पत्र
॥श्री॥
आज जरासा दमलेलो...
रोजच्या पेक्षा जरा जास्तं होतं काम आज...
मग न टाइम पास करता वेळेत निघण्याच्या दिशेनं केलं...
आलो घरी ९वाजता..
दिवसभर व्हत्साप पण कमीच पाहिले...
घरी आल्यावर कोणी कोणी काय काय पाहण्यात १०मिनट गेली...
स्क्रोल करताना गानु काकांचा इनबॉक्स मध्ये म्हणजे पर्सनल मध्ये मेसेज,
ग्रुप पेक्षा कोणी पर्सनल मेसेज केला असेल तर त्याला नक्कीच आधी प्राधान्य/आदर देऊन पाहतो,
त्यात गानु काका आणि फालतू फॉरवर्ड्स वगैरे अशक्य...
असो, २ फोटोंसह मेसेज होता...
[12/01 9:09 pm] Anand Ganu: letter from ARUN from Doha....24 /08/1978
wachaniya patra ahe
फोटो होते पत्राच्या पुढच्या आणि पाठच्या भागाचे...
वाचताना असं वाटलं की सगळ आत्ताच घडलय! ७८ची गोष्ट! आणि पेपर वर पत्र लिहिण्या आधी डाव्या बाजूला गणपती...
मग जागा सोडून मजकूर!
काय छान विचार...
मन मोकळे पणा आणि हुरहुर,
आनंद, दुःख... सर्व होतं त्या पत्रात!
त्या पत्रांचे दिवस गेले...
ओलावा गेला नी आत्ताचे हे कोरडे मेसेजेस उरलेत! खरच काय किम्मत असेल ह्या डाटा नामक मेसेजेस ना!
काहीच 'इतिहास' नसलेलं काम,
असो... जाउदे, लिहायचं काय आणि लिहितोय काय... लिहितपण नाही हो... हे कसलं लिहिणं! TYPE करतोय!
बोटांचे व्यायाम... ट्रेडमिल म्हणा बोटांचं!
पण जुनी पत्रं कायमची घर करून राहतात...
पत्र ही जुनीच कारण आता कोणी एकमेकांना पत्र पाठवलय वगैरे ऐकिवात नाहीच,
पुढच्या वेळी घरी जाईन तेव्हा सगळी पत्र हुडकुन काढणार आहे! त्या जुन्या जीर्ण कागदांना...
त्या शुभेछांना... त्या जवळच्या असूनही लांबच्या नात्यांना... त्या सुंदर अक्षरांना...
सर्वाना भेट देणारे!
पत्र 'लिहिण्याचा' अनुभव जरी नसला तरी वाचून जो काही 'आनंद' मिळालाय आज... काका थैंक यू वन्स अगेन... ह्या आठवणींना जपल्या बद्दल!
#सशुश्रीके | १३ जानेवारी २०१४ रात्रीचे १२.००

Comments
Post a Comment