दीड वाजला...





१ वाजायला आला आता
भूता सारखा लिफ्ट नी खाली जाणार
लिफ्टचा दरवाजा उघडणार
मी चावी काढणार
किल्लीचं बटण दाबणार
गाडी डोळा मारणार
मी गाडीत गाडी रस्त्यावर
रस्ता वर जाणार
बीफोर
बीथ्री
बीटू
बी१
रस्ता गाडी खाली मी गाडी वर
ब्लूटूथ कन्नेक्ट गाणी ऑन
सपा सप दिल चाहता है
पांढऱ्या पट्ट्या १२०वर क्रुझ कंट्रोल
आधी मागे मग पुढे…
डोळे उघडे… डोकं बंद
डोकं बंद… रस्ता चालू
रस्ता चालू …
शेवटचा सिग्नल तो ही चालू
पार्किंगचं बटण…
फाटक चालू
गाडी बंद,
मी जमिनीवर…
गाडीला हात
तोंडात हम्म हम्म
सो गया हम्म हम्म ये जहां
लिफ्ट
बी
जी
एम
वन
टू
टूवनफोर…
चावी फिरवून मी आत…
काळोख अंधार
चाचपडत,
मोजे येथे
बूट तिथे
किल्ली ची कीर कीर
डोकं चालू
काय लिहू

समीर झोप आता
दीड वाजला

#सशुश्रीके । २८ ऑक्टोबर २०१४

Comments

  1. Replies
    1. धेन्यू... सुचल धडलं तसं लिहिलं

      Delete
    2. धेन्यू... सुचल धडलं तसं लिहिलं

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!