वस्तू



दर वर्षीच माटुंगा मध्ये पाणी साचतं, त्यावर्षी ही तसेच, २००४/०५असेल नीट आठवत नाही, नवीन नोकरीचे पहिले काही वर्ष, त्यामुळे खर्च जरा जपूनच करावा लागायचा... आणि काही महाग वस्तू घेतली की त्याची 'किंमत' जरा दुप्पट असायची.

असो... तर झालं काय, मी घेतलेले नवीन बूट! ज्यादिवशी घेतले त्यादिवशी निळं आकाश, दुसऱ्या दिवशी सकाळी ही तसंच, पण दुपारी निळं आकाश राखाडी झालं, आणि संध्याकाळी काळं, धो धो नॉन स्टॉप पाऊस, माटुंग्याची हालत काय झाली असणार ह्या कल्पनेनीच मी भिजलेलो, प्लॅटफॉर्म बदलला, मुख्य रस्त्याच्या अंदाजे ३-४शेवटच्या पायऱ्या पाण्यात विलीन झालेल्या, माझ्या डोक्यात बूट होते, ते मी हातात घेतले... त्या वेळी काही जास्त विचार न करता हातात बूट घेऊन मी घरी जायला निघालो, अंदाज लावत लावत, जाता जाता एक बाटाचं दुकानही दिसलं, चपला होत्या त्यात, पण चपला घेण्याइतके पैसे नव्हते... पाय पुढे गेले, समुद्रात आपण कसे बिंदास चालत असतो... लागलं तर काय लागेल... शंख शिंपले! इथे मामला वेगळा होता, पण तो विचारच नाही! घरी आल्यावर गानू काकांनी मी केलेला प्रकारचा सौम्य भाषेत निषेध दर्शवला!

आणि त्यांचं खरं ही होतं म्हणा... वस्तू आपल्यासाठी असतात आपण वस्तू साठी नाही!

पण काय आहे ना... कळतं पण वळत नाही! ते हेच 😢🙄😏😂

#सशुश्रीके । १० नोव्हेम्बर २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!