'दडपे पोहे'


'दडपे पोहे'

संध्याकाळची वेळ, जागा आक्षी ( अलिबाग आणि नागावच्या मधलं गाव ) मे महिना, २-३री च्या उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस … अक्खा दिवस खेळून प्रचंड भूक लागलेली ती संध्याकाळ

आजीकडे धाव घेतली! जोर्रात दडपे पोह्यांची ओर्डर!
आप्पा ( आईचे वडील ) म्हणाले… "समीर आधी हात पाय धू… शुभंकारोती / रामरक्षा म्हण… मग आजी देईल तुला काय हवं ते!"

मला काय पटे ना! ( त्यावेळी/काळी वडीलधार्या व्यक्तींना 'नाही' ऐकायची सवय नव्हतीच! )

मग काय आजोबांनी धोतर वर करून माझ्या दिशेने जी धाव घेतली, मी पडवीतून… अंगणात… अंगणातून रस्त्यावर, माझ्यामागे आजोबा, रचंड रागात. ३०-४० पावलं झाली मागे वळून पाहिलं… आप्पा आहेतच मागे!

तेवढ्यात पोस्टमन काका आले समोरून! सर्व प्रकार बघून अप्पान्जवळ थांबले, काहीतरी बोलतायत हे बघून मी थांबलो!…

त्यानंतर १५-२० मिनटांनी मी देव्ह्यार्यासमोर शुभंकारोती / रामरक्षा आणि ८०% लक्ष स्वयंपाकगृहात्ल्या आजी कडे जी बनवत होती 'दडपे पोहे'

#सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!