Posts

Showing posts with the label poem

#बाबा तू...

Image
बाबा तू... एक हिरो होतास तू, एक व्हिलन पण होतास तू, जसा हसवायचास तू, तसा रडवायचास पण तू. किती तरी दूर राहून जवळ होतस तू, एखाद्या सेलिब्रीटी सारखा जणू, भासलास तू. माझ्या हट्टांना क्वचितच 'नाही' म्हणालास तू, स्वतःचं दुःख कधीच सांगितलं नाहीस तू. आणि मग... फारच लवकर सोडून गेलास तू! तू परत ये रे तू... एकदा भेटू, एकदा हातात हात दे तू... एकदा मिठी मार तू, एकदा काही तरी चमत्कार घडव तू! कारण बाबा तू... तू माझा हिरो होतास, आज ही आहेस तूच. नक्की परत ये तू... तुझ्या साठी अजून ही तोच समीर, कोणी वाढू दिलाच नाही जणू... अजून ही बालिश, तोच गोरा घारा, तुझ्या कैमेराचा तारा! तू माझे काढलेले शेकडो फोटो... ते बघताना नेहमी दिसतोस केमेऱ्या मागचा तू! बघ बरं... तो शेवटचा रोल का निगेटिव्ह सोडलायस तू

बिंदास चिखल!

आज भिजलो... माझ्या छकुली बरोबर भिजलो! हातात दोघांच्या छत्री होती... पायात दोघांच्या मस्ती होती तिच्या साठीचा 'मडी पडल'... माझ्यासाठी तोच तो पूर्वीचा चिखल नाच बाबा नाच करत होती ती... पण नाचायला लाजत होतो मी मग म्हणाली जम्प जम्प... आता मी मारली उडी केला दंगा मग काय केला मस्त बिंदास चिखल... तोच तो जुना... बिंदास चिखल! #सशुश्रीके । जुलै २०१६

वाट

वाट पाहणे संपत नाही... जागा बदलतात माणसं बदलतात स्वप्न बदलतात वय वाढतं अपेक्षा वाढतात वाढतात नाती वाट पहायची सवय लागते वाट सोडण्याची गरज वाटते वाट दाखवण्याचे धाडस लागत...

तू झोप...

अंगाई गाते हं... तू झोप... जा स्वप्नांच्या दुनियेत... भीज पावसात, खेळ चिखलात, मार उड्या गाद्यांवर, कर उद्योग नको ते, पहा कार्टून्स दिवसभर, खा चॉकलेट्टं न बिस्किट्टं, पी कोल्ड्रिंक न आंबट ढाण ताक, चोख ते पेप्सीकोले, काले खट्टे, वाळा न आरींज गोळे, बघ टीवी डोळांच्या काचा होई पर्यंत, ऎक ती धांगड-धिंगा गाणी, फीर त्या भर उन्हात अनवाणी, उशीरा झोप, उशीरा उठ उठ आता तरी उठ, उठ की घालू कंबरड्यात लाथ? आई... आई पाचच मिनटं! अजून माझी बॅटिंग यायच्ये, बॉल हरवला की आलोच! अरे! डोळे उघडले... आता ऑफिस आता चहा कॉफी आता ट्राफिक आणि दगदग आता बॉस आणि प्रेजेंटशन आता क्लाएंट आणि मीटिंग्स आता फायली आणि कॅलक्युलेटर पण, 'अंगाई' पासून... 'उठ रे बाळा' ऐकण्यासाठी तो गळा... मागे वळून पळा... असेल तोच लळा अंगाई गाते हं... तू झोप... #सशुश्रीके | १७ ऑगस्ट २०१६ | ०१.५५

भूतकाळ सुरु होतो...

Image
मोकळं आकाश मोकळा तो रस्ता सकाळची वेळ कोवळ्या उन्हाचा तो खेळ सदा सडा प्राजक्ताचा त्यांवर राज्य ते दवाचं कंसात काळजी त्या फुलांची बळी जाई पावली नकळत मागे अंगणात वृंदावनं मुंग्या जणू देती पहारे कधी साखर कधी नारळाचे कधी ताट नैवेद्याचे मागे विहीर दगडी अखंड थंडगार त्यात पाणी काठावर शेवाळं सुंदर जणू सांगे विहिरीची कहाणी गोठ्यात जीव काळे हंबरती तहानेने जोरात साखळी सोडता हळूच वाट जाई थेट हौदात त्यात ठप्प-ठप्प आवाज कधी कैऱ्या कधी नारळ कधी पक्षांचा जीर्ण पानांचा असं शांत ते वादळ अश्या ह्या आठवणी आता झाली ती स्वप्न भूतकाळ सुरु होतो वर्तमान ठेऊन गहाण #सशुश्रीके । ८ जून २०१६

।। प्रश्नावली ।।

बाबा बाबा दमलास का? बाबा बाबा दमलास का? ऑफिसच्या कामांनी थकलास का? जरा मोबाईल बाजूला ठेवतोस का? मग टीव्ही समोर असा बसतोस का? माझ्याशी जरा खेळतोस का? खेळणी जरा मांडतोस का? पत्...

दवाई-ऐ-गुलजार!

Image
इलाज करवाते हम वही से... जहा जख्म होते है दवाई के लिए जहां पल गुजरे बिना घडी के, जहां हो थोडीसी जमी थोडा आसमां, जहां चाँद पोहोचे बिना इजाजत के, जहां हो मुसाफिर का ठिकाना, जहां आए जाने वाला पल पलट के, जहां दो दीवाने एक शेहर मे, जहां सजते है सपने सात रंग के, जहां पहचान होती है आवाज से, जहां अरमां हो पुरे दिल के, जहां सपनों में दिखे सपने, जहां रात हो ख़्वाबों की, जहां गले लागए झिंदगी, जहां ना हो कोई शिकवा झिंदगी से, जहां नाराज ना हो झिंदगी , जहां हैरान ना हो झिंदगी, इलाज करवाते हम वही से... जहां जख्म होते है दवाई के लिए दवाई-ऐ-गुलजार! #सशुश्रीके | १९ अगस्त २०१५ । १.४८

आज एक अचानक आठवलं!

अन्वयाच्या रोजच्या चीत्रांनी... आज एक अचानक आठवलं! लाकडाच्या बेंच वरती करकटानी, जिव ओतून काढलेली चित्रं! न त्याच बेंच वर 'माझी जागा इतकी!' म्हणून रेश आखणारे… सो कॉल्लड मित्र! घरी जायची पत्र, पालक मीटिंगची धास्त! तुमचा मुलगा 'ह्यावच' नी 'त्यावच', थोडक्यात जरा व्र्यात्य... म्हणे घाला की त्याला हॉस्टल मध्ये, सुधरेल बघा मग कसा… कमी नाही जास्त! कॉपी करायची हिम्मत नाही! अभ्यास करायची इच्छा नाही… मग काय अधोगती चे प्रगती पुस्तक, डोक्यात बघावं तेव्हा 'ठकठक' किंवा 'चंपक' मधल्या सुट्टीची ओढं, मग खेळासाठी घोडदौडं! आणि आम्ही काही ४-५ डोकी, कधी क्रिकेट न कधी हॉकी! उरल्या सुरल्या वेळेत डबा… मग टण-टण वाजे घंटा! आपली आपली जागा घेऊन,  तात्पुरता संपे आमचा दंगा! कसाबसा जायचा तो दिवस! आणि शेवटची घंटा ऐकताच, वाटे जग आता आपलेच… सायकलचे लॉक काढताच! झापाझप, रपारप पैडल सायकल… मागे टाकू प्रत्येक गाडी न मोटारसायकल! आईकडे काय खायला मागायचं!? ह्याचेच चिंतन जास्तं! हात पाय नं धुता, आजीच्या मिठीत सिद्धा! काय मस्त ते फिलींग… तेच...

आज तो जाना पडेगा...

आज तो जाना पडेगा, जाएंगे, कभी तो जाना पडेगा, नीचे होंगे चाहने वाले, उछालेंगे प्यार से, नाम देंगे, प्यार देंगे, घर होगा, दोस्त होंगे, रिश्ते बनेंगे, होगी रंगीन राते, रहेगी जिंदगी दिन दिन, चलेगी गरम हवा दिन दिन, आएगी बाढ दिन दिन, जब आएगा आखरी दिन, तब आएंगे वापस, अब तो जाना पडेगा, आज है मेरा जन्मदिन, आज तो जाना पडेगा... #सशुश्रीके

माझी पोर ही माझी पोर!

।। श्री ।। माझी पोर जीवाला घोर बनून चोर कच्चा दोर कधी शांत थोर कधी मोठा शोर माझी पोर ती माझी पोर बारीक चण अंगात लै वणवण नुसती भणभण रोज तीच तीच गाणी चर्वण पण पण शेवटी माझीच हो.. माझीच ती पोर जीवाला घोर कधी जोरात मीठी  मनात आलं तर पप्पी लहान होतो क्षणात नाही कोणाची भीती तरी शिकवतो मधून मधून अती तेथे माती सारखं सांगतो... असलं तर सूत नाहीतर भूत अन्वयात काय नाही!? 'पेशंस' बाबात काय नाही!? उत्तर तेच... 'पेशंस!' काय शिक्लास बाबा आता सांग म्हणे हे माझं पोर... एकच पुरे नो मोर नो मोर... जीवाला घोर... जीवाला घोर माझी पोर ही माझी पोर! #सशुश्रीके (समीर शुभदा श्रीकृष्ण केतकर) १५ मे २०१५