Posts

Showing posts with the label father

Father's day

Image
Father's day होता म्हणे काल, काय आहे ना... माझ्यासाठी जवळपास रोजचं आहे हे, आजूबाजूला इतक्या वस्तू आहेत, मनात आठवणी इतक्या आहेत... त्यात तो गाड्यांचा / छायाचित्र काढायचा छंद! अगदी पदोपदी आहेत बाबा माझ्याबरोबर... कळत नकळत अखंड बाबांच्या आजूबाजूलाच असतो मी, काल नेमका हा जागतिक दिवस असताना बाबांबद्दल काही लिहिलं नाही ह्याची रुखरुख नको म्हणून लिहितोय आता. जे आहे ते आहे.. विसरलो! त्यात मॅच होती... हो हो मॅच च्या पण आठवणी आहेत. काय लिहू काय नको असं झालय आता. असो... बाबा सगळ्यांनाच असतात, कोणी जवळ असतात कोणी लांब असतात, शेवटी बाबा ते बाबाच... आपण लहान असतानाचे बाबा आणि मोठेपणातल्या बाबांचा आपला प्रवास कसा घडतो ह्याबद्दल विचार केला की प्ले बटण आणि पुढे सरकणारी कैसेट आठवते... ती A साईड आणि मग B साईड! काय तुम्ही समजायचात त्यांना आणि काय त्यांचा मनात असेल, हे सगळं आता बाप झाल्यावर कळतं, कैसेट संपल्यावर! 😢 आणि ती कैसेट परत ऐकायची असेल तर इजेक्ट नावचं बटण देवाने काढून घेतलेलं असतं, आली का पंचाईत! 😤मग काय करा रिवाईंड... ऐका ती साईड B! द रिअल साईड ऑफ लाईफ. रट्टा मारून डोळ्यातून पाणी काढणारे...

#बाबा तू...

Image
बाबा तू... एक हिरो होतास तू, एक व्हिलन पण होतास तू, जसा हसवायचास तू, तसा रडवायचास पण तू. किती तरी दूर राहून जवळ होतस तू, एखाद्या सेलिब्रीटी सारखा जणू, भासलास तू. माझ्या हट्टांना क्वचितच 'नाही' म्हणालास तू, स्वतःचं दुःख कधीच सांगितलं नाहीस तू. आणि मग... फारच लवकर सोडून गेलास तू! तू परत ये रे तू... एकदा भेटू, एकदा हातात हात दे तू... एकदा मिठी मार तू, एकदा काही तरी चमत्कार घडव तू! कारण बाबा तू... तू माझा हिरो होतास, आज ही आहेस तूच. नक्की परत ये तू... तुझ्या साठी अजून ही तोच समीर, कोणी वाढू दिलाच नाही जणू... अजून ही बालिश, तोच गोरा घारा, तुझ्या कैमेराचा तारा! तू माझे काढलेले शेकडो फोटो... ते बघताना नेहमी दिसतोस केमेऱ्या मागचा तू! बघ बरं... तो शेवटचा रोल का निगेटिव्ह सोडलायस तू

यूनिक प्रदीप येरागी.

Image
यूनिक प्रदीप येरागी. ह्याला पहिल्यांदा २००६ ला भेटलेलो, मुंबईत कामाला होतो तेव्हा, तशी बऱ्यापैकी मोठी होती एजेंसी त्यामुळे ४-५ क्रिएटिव ग्रुप्स होते त्यातल्या एका ग्रुप मध्ये तो ज्वाइन झालेला. प्रोफेशनली इतका काही जास्त संबंध नाही आला, आणि तो ज्वॉइन झाल्यावर मी सोडला जॉब ७-८ महिन्यातच, असो... पण महत्वाचं काय, त्या कालावधीतही छोट्या छोट्या किस्यांमुळे तो लक्षात राहिला...जॉब सोडून नंतरच्या काळात ही खुप धमाल केली, एकंदरीतच खुप अवली होता! जास्त न वाढु देण्या इटपत केशरचना, ५-१०% पांढरी झालेली 2mm दाढी, आणि पिळदार मिश्या... मध्येच कुडते वगैरे घालून यायचा, फेटा काय बांधायचा! मस्त दाणेदार नाना टाइप आवाज आणि वन-लाइनर जोक्स मारण्यात जाम पटाइत! बोलताना तंद्री लागल्यासरखा मिशीला पिळ देत सीरियस टोन मध्ये बोलायचा आणि हळूच मध्ये एक जोक सोडायचा, मग समोरचा हसला नाही तर मी नाव बदलेन! इतका विरोधाभास, असा येरागी. बुलेट, यझदी चालवणारा, जुन्या गोष्टींवर भयंकर जीव असणारा, आम्ही मित्र मंडळी तर त्याला रेट्रो/व्हिंटेज मैन म्हणायचो! मुंबईत जॉबला होतो तेव्हा इतका भेटलो नाही जितका नंतर, दूबईतुन मुम्बई-पुण्...

आज ना...

॥श्री॥ नेहमी प्रमाणे आजही उशीर झाला घरी यायला... झोपे साठी सज्ज झालेली माझी पोर.. आल्या आल्या बेड वरनं उठून... पळत...मला मीठी मारली... मग मी तीला जवळ घेऊन नेहमी प्रमाणे आज दीवसभर का...

पत्र

Image
॥श्री॥ आज जरासा दमलेलो... रोजच्या पेक्षा जरा जास्तं होतं काम आज... मग न टाइम पास करता वेळेत निघण्याच्या दिशेनं केलं... आलो घरी ९वाजता.. दिवसभर व्हत्साप पण कमीच पाहिले... घरी आल्यावर कोणी कोणी काय काय पाहण्यात १०मिनट गेली... स्क्रोल करताना गानु काकांचा इनबॉक्स मध्ये म्हणजे पर्सनल मध्ये मेसेज, ग्रुप पेक्षा कोणी पर्सनल मेसेज केला असेल तर त्याला नक्कीच आधी प्राधान्य/आदर देऊन पाहतो, त्यात गानु काका आणि फालतू फॉरवर्ड्स वगैरे अशक्य... असो, २ फोटोंसह मेसेज होता... [12/01 9:09 pm] Anand Ganu: letter from ARUN from Doha....24 /08/1978 wachaniya  patra ahe फोटो होते पत्राच्या पुढच्या आणि पाठच्या भागाचे... वाचताना असं वाटलं की सगळ आत्ताच घडलय! ७८ची गोष्ट! आणि पेपर वर पत्र लिहिण्या आधी डाव्या बाजूला गणपती... मग जागा सोडून मजकूर! काय छान विचार... मन मोकळे पणा आणि हुरहुर, आनंद, दुःख... सर्व होतं त्या पत्रात! त्या पत्रांचे दिवस गेले... ओलावा गेला नी आत्ताचे हे कोरडे मेसेजेस उरलेत! खरच काय किम्मत असेल ह्या डाटा नामक मेसेजेस ना! काहीच 'इतिहास' नसलेलं काम, असो... जाउदे, ...

काल... म्हणजे २०मार्च... बाबांना जाऊन एक तप उलटले.

काल म्हणजे २०मार्च... बाबांना जाऊन एक तप उलटले. एक व्यक्ती नसणे ह्याचा किती फरक पडू शकतो... ह्याची वारंवार जाणीव होत असते... अगदी वर्तमानापर्यंत! वडील नसणे हे तेव्हा तर ईतकं जाणवतं जेव्हा लोकं विचारतात आई वडील कुठे राहतात/असतात... मग बाबा नाहीत हे सांगायला शब्द थोड़े पडतात... आता स्वतः मी बाबा आहे, मूल काय असते ह्याची हळू हळू जाणीव होउ लागली आहे, चिंता आनंद ह्यांची भेळ असते बाबा असणे म्हणजे, बाबांचं मन जाणून घ्यायला तेव्हा मी जरी लहान असलो तरी त्यांच्या आठवणींमुळे त्यांना वारंवार भेटता येतं! त्यांनी माझ्यासाठी खुप एपिसोड्स मनात रेकॉर्ड करवुन ठेवलेत... त्यासाठी देवाला प्रचंड धन्यवाद! खुप लाहानपणापसुनचे बाबा आणि शेवटपर्यंतचे बाबा अगदी बारकाव्या सहीत आहेत... त्यांच्या हांतावरच्या नसा, कपाळावरचा भांग, फ्रेंच दाढी, आपल्या लोकांत दिल खुलास बोलायची स्टाइल, लोकांबद्दलचा आदर, धार्मिक ओढ, टेक्नोलॉजी/वाहनप्रेम, चित्रकला कौशल्य आणि बरच काही. अजुन काही लिहायचं सूचत नाही... जुनी लिंक परत शेयर करतो *अरुण म्हणायचे त्यांना... पाळण्यातले नाव श्रीकृष्ण!* http://sashushreek...