धनंजय माने...
धनंजय माने... होय त्याचं नाव मी 'धनंजय माने'नावानी सेव केलय मोबाइल मध्ये, खरं नाव धनंजय गोखले. मुळचा नाशिकचा, गुटगुटीत बांधा, मध्यम ऊंची, वरची सपाट धावपट्टी (टक्कल), घामाचा कारखाना असलेला... आमचा गोखल्या! वरून कितीही नारळ, फणस, कलिंगड़ दिसत असला तरी 'काट के देखो साब... अंदर से मीठा है... पैसा वसूल है साब... एक बार ट्राय कर के तो देखो!' असा प्रकार! ह्याची माझी ओळख झाली जयंत विध्वंस यांच्या कडून, त्यांच्या बद्दल नंतर सांगतो, बेसिकली जयांता म्हणाले... की एक दोस्त आहे आपला, दुबैतच असतो, हा घे नंबर, जमलं तर भेटा! 'जमलं तर!' वगैरे... अशी वाक्य म्हणजे अपमान माझा! आपल्याला भेटायला आवडतं, एक मेंदू... ह्रदय... आणि त्यात मित्राचा मित्र म्हणालं की संपला विषय! थेट-भेट-ग्रेट-भेट कामाच्या व्यापानी कधी उशिरा कधी अती उशिरा पण... सोडत नाय कोणाला. मिलेंगा मतलब मीलेंगाइच!!! पूर्वी ऍफ़बी आता व्हाट्सऐप्प... भेटलो माझ्या घरा खालीच! म्हणालो वेळ असेल तर ये वरच.. त्या दिवसापसुन आज पर्यंत सेम डायलॉग! "जवळच आहे तुझ्या घराच्या... काय आणु का... वडापाव वगैरे!?" की मग ...