Posts

Showing posts with the label story

'सव्वा सहा' (लघू कथा)

Image
सव्वा सहा                 डोळे चोळत चोळत उठलो, आज गजरच झाला नाही, की ऐकु आला नाही!? कदाचित टीवी बघता बघता हॉल मध्येच सॉफ्यावर आडवा झालो असेन, स्वतःशीच बडबड करत तब्बल अर्धा मिनिट सॉफ्यावर लोळत होतो, तेवढ्यात डोक्यात वीज चमकली >आज ओफ्फिसचा पहिला दिवस< त्यात पावसाळा, ह्या पावसाळ्याच्या आईचा घो! नको तेव्हा नको तिथे धो-धो पडत असतो, मला त्याचीच काळजी जास्त, ताडकनी उठलो... टीवी बंद केला, बेसिन पाशी जाता जाता किचन मधले घड्याळ पाहिले, सव्वा सहाच वाजलेले, ते बघुन जरा शांत झालो, आरामात सकाळचे विधी करता करता ऑफिस मध्ये बॉस कसा असेल, सहकर्मचारी कसे असतील, काम कसे असेल ह्याचा विचार करत करत नंतर अंघोळ वगैरे आटोपली, देवाला दीवा लावला... अथर्वशीर्ष म्हंटले, उदबत्ती लावताच खिडकी कडे सूर्य पाहायला गेलो तर... हे आभाळ भरून आलेले, सूर्याचा लवलेशही नव्हता! सकाळी सकाळी हे असले उदास वातावरण पाहुन पहिल्याच दिवस असणाऱ्या नोकारीच्या उत्साहाला हे पावसाळी विर्जण लागलेले! असो...        ...

बापट काका

Image
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले... त्यातल्या त्यात नवीन, कारण गावात आरामात ७०-८०वर्ष जुनी घरं असतात, तर ते घर होतं बापट काकांच, तसे होते ते खुप म्हातारे, पण येणारे जाणारे सर्व बापट काका म्हणून हाक मारायचे, मग मी ही. माझी आजी दूध घेऊन ५-६घरांत जाऊन द्यायची, आमच्या कडे २म्हशी होत्या तेव्हाची गोष्ट, तीन्हीसांजाच्या वेळी, ना धड उजेड ना काळोख... आजीचा हात किंवा पदर धरून जायचो, बापट काकांकडे पण जायचो, रस्त्याच्या लगद नसल्यानी आत पर्यंत जाऊन त्याना हाक मारून तो स्टीलचा डबा द्यायचा मग ते आपल्या घरच्या भांड्यात आतून घेणार... असा दिनकर्म(क्रम)... मला बघुन भुवया उंचावून हसायचे आणि मग आजीकडे माझ्या आई...

मैगी आठवणींतली

Image
मैगी आठवणींतली... तसं अगदी पहिली मैगी कधी खाल्ली आठवत नाही, हट्ट करून खाल्ली जायची हे आठवतय! मग एकटं रहायची वेळ आली की आईच घरी मैगी पैकेट्स ठेवायची, (किंवा मी ठेवायला लावायचो) नंतर  कॉलेजच्या असाइनमेंट करताना मध्येच अचानक भूक लागली की सो कॉल्ड २मिंटाची मैगी ६मिनट ढवळुन थंड होऊन गिचकट होण्या आधी संपवायची! नंतर नुसती मैगी खायचा कंटाळा यायला लागला.. टॉमेटो, कांदा, जीरं, मटार थोडं कच्चे तेल मारून खायचो, त्यावर मस्त कोथींबीर! शेफ वगैरे झाल्यासारखं वाटायचं. मग शिमला कुल्लू मनालीला गेलेलो, तिथे कुफ्री नावाच्या ठिकाणी खाल्लेली आठवत्ये मैगी, मस्त धुकं होते, १२-१३° वगैरे तापमान असेल आणि तिथे मैगीचे २-३स्टॉल्स होते! मैगीचा दीवाना वगैरे नसलो तरी तो मौसम आणि मैगी फैन माझी बायकोमुळे मी पण मैगी व्होरप्ली! गरमागरम वाफाळलेला तो बाउल आणि रम्य परिसर... बेस्ट कॉम्बो होता! मग परत वेळ आली एकटे जगायची, मुंबईत २वर्ष काढली तेव्हा नाइलाज म्हणून अधुन मधून मैगी खायचो! मग दुबइत आलो... मैगीचा वैताग आलेलाच, त्यात ईथे मसाला फ्लेवर मैगी मिळायचे नाही! इथले फेल्वर्स म्हणजे करी, चिकन आणि चीज. मग मी 'टॉप...

'भेलवलेय्या-भेलवलेय्या'

Image
।।श्री।। 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' लहानपणी मावशीकडे राहायचो बोरिवालीत, तेव्हा एक भेळ वाला भैया यायचा, एका मोठ्या ताटाला एक मोठा अल्युमिनियम पत्रा गोल, दर्शनी भागावर,त्या भेळवाल्याचे नाव, भेळीचे प्राकार आणि निरनिराळ्या भेळींचे रेट्स. तो सगळा प्रकार डोक्यावर घेऊन आणि खांद्यावर इंग्रजीतला 'एच' सारखा दीसणारी लाकडी काठी घेऊन यायचा 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' ओरडत, जमीनीवर तो 'एच' ठेवला की त्याचा 'एक्स' आकाराचा स्टैंड व्हायचा, त्यावर त्याचा खजिना, यायचा धड-न-दीवस- न-रात्र असलेल्या वेळी, तो आला की आमच्या बिल्डिंगच्या ट्यूबा पकपकायला लागायच्या, मग बिल्डिंगा मधली तमाम गुजराती मूलं काही कैथलिक (ह्यांचं नाव जामच लक्षात राहिलीत 'हैंडी-हेमिल्टन', बाकीच्यांची नावं विसरलो पण अशीच 'अमित-राहुल' वगैरे टिपिकल नावं) सगळे जमायचे, हातात नाणी/नोटा घेऊन, अधाशा सारखं त्या भैया कडे बघत, मग तो भेळवाला दिसेनासा व्हायचा, त्याच्या आजूबाजूला मुलांचं कडं व्हायचं, अमुक जास्त घाल तमूक घालुच नकोस आणि हा सर्व प्रकार मी आमच्या खिडकीतुन बघत असातचो, पण कधी ...

नशीबवान असणे ही व्याख्या खुप 'फ्लेक्झीबल' आहे, हे मात्र कळालं त्या दीवाशी!

इंटरव्यू • कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :) • कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब. • कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये. • बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको • बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती! • का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही… • लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात.  • म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा... लग्ना आधी मी तीला पाहिलं पण नव्हतं, वडलांनी ठरवलं, मी लग्न केलं. • मग लहान मुलीला सांभाळते का मोठी मुलगी!? / हो हो... सांभाळते ना! मला मुलगा पण झालेला, पण १०दीवासात वरला, लोकं मला म्हणायचे की तू कमनशीबी आहेस, पण तसं नाहीये... • हो हो बरोबर आहे! नशीबवान लोकांनाच मूली असतात! मला पण मुलगीच आहे, आणि तीच असेल शेवटपर्यंत! / होय... मी स्वतः एक मोठं उदाहरण आहे तुमच्य...

आज ना...

॥श्री॥ नेहमी प्रमाणे आजही उशीर झाला घरी यायला... झोपे साठी सज्ज झालेली माझी पोर.. आल्या आल्या बेड वरनं उठून... पळत...मला मीठी मारली... मग मी तीला जवळ घेऊन नेहमी प्रमाणे आज दीवसभर का...

पत्र

Image
॥श्री॥ आज जरासा दमलेलो... रोजच्या पेक्षा जरा जास्तं होतं काम आज... मग न टाइम पास करता वेळेत निघण्याच्या दिशेनं केलं... आलो घरी ९वाजता.. दिवसभर व्हत्साप पण कमीच पाहिले... घरी आल्यावर कोणी कोणी काय काय पाहण्यात १०मिनट गेली... स्क्रोल करताना गानु काकांचा इनबॉक्स मध्ये म्हणजे पर्सनल मध्ये मेसेज, ग्रुप पेक्षा कोणी पर्सनल मेसेज केला असेल तर त्याला नक्कीच आधी प्राधान्य/आदर देऊन पाहतो, त्यात गानु काका आणि फालतू फॉरवर्ड्स वगैरे अशक्य... असो, २ फोटोंसह मेसेज होता... [12/01 9:09 pm] Anand Ganu: letter from ARUN from Doha....24 /08/1978 wachaniya  patra ahe फोटो होते पत्राच्या पुढच्या आणि पाठच्या भागाचे... वाचताना असं वाटलं की सगळ आत्ताच घडलय! ७८ची गोष्ट! आणि पेपर वर पत्र लिहिण्या आधी डाव्या बाजूला गणपती... मग जागा सोडून मजकूर! काय छान विचार... मन मोकळे पणा आणि हुरहुर, आनंद, दुःख... सर्व होतं त्या पत्रात! त्या पत्रांचे दिवस गेले... ओलावा गेला नी आत्ताचे हे कोरडे मेसेजेस उरलेत! खरच काय किम्मत असेल ह्या डाटा नामक मेसेजेस ना! काहीच 'इतिहास' नसलेलं काम, असो... जाउदे, ...

वेगाची नशा आज ठेचुन पाहिली..

॥श्री॥ वेगाची नशा आज ठेचुन पाहिली.. मजा नाही आली.. अक्खा शेख झायेद रोड ८०च्या स्पीडने ४थ्या लेन मध्ये रेटला... रोज १२०ची सवय १ल्या लेनची... आणि कोणी ११०वर असेल तर त्याला अपर-डीपर मारून बाजूला सरकवायची घाई... म्हणालो आज बघू 'इतर'होऊन कसं वाटतय... मजा नाय... पकाऊ, स्पीड पाहिजेच! आणि दुबैत तर नक्कीच पाहिजे! त्याच रस्त्यावर लेन चेंज करताना इंडिकेटर दाखवला नाही की तर माझी तळ पायतली आग मस्तकात जाते.. रोज एक्सीडेंट होतातच हमखास.. आत्तापर्यंतचा सर्वात YZएक्सीडेंट पहिला तो एका नॉर्मल सडैन आणि रोल्सरॉयस चा... रोल्स रॉयस रस्त्याच्या बाजूला उल्ट्या दिशेला तोंड... चुराडा समोरून!!!... हे सौदी/कतारी/कुवैती लोक मेले वीकेंडला दूबैत येऊन असला राडा करतात #सशुश्रीके | ५ एप्रिल २०१५

'किर्रक्केट'

Image
॥श्री॥ क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस! आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे' . .. हे असले सु(कु)संवाद टेस्ट असल्यावर ५दिवस/मर्यादीत षटकांत अमर्याद वेळी आदळायचे अणि कानावर नो एंट्री चा बोर्ड फिक्स करून माझ्यासारखी निर्लज्ज मुलं मनसोक्त आनंद घ्यायचे! जिंकले तर सिकंदर हारले तर 'यार...हार जीत तो चलती रहती है' असा माच्युअर कंटेंट मारून पुढच्या मैच साठी कैलेंडरवर नोंद करून हातात बैट आणि स्टूल (स्टम्प) घेऊन 'इमैजिनेशन'युक्त सचिन अंगात आणत जो काही बैट घुमवायला जी मजा यायची! ...