Bourne (film series) 2002-2007

Bourne (film series) 2002-2007

आत्ता पर्यंत हॉलीवूड मध्ये खूप चित्रपट येउन गेले, ज्यांचे ३ किंवा त्याहून जास्त भाग आलेत, उदाहरणार्थ Evil Dead, The Austin Powers, Indiana Jones, Back to the Future, The Godfather, Star Wars, The Lord of the Rings, The dark Knight, Terminator, Home-Alone वगैरे! सगळे अफलातून एक-से-एक!

ह्यासार्वांमध्ये मला सर्वात भावणारी मालिका म्हणजे
The Bourne Identity (2002)
The Bourne Supremacy (2004)
The Bourne Ultimatum (2007)

रॉबर्ट ल्युडीअम च्या The Bourne Series कादंबरीवर आधारीत, जेसेन बोर्नची भूमिका साकारणारा प्रतिभावंत कलाकार मैट डेमन, पार्श्वसंगीताची अप्रतीम साथ देणारा जॉन पॉवेल ह्या सर्व दिग्गज मंडळींना एकत्र आणण्याचे काम डग लीमन, पौल ग्रीनग्रास ह्यांना जाते. ह्या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन डग लीमनआणि नंतरच्या २ भागांचे दिग्दर्शन पौल ग्रीनग्रास यांनी केले. दोन वेगळ्या माणसांकडून एकाच चित्रपटाची हाताळणी होऊनही हा चीत्रपट त्याची 'जात' सोडत नाही! ह्याच चित्रपटाचा चौथा भाग ही आलाय The Bourne Legacy नावाचा, पण त्यात मुख्य कलाकार म्हणजेच जेसन बोर्न नाही, त्यामुळे तो भाग मला रुचला नाही. पहिले ३ही भाग इतके खुर्चीला खिळवून ठेवणारे आणि कथेची भूक मिटवणारे होते की चौथ्या भागाची गरज नव्हती! असो…

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

The Bourne Identity (2002) - पहिल्या भागात सुरुवातच ईतकी गूढ आहे की पहिल्या १५-२० मिनिटातच तुम्ही तर्क-वितर्क लावायला सुरुवात करणार तितक्यात अजून नवीन धक्के-धागे-दोरे मिळतात, तयार होतात, नवीन पात्र येत जातात…युरोपिअन समुद्रात एका वादळात तग लाऊन धरलेल्या एका बोटीवर काही खलाशी नित्यनियामानुसार मच्छेमारी करत असतात, त्यांना एक माणूस पाण्यात तरंगताना दिसतो, ते त्याला बोटीत खेचून घेतात, त्याच्यावर उपचार करतात, उपचार करताना पाठीतून २गोळ्या काढतात, त्यापैकी एका गोळीवर एक कुठलातरी कोड लीहीलला असतो, नंतर असे कळते की तो नंबर एका स्विस खात्याचे आहे, खलाशी त्या माणसाला त्याचे नाव विचारतात पण त्याला काहीही आठवत नसते! काही दिवस त्या बोटीवर राहून एका युरोपिअन देशात तो घुसतो, तो सैन्यात असणार असे त्याच्या हालचालींवरून क्षणोक्षणी जाणवत असते, स्विस तिजोरी नंबर हा एकमेव दुवा असतो त्याकडे स्वतःची ओळख करवून घेण्याचा, आणि त्या दिशेने त्याची वाटचाल सुरु होते, खूप अडचणींना शिताफीने आणि थंड डोक्याने सामोरे जाउन, त्या स्विस बँकेत शिरून, लॉकर मधून त्याच्या भूतकाळाबद्दलचे दुवे शोधण्याचा प्रयत्न करतो!

त्या लॉकर मध्ये त्याला मिळतात ४-५ पासपोरर्ट्स सर्व पासपोरर्ट्स वरती एकाच नाव 'जेसन बोर्न' त्याबरोबर काही देशांच्या नोटांची बंडलं आणि एक, आणि एक पिस्तुल!
त्याला कळून चुकते की तो कुठल्या पार्श्वभूमीचा आहे… त्या क्षणापासून शेवटपर्यंत तो आपल्या सोबत काय घडले ह्याच्या शोधात प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेउन ठेवतो, अगदी शेवटच्या फ्रेम पर्यंत! मारिया क्रुझ नावाच्या एका मुलीच्या सहय्यानी तो कसा स्विस बँकेत पोहोचतो, तिथून तो कसा पळ काढतो… पोलिस आणि त्याची युरोपिअन निमुळत्या सास्त्यांवारची लपाछपी, वाहन-जुगलबंदीच जणू! पुढे CIA नामक अमेरीकन गुप्तचर संगठनेचा तो एक सदस्य आहे आणि नुकत्याच झालेल्या एका राजकीय हत्येच्या असफल कटात (ज्याचे नाव 'Operation Treadstone' आहे) तो सामील असल्या कारणानी त्याची ही अवस्था झाल्याचे अप्रतीम थरारक कथानक आणि पुढच्या भागासाठी रचलेला दणदणीत पाया, हे ह्या भागाचे वैशिष्ठ!

---------------------------------------------------------------

हीच कथा The Bourne Supremacy (2004) मध्ये चित्रपट सुरु होतो गोव्यामध्ये! जेसन आणि त्याची प्रेयसी 'मारिया क्रुझ' गोव्यात रहात असतात, साधारण आयुष्य… गोव्यात जसे सामान्य लोक आपले दिवस काढत असतात अगदी तसे! पण एके दिवशी अचानक एक माणूस जेसनची विचारपूस करत गोव्यात पोहोचतो, त्याचे लक्ष्य असते जेसन, जेसनची सुपारी घेऊन आलेला मारेकारी (किरील) आणि जेसन ह्यांच्यात कथानक एक जीवघेणे वळण घेते, आणि जेसनची प्रेयसी त्याच वळणात बळी पडते! त्याच्या आयुष्याला नुकतेच आलेले स्थिर क्षण आणि भूतकाळाचा मागोव्याला लागलेले ग्रहण परत नाहीसे होतं.

वार्ड अबोट्ट नावाचा CIA प्रमुख ज्यानी जेसनला त्या राजकीय हत्येच्या कटासाठी निवडलेले असते, आणि नंतर जेसनवरच्या झालेल्या अन्यायावर त्याचाच हात असतो ह्याची माहिती जेसनला कळते, अर्थातच वार्ड अबोट्टनी जे काही गैर्रव्यवहार केलेले असतात त्याची शिक्षा जेसन भोगत असतो, खूप कपटीने जेसनला 'टार्गेट' केलेले असते. CIA च्या मिलयंस डोल्लर्स च्या अफरातफरीचे खापर वार्डनी जेसन वर फोडलेले असते, आणि वार्ड ह्यासार्व भानगडीत स्वतःला सोडवून जेसनला मारण्याचा कट ह्या भागात सपशेल फसलेला असतो. पामेला लैंडी नावाच्या CIAएजंट कडे बोर्नला पकडण्याचे काम मिळालेले असते, जेव्हा पामेलाला बॉर्न अप्रत्यक्षरीत्या हे पटवून देतो की वार्ड हाच मुख्य सूत्रधार आहे 'Operation Treadstone'चा, तेव्हा पामेला वार्डला पकडणार त्या आधीच वार्डने संभाव्य गणिते न सोडवताच आत्महत्या केलेली असते. कहाणी च्या सुरुवातीला बोर्न २ गोष्टींमुळे भारी वैताग्लेला असतो! एक तर CIAनी केलेला विश्वासघात आणि २री गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती ज्यावर तो विश्वास ठेउ शकत होता… तिची प्रेयसी मारिया, तिचा नाहक बळी गेलेला असतो, आणि जेसनला मारायला आलेला तो मारेकरी आणि बॉर्न यांची जीवघेणी 'कार-चेस' ह्या दुसऱ्या भागाच्या शेवटी चार-चांद लाऊन जातात.

---------------------------------------------------------------

आता तिसरा टप्पा -  The Bourne Ultimatum (2007)
CIA वाईट क्षडयंत्राला सडेतोड उत्तर देऊन झाल्यावर तब्बल ६आठवड्या नंतर बॉर्नला असे कळते की कोणी एक ब्रिटीश पत्रकार आहे जो त्याला भेटू पाहतोय, ह्या प्रकरणाच्या तळाशी जायचा प्रयत्न करतोय, ह्या सर्व घडामोडींमध्ये Operation Blackbriar ह्या नवीन पण Operation Treadstoneच्याच पुढच्या प्रकरणात हळू हळू बॉर्न अडकायला सुरुवात झालेली असते! 'नो व्होसन' नावाचा CIA एजेंट ह्या नवीन Operation Blackbriarचा सूत्रधार असतो. बॉर्न अशी कागदपत्र / पुरावे गोळा करतो की ज्यांनी सिध्द होणार असतं की Operation Blackbriar हे अमेरिकन नागरिकांसाठी किती घातक आहे आणि त्यात निकी पार्सन (Operation Treadstone शी संबंधीत Logistics technician) नावाची मुलगी त्याला अप्रत्यक्ष का होईना साथ देत असते, अर्थातच बॉर्न विषयी तिच्या मनात 'सॉफ़्ट कॉर्नर' असतो कारण Operation Treadstoneच्या आधी त्यांच्यात प्रेम संबंध असतात पात Operation Treadstoneनंतर बॉर्न जवळपास सर्व विसरलेला असतो, पण हळू हळू बॉर्नला काही अस्पष्ट आठवणींमुले निकी पार्सन बद्दल आपुलकी निर्माण झालेली असते, नाजूक आणि भरपूर 'पर्दाफाश' करणारे विषय उतृष्ट दिग्दर्शन आणि अप्रतीम पार्श्वसंगीताने हा चित्रपट TREAT TO WATCH अनुभव देऊन जातो!

पुढे बॉर्नचे काय होते!

---------------------------------------------------------------

पहिले ३ही भाग जगभरात प्रसिद्ध झाले प्रेक्षकांनीही त्यांचे भरभरून कौतुक केले पण ४थ्या भागासाठी मुख्य कलावंत मैट डेमनचा सहभाग नसल्यानी म्हणा किंवा पहिल्या ३ही भागांप्रमाणे कथानक दमदार नसल्यामुळे म्हणा भाग ४ला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही!

भाग ४ आहे The Bourne Legacy ह्यात जेसन बॉर्नचा सहभाग फक्त एका पासपोर्ट ईत्काच आहे… आणि कथानक दुसर्या एका वादग्रस्त Operation Outcome वर आधारीत आहे, पण खुशखबर अशी आहे की नुकत्याच झालेल्या मीडीया कॉन्फेरंस मध्ये उनिवर्सल स्टूडीओनी The Bourne Legacyच्या अपयशानंतरही ५व्या भागाची घोषणा केली आहे, आणि त्यात पौल ग्रीनग्रास हा The Bourne Ultimatum ह्या ३र्या भागाचा दिग्दर्षक आणि मुख्य भूमिका असलेला मैट डेमन ह्या दोघांचा सहभाग असल्यानी TREAT TO WATCH चा अनुभव नक्कीच पहायला मिळेल!

---------------------------------------------------------------


#सशुश्रीके । ९-११/०८/२०१५


पामेला लैंडी -  जेसन बॉर्नला मदत करणारी CIA एजंट 
मारिया क्रुझ - प्रेयसी 
वार्ड अब्बोट - CIA प्रमुख Operation Tradestone
किरील - जेसनची सुपारी मिळालेला मारेकारी 
नो व्होसन - CIA Deputy Director - Operation Blackbriar
आलेक्झांडर -  CIA special ops director Operation Blackbriar
निकी पार्सन - Former Treadstone Logistics Technician आणि प्रेयसी 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!