माझ्या व्ययक्तीक मतानुसार मांडलेल्या गेल्या काही महिन्यांतील ठळक बातम्या

।। श्री ।।

२ सेप्टेम्बर २०१४
रात्रीचे ११.२७

माझ्या व्ययक्तीक मतानुसार मांडलेल्या
गेल्या काही महिन्यांतील ठळक बातम्या

१) मोदी (भाजपा म्हणा) सरकार निवडून आले
- भारताच्या जनतेनी राहुल सारख्या अडाणी माणसावर
विशवास न ठेवता दाखवलेला समजुद्दारपणा

२) इजराइल आणि पेलस्टाइन युद्ध
- पाकिस्तान आणि भारत अंतर्गत काश्मीर विषयी
जे काही छुपे युद्ध चाललय त्याचाच खुलं युद्ध प्रकार
म्हणजे इजराइल आणि पेलस्टाइन युद्ध,
काश्मीर ऐवजी गाझा...
हाच काय तो 'भौगोलिक' फरक!

३) पाकिस्तानात १९४७ साली हिन्दुची संख्या
एकूण लोकसंख्येत २७% होती,
आता ती २% वर आली आहे.
- एकुणच शेजारी काय लायकीचे आहेत हे स्पष्ट होते.

४) साईं बाबा आणि हिन्दू धर्म परिषद् वाद
- जे गोरे साहेब करून गेलेत तेच आपण आपल्याच देशात करवून घेतोय,
हिन्दू धार्मिक परिदशेला एकच सांगायचे आहे की आहेत ते साईं मंदीरांना हात न लावता
नव्या साईं मंदीरान्ना परवानगी न देणे!
कशाला हवाय नवीन / जातीय वाद, इतर खुप विषय आहेत की!

५) लव जिहाद!
- हा प्रकार गेली खुप वर्षे थैमान घालून आहे,
आणि आता मीडिया ही मागे लागल्ये...
खुप स्टिंग ऑपरेशन्स वगैरे चालल्येत...
विकृत आणि उणे 'ड' प्रकारच्या व्यक्तीच असे करतात!

६) मोदी (भाजप) सरकार १००+ दिवस
- ह्या संधर्भात कॉंग्रेस कितीही बोंबला बोम्बली / प्रती आघात करत असले तरी परिणाम नक्कीच चांगले आहेत, खूप वादे अगदी पूर्णत्वाला आले नसले तरी निदान सुरुवात तरी झाली आहे!

७) बलात्कार आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियांवरून झालेले 'मेडिया मेड' वाद!
- मुळ मुद्दा बाजूला राहून स्त्री संरक्षणा बद्दल कमी जागरुकता.

८) दाभोळकर हत्या प्रकरण
- ह्या विषयाबद्दल जी काही अंधश्रद्धा x जागरुकता + राजकारण भेळ आहे, न बोललेलेच बरे!

९) क्रिकेटमधला भारताचा शेवटच्या ३ सामन्यांमधला खेळ (खेळ न म्हणलेलं बरं!)
- त्या टेस्ट नंतर आता जिंकलेल्या लागोपाठ ३ सामन्यानंतर रवी शास्त्रीचा उदो उदो अपेक्षित आहेच.
पण झाले गेले विसरून जायला आपला क्रिकेट प्रिय प्रेक्षक तयार आहेच!

© सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!