जाइन आणि हो म्हणल्या शिवाय तुला दूसरा पर्याय नाही!

वॉल्टरला कमीत कमी वेळात प्रचंड पैसा कमवायचा असतो... फॅमिली सप्पोर्टसाठी...
कुठल्याही थराला जाण्याची त्याची मनस्थती झालेली असते!

जेस्सी ही तयार होतो... आणि सुरुवात होते 'BREAKING BAD'ला

विन्स गिल्लिगन याची कन्सेप्ट असलेली IMDB वर 9.5रेटिंग असलेली ही मालिका पहाच!

वेड! निव्वळ वेड प्रकार... ह्या मालिके नंतर कुठल्याही मालिकेशी तुलनाच करता आलेली नाहीये अजुन! इतका झटका लाऊन जाते कथानक!


#सशुश्रीके | ०३/०२/२०१५ | ४.००


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!