Posts

Showing posts with the label road

माझ्यातला ड्रायव्हर...

सध्या माझ्या कर्मभूमीत सगळीकडे नवीन पाईपलाईन, नवीन ब्रिजेस वगैरेसाठी खोदकाम वगैरे चालू आहे काही लेन्स बंद, काही रस्ते बंद, ह्या सर्व कारणांमुळे प्रचंड ट्राफिक वाढलं आह...

दीड वाजला...

Image
१ वाजायला आला आता भूता सारखा लिफ्ट नी खाली जाणार लिफ्टचा दरवाजा उघडणार मी चावी काढणार किल्लीचं बटण दाबणार गाडी डोळा मारणार मी गाडीत गाडी रस्त्यावर रस्ता वर जाणार बीफोर बीथ्री बीटू बी१ रस्ता गाडी खाली मी गाडी वर ब्लूटूथ कन्नेक्ट गाणी ऑन सपा सप दिल चाहता है पांढऱ्या पट्ट्या १२०वर क्रुझ कंट्रोल आधी मागे मग पुढे… डोळे उघडे… डोकं बंद डोकं बंद… रस्ता चालू रस्ता चालू … शेवटचा सिग्नल तो ही चालू पार्किंगचं बटण… फाटक चालू गाडी बंद, मी जमिनीवर… गाडीला हात तोंडात हम्म हम्म सो गया हम्म हम्म ये जहां लिफ्ट बी जी एम वन टू टूवनफोर… चावी फिरवून मी आत… काळोख अंधार चाचपडत, मोजे येथे बूट तिथे किल्ली ची कीर कीर डोकं चालू काय लिहू … समीर झोप आता दीड वाजला #सशुश्रीके । २८ ऑक्टोबर २०१४

आनंद हा ही कंटेजियस असतो...

॥श्री॥ रोज सकाळी अन्वयाला शाळेत सोडायला जातो... तीची नेहमीची गाणी, कधी तिच्या प्लेलिस्ट मध्ये भर म्हणून नवीन गाणी ऐकत १०-१५ मिनीटत नर्सरी येते, सकाळच्या ह्या वेळे नंतर अन्वया डाइरेक्ट रात्री दिसते, झोपण्या अगोदर एक तास, म्हणजे एवरेजली २तास रोज. तर आज पण नेहमीप्रमाणे मी आणि अन्वया गाडीत, मस्त गाणी वाजत होती... 'सूरज की बाहों मै... अब है ये झिंदगी..."लावलं! तीला माहिती होतं गाणं, पण तिच्या नेहमीच्या प्लेलिस्ट मधलं नसल्यानी मीच जरा पुढाकार घेऊन दोन्ही हात वर करून लाइव कॉन्सर्ट मध्ये जसं करतात तसे हात फीरावले, तीला जरा एक्साइट करण्या साठी, मग अन्वयानी पण... वेगवेगळे प्रकार... बर हे सगळ सैग्नल लाल असताना बरं का, असो, माझा अन्वयाला एंटरटेन करायचा प्रयत्न सफल! ती ही मला साथ देत होती तितक्यात मी रियर मिर्रर मधून जरा मागच्या गाडीकड पाहिले... त्या गाडीतला इसम मला कॉपी करत होता!!! आनंद हा ही 'कंटेजियस' असतो... आज त्याचा 'प्रूफ' मिळाला :) गाणं संपलं, दुसरं गाणं होतं... "क्या करू... फ्रॉम वेक अप सिड" अन्वयाचा चेहरा परत खुलला :P #सशुश्रीके

रंग जांभळा, विषय जाम हळवा

Image
रंग जांभळा, विषय जाम हळवा! खूप खूप खूप आवडतं, अगदी आंबा / स्ट्राबेर्री / अननसापेक्षा! आत्महत्या रोज… बिचारी रस्ता जांभळा करतात! तोच जांभळा रंग जिभेवर आला कि आरसा सुटायचा नाही! त्या रंगाला पण जांभळाचे नाव!… रंग जांभळा, विषय जाम हळवा कुणा समजून सांगू विषय हा जुना पण अजून ही कवळा ती सकाळ ती दुपार ती संध्याकाळ, काळा तो रस्ता… सडा तो जांभळा… सडा तो जांभळा, सडा तो जांभळा #साशुश्रीके । ४/२/२०१५ । सकाळचे १०. ५१