#NowPlaying... THE SHADOWS

#NowPlaying... THE SHADOWS आणि त्यांच्या सारखेच THE VENTURES

ह्या नावाचे दोन जुने बैंड आहेत, Instrumental जुनी इंग्लिश गाणी!
ईतकी ऐकलीत लहानपणी की प्रत्यक्ष न ऐकता ही सुंदर ऐकता येतात,
लहानपणी नसती ऐकली तर ईतका नसता जिव्हाळा ह्या बैंड बद्दल.

तसे पाहिले तर THE VENTURES हे THE SHADOWS पेक्षा आधीचे, पण THE SHADOWS च्या मधला गोडवा जरा जास्त भावतो.

THE SHADOWS मुळचे ब्रिटीश, क्लीफ्फ रिचर्डनी स्थापना केली ह्या ग्रूपची. 'आपाचे', 'वॉक-डोंट रन', 'राय्डर्स इन दी स्काय' वगैरे सुप्रसिद्ध इंग्रजी चित्रपटांच्या संगीताची मेजवानी ह्यांनी १९५८ पासून द्यायला सुरुवात केली. एकूण चार लोकांच्या ह्या ग्रूपने तेव्हा पासून आज पर्यंत लाखो लोकांची मने जिंकली आहेत त्यांच्या सुमधुर संगीतानी! लीड गिटार, र्हिदम गिटार, बेस गिटार आणि ड्रम्स च्या जोरावर, त्यांच्या शैलीत… पाय पुढे मागे करत, प्रसन्न मुद्रा… वयाच्या सत्तरीतही तोच जोश आणि तेवढेच आल्हाददायक संगीत त्यांनी रसिक प्रेक्षकांना दिले!

त्यांचा शेवटचा 'लाइव्ह कॉन्सेर्ट' होता 'दी फायनल टूर' २०१० सालचा. त्यांच्या ह्या १९५८ ते २०१० च्या लांब कार्यकिर्दीत ४ जणांशिवाय अजून ६-७ जणांचा सहभाग होता.

आता विचाराल ह्या बैंड बद्दल ईतका जिव्हाळा का? बाबांकडे जगजीत-चित्रा, आब्बा, स्टीवी वंडर अश्या काही कॅस्सेट्स पैकी तब्बल ४ कॅस्सेट्स THE SHADOWS च्या होत्या. मी तासंतास ऐकत बसायचो!

लिंक देतोय… एन्जोय!
माहिती - https://en.wikipedia.org/wiki/The_Shadows
गाणी - https://www.youtube.com/watch?v=GbfcEG1rqdU&list=PLL4WX7AYos_lXMJ1w4vOJQS1Wv29vAopq

#सशुश्रीके । ४ ऑगस्ट २०१५ दुपारचे ४.००















Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!