गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋

मॅच मध्ये रनौट व्हायचे किस्से सांगत होते मित्र एकमेकांना तेव्हा आठवलं 😆
मॅच असताना रन्स काढताना काय धडधडायचं छातीत!
फुफ्फुस बाहेर येईल आणि शांत हो म्हणेल असं वाटायचं चायला...
भलतच थ्रिल होतं ते!

आणि धावून श्वास घेई पर्यंत तो मरतुकडा पण लै फास्ट बॉलर दुसरा बॉल घेऊन धावत येताना दिसायचा,
तेव्हा पळून जावसं वाटायचं अक्षरशः 😣

एकदा गोट्यांवर फुलटॉस आलेला...
थेट गेलो टीचर्स रूम मध्ये ...
असला आडवा झालो विव्हळत ...
तेव्हा तो सिलिंग वरचा पंखा हेलिकॉप्टर च्या पंख्यासारखा वाटत होता!

फिल्डिंग च्या वेळी तर हातात बॉल आणि बळ दोन्ही आलं तर ठीक नाही तर ह्या शिव्या!

गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋

 
#सशुश्रीके ०९.०९.२०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!