आनंद हा ही कंटेजियस असतो...

॥श्री॥

रोज सकाळी अन्वयाला शाळेत सोडायला जातो...
तीची नेहमीची गाणी,
कधी तिच्या प्लेलिस्ट मध्ये भर म्हणून नवीन गाणी ऐकत १०-१५ मिनीटत नर्सरी येते,
सकाळच्या ह्या वेळे नंतर अन्वया डाइरेक्ट रात्री दिसते,
झोपण्या अगोदर एक तास, म्हणजे एवरेजली २तास रोज.

तर आज पण नेहमीप्रमाणे मी आणि अन्वया गाडीत,
मस्त गाणी वाजत होती... 'सूरज की बाहों मै... अब है ये झिंदगी..."लावलं!
तीला माहिती होतं गाणं, पण तिच्या नेहमीच्या प्लेलिस्ट मधलं नसल्यानी मीच जरा पुढाकार घेऊन दोन्ही हात वर करून लाइव कॉन्सर्ट मध्ये जसं करतात तसे हात फीरावले, तीला जरा एक्साइट करण्या साठी, मग अन्वयानी पण... वेगवेगळे प्रकार... बर हे सगळ सैग्नल लाल असताना बरं का, असो, माझा अन्वयाला एंटरटेन करायचा प्रयत्न सफल! ती ही मला साथ देत होती तितक्यात मी रियर मिर्रर मधून जरा मागच्या गाडीकड पाहिले... त्या गाडीतला इसम मला कॉपी करत होता!!! आनंद हा ही 'कंटेजियस' असतो... आज त्याचा 'प्रूफ' मिळाला :)

गाणं संपलं, दुसरं गाणं होतं... "क्या करू... फ्रॉम वेक अप सिड" अन्वयाचा चेहरा परत खुलला :P

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!