आज एक अचानक आठवलं!

अन्वयाच्या रोजच्या चीत्रांनी...
आज एक अचानक आठवलं!


लाकडाच्या बेंच वरती करकटानी,
जिव ओतून काढलेली चित्रं!
न त्याच बेंच वर 'माझी जागा इतकी!'
म्हणून रेश आखणारे… सो कॉल्लड मित्र!


घरी जायची पत्र, पालक मीटिंगची धास्त!
तुमचा मुलगा 'ह्यावच' नी 'त्यावच', थोडक्यात जरा व्र्यात्य...
म्हणे घाला की त्याला हॉस्टल मध्ये,
सुधरेल बघा मग कसा… कमी नाही जास्त!


कॉपी करायची हिम्मत नाही!
अभ्यास करायची इच्छा नाही…
मग काय अधोगती चे प्रगती पुस्तक,
डोक्यात बघावं तेव्हा 'ठकठक' किंवा 'चंपक'


मधल्या सुट्टीची ओढं,
मग खेळासाठी घोडदौडं!
आणि आम्ही काही ४-५ डोकी,
कधी क्रिकेट न कधी हॉकी!


उरल्या सुरल्या वेळेत डबा…
मग टण-टण वाजे घंटा!
आपली आपली जागा घेऊन,
 तात्पुरता संपे आमचा दंगा!



कसाबसा जायचा तो दिवस!
आणि शेवटची घंटा ऐकताच,
वाटे जग आता आपलेच…
सायकलचे लॉक काढताच!


झापाझप, रपारप पैडल सायकल…
मागे टाकू प्रत्येक गाडी न मोटारसायकल!
आईकडे काय खायला मागायचं!?
ह्याचेच चिंतन जास्तं!


हात पाय नं धुता,
आजीच्या मिठीत सिद्धा!
काय मस्त ते फिलींग…
तेच सेम फिलिंग!


आज अन्वयाची मिठीत!


आज एक अचानक आठवलं…
आपण कुठे मोठे झालोत?
अन्वयाच्या रोजच्या चीत्रांनी...
आज एक अचानक आठवलं!


#सशुश्रीके । १२/०८/२०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!