आज ना...

॥श्री॥

नेहमी प्रमाणे आजही उशीर झाला घरी यायला... झोपे साठी सज्ज झालेली माझी पोर.. आल्या आल्या बेड वरनं उठून... पळत...मला मीठी मारली...

मग मी तीला जवळ घेऊन नेहमी प्रमाणे आज दीवसभर काय काय केलेस विचारले...

तीचं उत्तर-
"आज ना...
आज ना...
मी डोसा खाला
माझ्या बरोबर मोजो काका, (मनोज काका)
टेंटू, (सुरश्री मावशी)
नीयम काका, (नीलम काका)
अमुता माशी... (अमृता मावशी)
.
.
.
.
हे कोणीच नव्हते!"

"हे कोणीच नव्हते" हे वाक्य ऐके पर्यंत मी आणि अमृता एकमेकांकडे गोधळून पहात होतो...

मग "हे कोणीच नव्हते" ऐकल्यावर मी जे काही हसायला लागलोय!!!

पण तरीही... मला बघुन तीने काहीतरी चुकल्यासरखा चेहरा न करता आपली बडबड चालू ठेवली!

😝

मग काय बाबानी खुश होऊन 1बिग स्टार एंड 1बिग मून ऑन बोथ हैंड्स यो!

#सशुश्रीके । ६ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!