"अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे"


भारतात न राहता तू का बडबड / पोस्ट करतोस *पेट्रोल* दरवाढी बद्दल असा प्रश्न विचारला एका मित्राने आणि पुलंचा एक संवाद ही चिकटवला...
अंतू बर्वा म्हणाला ... "अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे"
तसच "अरे जुन्या सरकार ने काय केले ते काय सांगतोस पेट्रोल स्वस्त कर." हे पटलं ही! 😁

शेवटी सामान्य माणसाला जो फटका बसतो तो कोणाला नाही. आणि भारतात राहून तो हे बोलत आहे, त्यामुळं त्याला जे वाटत आहे त्याबद्दल मी काहीही बोलणे चुकिचेच, ही गोष्ट वेगळी की आता कित्येक वर्षे दुबईत दिरहाम १.२ ते १.४ असलेले पेट्रोल गेले काही महिन्यातच महाग होत होत आता दिरहम२.४८ ला आलेले आहे. म्हणे जागतिक बाजारपेठे नुसार रोज कमी जास्त होत राहणार, स्थिर राहणार नाही आकडा, पण हा आकडा वाढत जात आहे हे नक्की. बॅरल रेट $१५० चा $७५ वगैरे झाला असेल तरी.

असो ...

सध्या पेट्रोल दरवाढ का थांबत नाही किंवा स्वस्त का होत नाही ह्यावर मोर्चे संप बाचाबाची ओढाताण मतभेद सगळं होत आहे, अमुक अमुक देशात स्वस्त आहे, आपल्याकडे का नाही? सरकार ने दिलेल्या अश्वसनाचे काय झाले!

लग्ना आधी तुमच्या मुलीला सर्व सुख-सोई देईन असा प्रत्येक जावाई सांगतो,
मगच लग्न होते, आश्वासन द्यावे लागतेच.
पण प्रत्यक्षात १००% असं काही होतं का? 😆
होत ही असेल पण बायको (जनता) समाधानी असते का? 😜

सासरेबुआ म्हणजे जनता(सत्तेच्या आधीची जनता) आहे, 😌
आश्वासन हे पेट्रोल(सुख सुविधा) आहे असं समजा,
पेट्रोल कसे मिळवायचे, तुमच्या कडचे पेट्रोल कसे वापरायचे ते तुम्ही ठरवा!

पब्लिक ट्रान्सपोर्ट / शक्य असेल तर पायी किव्वा सायकल / एक गाडी असेल तर शेर करावी वगैरे.
हे फारच बालिश/अन-प्रॅक्टिकल काही तरी बोलत आहे असे वाटत असेल तर अजून काही तरी मांडतो...
• आता आत्ताच्या सरकार ने काय करावे ह्यावर...👇

सरकार ने पेट्रोल दर / त्यावरील कर कमी करून चैनी गोष्टींवर तो भार टाकावा. सिगारेटी, दारू महाग झाले म्हणून भारतात कोणी संप / उपोषण किंवा तत्सम काही करेल असे वाटत नाही. एक सिगारेट १५ च्या ऐवजी ५० करा, बीयर जी काय किमतीला असेल त्याच्या दुप्पट करा. लोकं गपचूप भरतील पैसे... सरकार कुठलेही असो, नशा आणि चैनीच्या गोष्टी महाग करा. ऑस्ट्रेलिया असो युरोप असो वा अमेरिका, ज्यांना परवडत नाही त्यांना सिगारेट ओढताच येत नाही... पण तिथे भारतापेक्षा कमी दरात आहे पेट्रोल! बघा विचार करून... ते भाजप / काँग्रेस ने काय केलं काय करत आहेत ते सोडा!

#सशुश्रीके ११.०९.२०१८


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!