मोठी गाडी, मोठा टीव्ही, मोठं घर

मित्राची जागा होती एका चाळीत,
नाव आठवत नाही,
शनिवार पेठ आणि घाटाच्या बरोबर मध्ये,
चाललं तरी हालायचा मजला,
जागा इतकी लहान की जेमतेम ३लोकांनी पाय पासरले तर लागतील एकमेकांना,
यामुळे घरात सगळच लहान...

लहान टीव्ही,
लहान फ्रीज,
लहान आरसा,
लहान पंखा,
पण मनं मोठी असतात ह्यांची,
हसतमुख चेहरे दिसतात नेहमी,
टेबलावर चहा बिस्किटे येतातच,
काहीच नाही तर माठातल्या पाण्याचा भरलेला तांब्या!

हे सगळं छान वाटतं! 👌

आणि आपण सगळ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो!

मोठी गाडी

मोठा टीव्ही
मोठं घर

😏


#सशुश्रीके 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!