गानु काका...आनंद गानु

गानु काका...

गानु काका...आनंद गानु.
काका... मी काका म्हणतो त्यांना. कधी अरे तुरे कधी तुम्ही, जसा प्रसंग तशी हाकखुप प्रेमळनेहमी कौतुक करणारे आणि मुख्य म्हणजे माझ्या वडलांचे चड्डी दोस्त!
त्यांच्या कडून 'अरे...अरुण (पाळण्यातलं नाव श्रीकृष्णकाय चित्र काढायचाअगदी हुबेहूब, काय स्मार्ट दिसायचा... वगैरे खुप इम्प्रेसिव्ह इमेज काकांनी लहानपणा पासूनच माझ्या हृदयावर कोरलेलीआणि बाबा पण वर्षातून एकदा आले की मग सेलिब्रिटि आल्या सारखं वटायाचं
स्तुतिसुमनांचा वर्षावच आनंद काका किंगसर्कल ला राहतात... ब्राम्हण वाडी चाळ
मी जेव्हापासुन त्यानां पाहतोय तेव्हा पासून दाढ़ी मिशी पांढरी सोडली तर बाकी काहीच फरक पाहिला नाही.

अत्तराचे चहातेअनिरुद्ध बापुंचे भक्तअतिशय धार्मिकशेयर बाजार... आणि बरच काही
कपाळाला नेहमी गंधकानाला वाळ्याची साथशर्ट-पॅट     आणि कोल्हापुरी चपला आणि प्रसन्न चेहराअजुन काय हवय... 
असा माणुस सद्ध्याच्या जगात मिळणं ज़रा दुर्मिळच
(अशक्य म्हणालात तरी चालेल)

मी मुंबईत कामाला होतो तेव्हा जवळ पास  वर्षे मी राहिलो वाडीत.
बाजुलाच खोली होती त्यात मी आणि अजुन तीघे कोंबलेलो असायचो
झोपायला खाट अन सकाळी अंघोळ इतकाच संबंध त्या खोलीशी माझा.
पुण्यात घर असल्याने क्वचितच वीकेंड घालवला असेंन तिथे.
त्यांच्या घरी आजोबा (मागच्या वर्षी देवाद्न्या झाली)
त्यांची बायको, ऐश्वैर्या काकू (नावाप्रमाणे माणसं असतात ह्याचं उत्तम उदाहरण)
आणि लेक गायत्री, सुन्दर आवाजखुप हुशार!
आणि एकदा हसायला लागली की ब्रेक नसलेल्या वाहानासारखी!

तर सांगायचं असं की... 
आयुष्यात खुप लोकं पाहिली पण आनंद काका आणि इतर असा प्रकार आहे
खुप गमतीदार काही सिरियस किस्से आहेत! थोडक्यात प्रवासासाठी ट्रेन मधे बसल्यावर शेवटच्या काही सेकंदात हातात पाण्याची बाटली
आणि बिस्किटाचा पुडा हातात दिल्यावर/घेतल्यावर जो काही आपला चेहरा होतो 
तोच चेहरा घेउन मी आत्ता हे सर्व लिहिले असे समजा!


#सशुश्रीके | दिनांक ३० आँगस्ट २०१४ सकाळी ०६.१० मि.






Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!