Posts

लहान मोठ्या गोष्टी

।। श्री ।। • शांततेचे राखण करताना श्श्श्श असा आवाज करणारा व्यक्ती पण तीत्काच अपराधी ठरतो... नाही का! • जाणीव असली की उणीव भासत नाही. • बेडकानी हाग्लेले मुत्लेले थंडगार पाणी प्यायचो भर उन्हाळ्यात विहिरीचे… काय चव असायची! ते पण पेला / तांब्यानी नाही… डायरेक्ट बादली! यो मज्जा! • 'प्रमेय' सिद्ध न करता येणे हे 'सिद्ध' करून दाखवलेले मी... तरी पास झालो... पूण्य बाकी काही नाही! • पैसे पुरून झाडाची स्वप्न पाहिल्येत का कोणी!? मी स्वप्न नाही... खरे खुरे पुरून मार खाल्लाय!!! © सशुश्रीके.

माझ्या व्ययक्तीक मतानुसार मांडलेल्या गेल्या काही महिन्यांतील ठळक बातम्या

।। श्री ।। २ सेप्टेम्बर २०१४ रात्रीचे ११.२७ माझ्या व्ययक्तीक मतानुसार मांडलेल्या गेल्या काही महिन्यांतील ठळक बातम्या १) मोदी (भाजपा म्हणा) सरकार निवडून आले - भारताच्या जनतेनी राहुल सारख्या अडाणी माणसावर विशवास न ठेवता दाखवलेला समजुद्दारपणा २) इजराइल आणि पेलस्टाइन युद्ध - पाकिस्तान आणि भारत अंतर्गत काश्मीर विषयी जे काही छुपे युद्ध चाललय त्याचाच खुलं युद्ध प्रकार म्हणजे इजराइल आणि पेलस्टाइन युद्ध, काश्मीर ऐवजी गाझा... हाच काय तो 'भौगोलिक' फरक! ३) पाकिस्तानात १९४७ साली हिन्दुची संख्या एकूण लोकसंख्येत २७% होती, आता ती २% वर आली आहे. - एकुणच शेजारी काय लायकीचे आहेत हे स्पष्ट होते. ४) साईं बाबा आणि हिन्दू धर्म परिषद् वाद - जे गोरे साहेब करून गेलेत तेच आपण आपल्याच देशात करवून घेतोय, हिन्दू धार्मिक परिदशेला एकच सांगायचे आहे की आहेत ते साईं मंदीरांना हात न लावता नव्या साईं मंदीरान्ना परवानगी न देणे! कशाला हवाय नवीन / जातीय वाद, इतर खुप विषय आहेत की! ५) लव जिहाद! - हा प्रकार गेली खुप वर्षे थैमान घालून आहे, आणि आता मीडिया ही मागे लागल्ये... खुप स्टिंग...

गानु काका...आनंद गानु

Image
गानु   काका ... गानु   काका ... आनंद   गानु . काका ...  मी   काका   म्हणतो   त्यांना . कधी   अरे   तुरे   कधी   तुम्ही , जसा   प्रसंग   तशी   हाक ,  खुप   प्रेमळ ,  नेहमी   कौतुक   करणारे   आणि   मुख्य   म्हणजे   माझ्या   वडलांचे   चड्डी   दोस्त ! त्यांच्या   कडून  ' अरे ... अरुण  ( पाळण्यातलं   नाव   श्रीकृष्ण )  काय   चित्र   काढायचा ,  अगदी   हुबेहूब, काय   स्मार्ट   दिसायचा ...  वगैरे   खुप   इम्प्रेसिव्ह   इमेज   काकांनी   लहानपणा   पासूनच   माझ्या   हृदयावर   कोरलेली ,  आणि   बाबा   पण   वर्षातून   एकदा   आले   की   मग   सेलिब्रिटि   आल्या   सारखं   वटायाचं !  स्तुतिसुमनांचा   वर्षावच   आनंद   काका   किंगसर्कल   ला   राहतात ...  ब्राम्हण ...

"केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज"

"केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज" सुचना - फक्त +१८ (डोक्यानी) लोकांसाठी स्थान - मुंबईतली एक एड अजेन्सी पात्र - काल्पनिक नाहीत वेळ - रात्रीचे ९-१० एड अजेन्सी मध्ये काम करणं म्हणजे काय असतं याचं एक उदाहरण! छान कामावर काम करून करून चांगल्या कामाचं वाईट कसं करायचं हे काम दररोज क्लायंट फीडबेक देऊन सिद्ध करतच असतो! त्यात पहिला मोठ्ठा फीडबेक म्हणजे 'लोगो बडा करो!' आणि दुसरा मोठ्ठा फीडबेक म्हणजे 'लोगो और बडा करो!' आर्ट डिरेक्टर / कॉपी रायटर नेहमी प्रमाणे आफ्टर वर्क आवर्स मध्ये एका लेआउट वर डोकं फोडत असतात त्यात आधीपासूनच २दा लोगो मोठा केलेला असतो आणि अश्याच काहितरी फीडबेकनिशी एक सुंदर तरुणी (क्लायंट सेर्विसिंग बहुदा सुंदर तरुणीच असतात) क्याबीन मध्ये घुसते. "गाय्स, प्लीज, प्लीज, प्लीज, फोर द लास्ट टाईम प्लीज… केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज" आधीच सकाळ पासून मिटींगा / चेंजेस / ब्रेन स्टोर्मिंग करून दोघांच डोकं आउट झालेलं! तरीही त्या सुंदर तरुणी च्या मोहक मुखपृष्ठाला संबोधून आर्ट डिरेक्टर साहेब थंड डोक्यांनी म्हणाले… ...

कै.केशव यशवंत केतकर

अगदी लहानपणी बोरीवलीच्या गणपती मंदीराबाहेर आजोबा अणि त्याचे मित्र ( सर्व टकले ) बसलेले असायचे झाडाखाल्च्या टिपिकल राउंड सीमेंटचा प्रकार... त्यावरून गोल गोल पळायचे आणि हळूच सर्व आजोबांच्या टकल्यांवरन बोटं लावत.. हाहाहां गाम्भीर्य शुन्य! एकदा आजोबा रागावले... बाजूचे आजोबा लगेच... अरे राहुदे रे..लहान आहे तो! आणि परत माझी गाडी सुरू... सगळेच आजोबा लाडोबा करतात पार!   कै.केशव यशवंत केतकर... Missing you today! #सशुश्रीके.

'दडपे पोहे'

'दडपे पोहे' संध्याकाळची वेळ, जागा आक्षी ( अलिबाग आणि नागावच्या मधलं गाव ) मे महिना, २-३री च्या उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस … अक्खा दिवस खेळून प्रचंड भूक लागलेली ती संध्याकाळ आजीकडे धाव घेतली! जोर्रात दडपे पोह्यांची ओर्डर! आप्पा ( आईचे वडील ) म्हणाले… "समीर आधी हात पाय धू… शुभंकारोती / रामरक्षा म्हण… मग आजी देईल तुला काय हवं ते!" मला काय पटे ना! ( त्यावेळी/काळी वडीलधार्या व्यक्तींना 'नाही' ऐकायची सवय नव्हतीच! ) मग काय आजोबांनी धोतर वर करून माझ्या दिशेने जी धाव घेतली, मी पडवीतून… अंगणात… अंगणातून रस्त्यावर, माझ्यामागे आजोबा, रचंड रागात. ३०-४० पावलं झाली मागे वळून पाहिलं… आप्पा आहेतच मागे! तेवढ्यात पोस्टमन काका आले समोरून! सर्व प्रकार बघून अप्पान्जवळ थांबले, काहीतरी बोलतायत हे बघून मी थांबलो!… त्यानंतर १५-२० मिनटांनी मी देव्ह्यार्यासमोर शुभंकारोती / रामरक्षा आणि ८०% लक्ष स्वयंपाकगृहात्ल्या आजी कडे जी बनवत होती 'दडपे पोहे' #सशुश्रीके.

ती निळी दुपार!

' ती निळी दुपार !' २ - ३ वाजले असतील , आई आजी मस्त दुपारच्या निद्रेत … बोरिवलीच्या त्या श्री गणेश अपार्टमेंट मधील अजून एक उनाड दुपार ! कोणीच नव्हतं खेळायला , प्रचंड बोर मारत होतं . मला काहितरी उद्योग करायचा होताच काही करून ती दुपार ' सत् ‌ कारणी ' ( वाट ) लावायची होती त्यातच आईने आणलेली कॅमेल ब्रांडची शाई दृष्टीक्षेपात पडली . फार पातळ प्रकार जर बाबांनी आणलेल्या पार्कर शाईशी तुलना करायची झाली तर ! असो … मनात एक विचारांचं जंगल निर्माण झाले … जर दुध आटवले तर बासुंदी होते ! आणि ही भिकार कॅमेलची शाई जर आटवली तर नक्कीच पार्करच्या शाईत रुपांतर व्हावयास काहीच हरकत नाही ! घेतली बाटली टाकली पातेलीत पेटवली शेगडी गरम होई पर्यंत अजून काही छोटे नाटे उद्योग चालू होते . तेवढ्यात कड कड असा आवाज आला त्या पातेल्यातली शाई गायब होती . किचनचे सिलिंग जणू ' नीला आसमान सो गया … ' हे गाणं गात होतं . पार्करच्या शाईच्या ऐवजी कोरडा निळा धूर थैमान...