Posts

Showing posts with the label sashuhreeke

"अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे"

Image
भारतात न राहता तू का बडबड / पोस्ट करतोस *पेट्रोल* दरवाढी बद्दल असा प्रश्न विचारला एका मित्राने आणि पुलंचा एक संवाद ही चिकटवला... अंतू बर्वा म्हणाला ... "अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे" तसच "अरे जुन्या सरकार ने काय केले ते काय सांगतोस पेट्रोल स्वस्त कर." हे पटलं ही! 😁 शेवटी सामान्य माणसाला जो फटका बसतो तो कोणाला नाही. आणि भारतात राहून तो हे बोलत आहे, त्यामुळं त्याला जे वाटत आहे त्याबद्दल मी काहीही बोलणे चुकिचेच, ही गोष्ट वेगळी की आता कित्येक वर्षे दुबईत दिरहाम १.२ ते १.४ असलेले पेट्रोल गेले काही महिन्यातच महाग होत होत आता दिरहम२.४८ ला आलेले आहे. म्हणे जागतिक बाजारपेठे नुसार रोज कमी जास्त होत राहणार, स्थिर राहणार नाही आकडा, पण हा आकडा वाढत जात आहे हे नक्की. बॅरल रेट $१५० चा $७५ वगैरे झाला असेल तरी. असो ... सध्या पेट्रोल दरवाढ का थांबत नाही किंवा स्वस्त का होत नाही ह्यावर मोर्चे संप बाचाबाची ओढाताण मतभेद सगळं होत आहे, अमुक अमुक देशात स्वस्त आहे, आपल्याकडे का नाही? सरकार ने दिलेल्या अश्वसनाचे काय झाले! • लग्ना आधी तुमच्या मुलीला सर्व सुख-...

गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋

मॅच मध्ये रनौट व्हायचे किस्से सांगत होते मित्र एकमेकांना तेव्हा आठवलं 😆 मॅच असताना रन्स काढताना काय धडधडायचं छातीत! फुफ्फुस बाहेर येईल आणि शांत हो म्हणेल असं वाटायचं चायला... भलतच थ्रिल होतं ते! आणि धावून श्वास घेई पर्यंत तो मरतुकडा पण लै फास्ट बॉलर दुसरा बॉल घेऊन धावत येताना दिसायचा, तेव्हा पळून जावसं वाटायचं अक्षरशः 😣 एकदा गोट्यांवर फुलटॉस आलेला... थेट गेलो टीचर्स रूम मध्ये ... असला आडवा झालो विव्हळत ... तेव्हा तो सिलिंग वरचा पंखा हेलिकॉप्टर च्या पंख्यासारखा वाटत होता! फिल्डिंग च्या वेळी तर हातात बॉल आणि बळ दोन्ही आलं तर ठीक नाही तर ह्या शिव्या! गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋   #सशुश्रीके ०९.०९.२०१८

संतवाणी

Image
संतवाणी, हो हो संतवाणीच जणू ! हार्मनी मधली रहमानची वाक्ये म्हणजे... संतवाणी A.R. Rahman आत्तापर्यंत इंटरव्यू ला उत्तरे द्यायचा.. #Harmony with A.R.Rahman ह्या मालिकेत तो इंटरव्यू घेत आहे, आणि अधूनं मधून commentary पण देत आहे. जीवन कसे जगावे, कसे वागावे, काय साध्य करावे. किती सहजतेने सांगतो तो, तेही संगीताच्या माध्यमातून! मी लक्ष देऊन ३-४ दा ऐकले आहेत सगळे एपिसोड्स म्हणून असं लिहिलं आहे मालिकेच्या २ऱ्या भागात, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी त्या विषयातले अज्ञान गरजेचे असते, आणि अज्ञान किती आहे हे जो जाणून घ्यायचा प्रयत्न करेल तोच पुढे जाईल... असं काहीसं बोलला तो आता नीट समजावून सांगता येत नाहिये, पण प्रत्येक वाक्याचा शेवट संगीताने(विषयाने) केलाय त्याने. संगीत माध्यमातून संतवाणीच ना ही! #सशुश्रीके

सुपर ड्यूपर!

Image
चावी तीच्या मानेला लावून पिळायची उजव्या बाजूचा क्लच आणि मोठं अड्जस्ट करत न्यूट्रल ला आहे का नाही तपासायचं जरासं वाकून पण न बघताच ऑफ चा खटका पेट्रोल आहे की नाही हे आठवत असल्यास ऑन / रिजर्व च्या दिशेने वळवायचा मग तीच मूठ घट्ट पकडून दुसरा हात पहिल्या सीटच्या मागच्या बाजूला धरून खाली खेचायची जरा हलवायचं अख्ह अंग जमिनीच्या दिशेने (तिचं) , एकदा किव्वा मूड असेल तर दोनदा परत मूळपदावर आणून ठेवायची मग आता उजवी आणि डावी मूठ दोन्ही बिझी करून पायाला आज्ञा द्यायची नशीब बलवत्तर असेल तर ठीक नाही तर रिव्हर्स किकच्या अपेक्षित झटक्यांसह शरीर सहन करण्यात सज्ज ठेवावे लागायचे सुरु झाली एका किक मध्ये तर देवाचं नाव घेत उडी थेट सीटवर दोन्ही पाय आजूबाजूला फायनली खट्ट कनी पण गियर अलगद टाकल्याच्या अभिनयासकट एक्सलरेटर न वाढवता तिला स्टॅन्ड वरून रस्त्यावर स्थानापन्न करायचे डावा पाय जमिनीवर ठेवून उजव्या हाताने साइड मिरर सेट करत दाणेदार आवाज अंग अंग हलायचं असा तो दरारा आणि... झेप घ्यायची ती लक्षा कडे कधी कॉलेज कधी दळण कधी ईथे कधी तिथे अशी होती आम...

स्वप्नं!

Image
दोन प्रकारची स्वप्नं असतात, एक पडणारी एक उभं करणारी!  हो हो... अगदी शब्दशः घेण्या सारखच... #१ - झोपेत स्वप्नं पडतात. आणि... #२ - आयुष्यात एखादी गोष्ट हवी असेल तर हे माझं स्वप्न आहे म्हणतात ना!  असो... काय आहे ना कधी कधी आपण एखाद्या गोष्ट/वस्तू चा इतका विचार करतो की दोन्ही स्वप्न आपटतात एकमेकांना! आणि मग स्वप्नपूर्ती होते किंवा नेमकं उलट. अर्थात स्वप्नातच! पण त्यापुरते का होईना... ते स्वप्न प्रत्यक्षात घडत असल्यासारखा अनुभव मिळतो. लहानपापासून काही अशी स्वप्न आहेत जी अप्रत्यक्षरीत्या लक्षात आहेत, कुठे ना कुठे तरी संदर्भ लागतो आणि कमालीचं आश्चर्य होतं, हे जग वेगळच, प्रत्येकाला हा अनुभव छोट्या मोठ्या प्रमाणात येत असावा! इनसेप्शन सारख्या सिनेमातुन हा विषय वेगळ्याच पद्धतीने मांडलाय म्हणा, पण तो शेवटी सिनेमा आहे... आपल्या आयुष्यात आपण पाहिलेल्या स्वप्नांची लिंक हा एक वेगळाच प्रकार आहे, वेगळं जग आहे हे! कधी ही रिलीज होतो हा स्वप्नांचा बाजार, आणि त्यातले कलाकार वस्तू पण चक्रावून सोडणारे, कधी आनंदात बुडवणारे कधी दुःखात लोळवणारे! चला मस्त झोप झाली...

जाने कहा गए वो दिन!

Image
मुंबईत XXX ओफिस मध्ये एकदा क्लाएंट कडे काम पाठवलं आणि दुसरी काही गडबड नसेल किंवा लन्च टाइम ला आम्ही रँडम नंबर ला कॉल करून काहीही बडबडायचो, एकदा मी असाच एक कॉल लावला, टीपी सुरु झाला, आज काही जमत नव्हतं, म्हणजे रोजच्या सारखी मजा येईना, आमच्या टोळीमधला एक कलीग म्हणाला, चल हो बाजूला मला करुदे आता कॉल! त्याने लावला कॉल (त्यावेळी डिरेक्ट्री असे, त्यामुळे ज्याला फोन लावायचा असेल त्याचं नाव घेतलं की अर्ध काम फत्ते) फोन उचलल्यावर तो म्हणाला Mr कदमजी है, उनसे एक अर्जंट बात करनी है... समोरच्या व्यक्तीने... "सर आपके किये कॉल है" वगैरे सुरु झालं, आणि मग झाला टाईमपास सुरु, "आपने दिये हुए पैसे खतम हो गये सर" अशी काहीही बडबड सुरु झाली हे सगळं संभाषण जवळजवळ ८-१० मिनिट चालू होतं, शेवटी त्या Mr. कदमला ही कळालं असावं की समोरचा टाइम पास करतोय, कारण माझा मित्र इतका सुटलेला की त्याला अधून मधून हसणं कंट्रोल होत नव्हतं, त्यामुळे तो Mr कदम ही मित्राला मस्त उत्तरं द्यायला लागला, शेवटी मित्राचाच पेशन्स संपला, त्याला काळालं की हा आपल्या पेक्षा कलंदर दिसतोय! फुल्ल इम्प्रेस झाला ...

बिंदास चिखल!

आज भिजलो... माझ्या छकुली बरोबर भिजलो! हातात दोघांच्या छत्री होती... पायात दोघांच्या मस्ती होती तिच्या साठीचा 'मडी पडल'... माझ्यासाठी तोच तो पूर्वीचा चिखल नाच बाबा नाच करत होती ती... पण नाचायला लाजत होतो मी मग म्हणाली जम्प जम्प... आता मी मारली उडी केला दंगा मग काय केला मस्त बिंदास चिखल... तोच तो जुना... बिंदास चिखल! #सशुश्रीके । जुलै २०१६