सुपर ड्यूपर!


चावी तीच्या मानेला लावून पिळायची

उजव्या बाजूचा क्लच आणि मोठं अड्जस्ट करत न्यूट्रल ला आहे का नाही तपासायचं

जरासं वाकून पण न बघताच ऑफ चा खटका पेट्रोल आहे की नाही हे आठवत असल्यास ऑन / रिजर्व च्या दिशेने वळवायचा

मग तीच मूठ घट्ट पकडून दुसरा हात पहिल्या सीटच्या मागच्या बाजूला धरून खाली खेचायची

जरा हलवायचं अख्ह अंग जमिनीच्या दिशेने (तिचं) , एकदा किव्वा मूड असेल तर दोनदा

परत मूळपदावर आणून ठेवायची

मग आता उजवी आणि डावी मूठ दोन्ही बिझी करून पायाला आज्ञा द्यायची

नशीब बलवत्तर असेल तर ठीक नाही तर रिव्हर्स किकच्या अपेक्षित झटक्यांसह शरीर सहन करण्यात सज्ज ठेवावे लागायचे

सुरु झाली एका किक मध्ये तर देवाचं नाव घेत उडी थेट सीटवर

दोन्ही पाय आजूबाजूला फायनली

खट्ट कनी पण गियर अलगद टाकल्याच्या अभिनयासकट एक्सलरेटर न वाढवता तिला स्टॅन्ड वरून रस्त्यावर स्थानापन्न करायचे

डावा पाय जमिनीवर ठेवून उजव्या हाताने साइड मिरर सेट करत

दाणेदार आवाज अंग अंग हलायचं असा तो दरारा

आणि...

झेप घ्यायची ती लक्षा कडे

कधी कॉलेज कधी दळण कधी ईथे कधी तिथे

अशी होती

आमची बजाज सुपर, सुपर ड्यूपर!



#सशुश्रीके २८ मे २०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!