माझ्यातला ड्रायव्हर...

सध्या माझ्या कर्मभूमीत सगळीकडे नवीन पाईपलाईन, नवीन ब्रिजेस वगैरेसाठी खोदकाम वगैरे चालू आहे काही लेन्स बंद, काही रस्ते बंद, ह्या सर्व कारणांमुळे प्रचंड ट्राफिक वाढलं आहे, आणि त्यात कोणी अती फास्ट कोणी अती स्लो चालवलं की डोकं फिरतं 😠  (म्हणजे फिरायचं... आता नाही फिरत 😁 का ते सांगतो!)

अश्या खूप प्रसंगानंतर ही मी शांत... डोक्यावर बर्फ़ाची लादी ठेऊन वाहन चालवतो जणू! 😇

असो, वर्तमानात येतो...
सिग्नल सुटला, ३लेन मध्ये सर्वात शेवटच्या लेन मध्ये मी आणि माझ्या समोर ५लोकांनी भरलेली... मागची बाजू ३जणांच्या वजनाने टेकून पुढची बाजू वरच्या दिशेला गेलेली एक ९०ज वाली डार्क रेड सदान. अगदी हमरस्ता येई पर्यंत इंडिकेटर देऊन ही पाहिजे त्या दिशेला वळे ना 😐 अर्थात माझा वेग कमी झाला आणि इतका जवळ गेलो की मला त्याला ओव्हरटेक ही करता येईना, डोळे 🙄 असे होणार तितक्यात बायकोचा हात हॉर्न वर गेला...मी तिला प्रेम+राग अश्या विचित्र नजरेने पाहिलं!

ती म्हणते "अरे मग काय... हलतच नाहीये तो!..." मी मनातल्या मनात म्हणालो 'काय उपयोग नाही अश्या लोकांना अजून घाबरायला होतं!' माझ्यातला ड्रायव्हर जिवंत आहे की मेलाय ते कळेना!
पुण्यात जायला हवंय लवकरच, माझ्यातला ड्रायव्हर जिवंत करायचाय मला 😈

लवकरच!

(असो, नंतर काही क्षणातच मी त्या सदानला ओव्हरटेक केलं, उत्सुकता म्हणून ड्रायव्हरकडे पाहिलं, ते येडं अजून ही त्याच दिशेला लेन मध्ये साईड मिररकडे डोळे चिकटवून लेन चेंज करत होतं, जे त्याला जमत नव्हतं... देव त्याला लेन चेंज करण्यात यश येऊ दे रे, अशी तात्काळ अदृश्य प्रार्थना माझ्या साईड मिरर मध्ये न बघता केली.)

#सशुश्रीके २३/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!