Posts

Showing posts with the label music

संतवाणी

Image
संतवाणी, हो हो संतवाणीच जणू ! हार्मनी मधली रहमानची वाक्ये म्हणजे... संतवाणी A.R. Rahman आत्तापर्यंत इंटरव्यू ला उत्तरे द्यायचा.. #Harmony with A.R.Rahman ह्या मालिकेत तो इंटरव्यू घेत आहे, आणि अधूनं मधून commentary पण देत आहे. जीवन कसे जगावे, कसे वागावे, काय साध्य करावे. किती सहजतेने सांगतो तो, तेही संगीताच्या माध्यमातून! मी लक्ष देऊन ३-४ दा ऐकले आहेत सगळे एपिसोड्स म्हणून असं लिहिलं आहे मालिकेच्या २ऱ्या भागात, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी त्या विषयातले अज्ञान गरजेचे असते, आणि अज्ञान किती आहे हे जो जाणून घ्यायचा प्रयत्न करेल तोच पुढे जाईल... असं काहीसं बोलला तो आता नीट समजावून सांगता येत नाहिये, पण प्रत्येक वाक्याचा शेवट संगीताने(विषयाने) केलाय त्याने. संगीत माध्यमातून संतवाणीच ना ही! #सशुश्रीके

स्पीड डेमन!

आज खूप दिवसांनी मायकल जॅक्सनची गाणी परत ऐकतोय, आमच्या कडे एक व्हीएचएस होती, त्यात काही जुनी इंग्लिश गाणी होती त्यात एक मायकलचं पण गाणं होतं, ते पाहिल्या पासून ह्याचा फॅन झालेलो. त्याची गाणी तर हिट असायचीच पण जास्त मजा यायची व्हीडीओ पाहायला, जणू 'मिनी मूव्ही'च! स्पीड डेमन... https://youtu.be/uZEGu-TA2cU गाणं काही खास नाहीये इतर मायकलच्या गाण्यांच्या तुलनेत, पण ह्या व्हीडीओ मध्ये एक अफलातून वेग आहे आणि तो पण स्टॉप अनिमेशन मध्ये... अनिमेशन मधला सगळ्यात अवघड प्रकार, एक न एक फ्रेम साठी प्रचंड कष्ट, त्यात खरा खुरा मायकल जॅक्सन त्यात त्याच्या अशक्य फास्ट स्टेप्स... ह्या सगळ्याची मस्तच मांडणी, जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा हे कसं बुवा केलं असेल असा प्रश्न पडायचा, मग जस जसं एनिमेशन इंडस्ट्री बद्दल कळत गेलं तसं ह्या व्हिडिओबद्दलची उत्सुकता अजूनच वाढत गेली! कालांतराने कॅसेट्स गायब झाल्या, आता युट्युबने परत आठवण करून दिली! व्हीडीओच्या शेवटी 'नो एन्ट्री' सारख्या फलका मध्ये 'एर्रो' ऐवजी मायकलच्या पाय दाखवले आहेत! त्याच्या जवळपास सर्वच म्युजिक व्हीडीओज मध्ये शेवट असाच खास असतो....

शरद मामा

Image
शरद मामा माझा सख्खा मामा... शरद मामा, भटजी... सध्या पालीला असतो. दोन मुलीआहेत, एकिचं लग्न झालंय आणि दुसरी अजून शाळेत आहे. दात पुढे, केस तरुणपणीच पांढरे झालेले, रव्याच्या लाडू वरचा जसा रवा दिसतो तशी १-२एमेम दाढी,पोटाचा गोलाकार वयोमानानुसार वाढत गेलेला, शर्ट-धोतर किवा आखूड प्यांट,बाटा सैंडेक किंवा कोल्हापुरी चपला, कपाळाला गंध, अखंड सर्दीने ग्रस्त,काही कोणाचं (त्याच्या पेक्षा वयानी कमी असलेल्यांपैकी) चुकलं की क्षणात खेकसणारा, हातात अडकित्ता तोंडात तंबाखू, अस्सल कोकणस्थ ठेका बोलताना,मनसोक्त खळखळून हसणारा, मोठा कान असलेला माझा सक्खा मामा... शरद मामा आम्ही मुंबईत राहत असताना आमच्या कडे काही दिवस राहायला होता, आपणासर्वांमध्येच काही अवगुण असतात छोट्या मोठ्या प्रमाणात तसे त्यातही होते त्यामुळे आमच्या घरी काही जास्त टिकला नाही तो... मग नंतर ठाकूरली, डोंबिवली येथे स्थाईक झाला, स्वतःचं असं घर घ्यायला जमले नाही त्याला. ते पागडी का काय ते, त्यावरच. असो, मूळचा अक्षीचा. अलिबाग-रेवदंडा मधलं छोटंसं गाव. तिथे माझे आजोबा म्हणजे - 'पुरुषोत्तम जनार्दन भावे' (आप्पा म्हणायचे सगळे त्य...

दीड वाजला...

Image
१ वाजायला आला आता भूता सारखा लिफ्ट नी खाली जाणार लिफ्टचा दरवाजा उघडणार मी चावी काढणार किल्लीचं बटण दाबणार गाडी डोळा मारणार मी गाडीत गाडी रस्त्यावर रस्ता वर जाणार बीफोर बीथ्री बीटू बी१ रस्ता गाडी खाली मी गाडी वर ब्लूटूथ कन्नेक्ट गाणी ऑन सपा सप दिल चाहता है पांढऱ्या पट्ट्या १२०वर क्रुझ कंट्रोल आधी मागे मग पुढे… डोळे उघडे… डोकं बंद डोकं बंद… रस्ता चालू रस्ता चालू … शेवटचा सिग्नल तो ही चालू पार्किंगचं बटण… फाटक चालू गाडी बंद, मी जमिनीवर… गाडीला हात तोंडात हम्म हम्म सो गया हम्म हम्म ये जहां लिफ्ट बी जी एम वन टू टूवनफोर… चावी फिरवून मी आत… काळोख अंधार चाचपडत, मोजे येथे बूट तिथे किल्ली ची कीर कीर डोकं चालू काय लिहू … समीर झोप आता दीड वाजला #सशुश्रीके । २८ ऑक्टोबर २०१४

USB मधली अन्वयाची गाणी!

यूएसबी मध्ये सत्राशेसाठ गाणी आहेत त्यात अन्वयाची २०-३०गाणी असतील...  ट्विंकल ट्विंकल, ओल्ड मैकडोनाल्ड, गोट्या, नाकावरच्या रागाला, चोकोलेटचा बंगला वगैरे वगैरे, शफल वर लावलं की हमखास ६-७गाण्यांमध्ये अन्वयाच्या फोल्डर मधून गाणी लागतात, मग गाडीत अन्वया नसली तरी ती गाणी एकली जातात, आणि कहर म्हणजे कधी कधी ऑफिस मध्येही गुणगुणतो! जग बदलतं मूल झाल्यावर त्याची ही अशी एक बाजू... विदाउट इंडिकेटर मन वळून शरीर पुढे गेल्यासारखा गोंधळ! Shruti Sastrabuddhe replied... Majhya aai cha ek mama ahe..tyala 2 mula zalyavar mulanchya bhashet bolaychi savay zali hoti..to ekda baher jaat hota tar bldg madhle ek gruhasta tyala bhetle ani mhanale "kuthe challat?" Tar to tyanna mhanala "bhoor" :P Minal Jamkhedkar - Hahaha....aani aamchya bhachichi saway ki ti sagle words ulte mhanaychi...topila poti....limbula binlu...tyamule aamhala hi sawayach jhaliye....limbu aanayche asel kiwa hawe asel tar binlu aanaychay ka kiwa binlu detes ka asach hota

#NowPlaying... THE SHADOWS

Image
#NowPlaying... THE SHADOWS आणि त्यांच्या सारखेच THE VENTURES ह्या नावाचे दोन जुने बैंड आहेत, Instrumental जुनी इंग्लिश गाणी! ईतकी ऐकलीत लहानपणी की प्रत्यक्ष न ऐकता ही सुंदर ऐकता येतात, लहानपणी नसती ऐकली तर ईतका नसता जिव्हाळा ह्या बैंड बद्दल. तसे पाहिले तर THE VENTURES हे THE SHADOWS पेक्षा आधीचे, पण THE SHADOWS च्या मधला गोडवा जरा जास्त भावतो. THE SHADOWS मुळचे ब्रिटीश, क्लीफ्फ रिचर्डनी स्थापना केली ह्या ग्रूपची. 'आपाचे', 'वॉक-डोंट रन', 'राय्डर्स इन दी स्काय' वगैरे सुप्रसिद्ध इंग्रजी चित्रपटांच्या संगीताची मेजवानी ह्यांनी १९५८ पासून द्यायला सुरुवात केली. एकूण चार लोकांच्या ह्या ग्रूपने तेव्हा पासून आज पर्यंत लाखो लोकांची मने जिंकली आहेत त्यांच्या सुमधुर संगीतानी! लीड गिटार, र्हिदम गिटार, बेस गिटार आणि ड्रम्स च्या जोरावर, त्यांच्या शैलीत… पाय पुढे मागे करत, प्रसन्न मुद्रा… वयाच्या सत्तरीतही तोच जोश आणि तेवढेच आल्हाददायक संगीत त्यांनी रसिक प्रेक्षकांना दिले! त्यांचा शेवटचा 'लाइव्ह कॉन्सेर्ट' होता 'दी फायनल टूर' २०१० सालचा. त्यांच्या ह...

आनंद हा ही कंटेजियस असतो...

॥श्री॥ रोज सकाळी अन्वयाला शाळेत सोडायला जातो... तीची नेहमीची गाणी, कधी तिच्या प्लेलिस्ट मध्ये भर म्हणून नवीन गाणी ऐकत १०-१५ मिनीटत नर्सरी येते, सकाळच्या ह्या वेळे नंतर अन्वया डाइरेक्ट रात्री दिसते, झोपण्या अगोदर एक तास, म्हणजे एवरेजली २तास रोज. तर आज पण नेहमीप्रमाणे मी आणि अन्वया गाडीत, मस्त गाणी वाजत होती... 'सूरज की बाहों मै... अब है ये झिंदगी..."लावलं! तीला माहिती होतं गाणं, पण तिच्या नेहमीच्या प्लेलिस्ट मधलं नसल्यानी मीच जरा पुढाकार घेऊन दोन्ही हात वर करून लाइव कॉन्सर्ट मध्ये जसं करतात तसे हात फीरावले, तीला जरा एक्साइट करण्या साठी, मग अन्वयानी पण... वेगवेगळे प्रकार... बर हे सगळ सैग्नल लाल असताना बरं का, असो, माझा अन्वयाला एंटरटेन करायचा प्रयत्न सफल! ती ही मला साथ देत होती तितक्यात मी रियर मिर्रर मधून जरा मागच्या गाडीकड पाहिले... त्या गाडीतला इसम मला कॉपी करत होता!!! आनंद हा ही 'कंटेजियस' असतो... आज त्याचा 'प्रूफ' मिळाला :) गाणं संपलं, दुसरं गाणं होतं... "क्या करू... फ्रॉम वेक अप सिड" अन्वयाचा चेहरा परत खुलला :P #सशुश्रीके

जगी सर्व सुखी असा कोण आहे!?

॥श्री॥ काही गाणी तुम्हाला एखाद्या विशिष्ठ वेळेची/ठीकाणाची आठवण करवुन देतात... त्या साच्यातली काही गाणी... माझ्या बाबतीत ग़ज़ल्स! हो... वयाच्या ८-९व्या वर्षी ऐकलेली ती जगजीत-चि...

One-Hit Wonders...

॥श्री॥ आज सकाळी शफल वरती दिल तो पागल है चा एल्बम लागला... मनात विचार आला... वाह काय गाणी होती ही, कोल्लेज चे दीवस आठवले... प्यार कर... ओह्हो हो प्यार कर जब तू हस्ती है... चाक दूम दूम दिल तो पागल है... दील दीवाना है लता, उदीत आणि उत्तम सिंग... हां कोण!? हो मला वाटलेलं की जातीन-ललित असेल नेहमी प्रमाणे, कारण तेव्ह्या जतिन-ललित जोरात होते! काय मस्त गाणी... दिल तो पागल गाणी हीट, चित्रपट हीट... पण पुढे काय!? त्यानंतर उत्तम सिंगनी दुश्मन, प्यार दीवाना होता है आणि ग़दर वगैरे सिनेमे केले... पण 'दिल तो पागल है' सारखं यश नाही मिळालं... अशी आहेत अजुन बरीच मंडळी... मैंने प्यार किया वाली भाग्यश्री, परदेसची महिमा चौधरी, माझी आवडती गायत्री जोशी जीने फ़क्त स्वदेस केला, आशिकी वाला राहुल रॉय, राम तेरी गंगा मैली वाला राजीव कपूर, सौदागर वाला विवेक मुश्रान... अजुन कोणी असेल तर सांगा मला... माझ्या आठवणीत तरी इतकी आहेत. सगळे आले आणि गेले... One-Hit Wonders ... पण जो काही पहिलाच लकी स्ट्राइक होता त्यांचा... लोकांना झगडावे लागते हीट मिलावण्या साठी... ह्यांनी पहिल्याच दणक्यात बाजी म...