काच...

मध्ये एक काच असते
कधी साधी कधी काळी
असते एक नेहमी...

कधी वेगात
कधी थांबलेली
कधी अर्धी उघडी
कधी पूर्ण
कधी दुधाळ
कधी स्पष्ट
कधी स्वच्छ
कधी मळकट
कधी नंबरी
कधी नुसती
कधी गारठून रडणारी
कधी उन्हाने तडकणारी
कधी थंड, कधी गरम पाजणारी
कधी प्रतिबिंब जपणारी
कधी फ्रेम मध्ये अडकलेली
कधी आवाज करणारी

नेहमी असते एक

असते एक..
आज पण आहे.

काच...
जे आहे ते दाखवणारी.

#सशुश्रीके | २५ नोव्हेम्बर २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!