धप्पा

धप्पा / भोज्जा हा शब्द उच्चारायला जितकी मजा यायची तितकीच भीती असायची आपल्या मागून ऐकायला... तो शब्द ऐकला की परत ये रे आपल्या मागल्या! परत शोधा सगळ्यांना, नियम असले तरी ते पाळतय कोण, काही मुलं साली घरी बसून चहा-पोळी तोडत बसायची काही गच्चीत जाऊन लापायची... पण काही काका / आजोबा मंडळी मदत करायची, कारण नियम त्यांनाही माहिती असावेत! 

त्यांच्या ह्या अमूल्या मदतीने कधी कधी ते नको असलेलं राज्य संपायचं! हुश्श... सर्व पकडले गेले, पहिला जो पकडला गेला तो प्रामाणिकपणे राज्य तरी घ्यायचा नाही तर पळ काढायचा, मग तो गेल्यावर त्यानंतरच्यावर राज्य! 

असो... जेव्हा 'धप्पा'दायक बातमी साठी आपले हात शिवशिवतात तो क्षण कसला भारी असतो... आणि राज्य घेणारा नेमका चुकून वळून बघणार ह्यासारखं दुर्दैव नाही जगात... हो, असे क्षण पण वाट्याला येतात! पण फार क्वचित, फारच बलवत्तर असावं लागतं नशीब अगदी मोक्याच्या वेळी धप्पा परतवण्याचं! 

तर एवढं सगळं का सांगतोय, तर आता भारत सरकारने पण असला जबरदस्त धप्पा दिलाय... आणि तो पण न चिटिंग करता, नियमात राहून! 

ज्याला धप्पा दिलाय तो सोडून सगळे खुश, हे राज्य असेच चालो! असे अनेक धप्पे वेळोवेळी मिळत राहो. 珞 

करत नाहीत नुसत्याच गप्पा..
दिलाय मस्त दणदणीत धप्पा!

#सशुश्रीके | १५ नोव्हेम्बर २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!