Posts

#सशुश्रीके (वैतागलेला कल्पनाशक्ती कर्मचारी)

क्रिएटिविटी म्हणे! कसली क्रीएटीवीटी चामारी!? आम्ही रोज तेच करत असतो... आमचं कामच ते! जाहिरात क्षेत्रात ना आम्ही, मनापासून करतो काम आणि आमचा ग्राहक (client) अगदी मनापासून त्याची पु...

लहानपणी शिकलेली 'ह्यूमन साइकोलॉजी'

लहानपणी शिकलेली 'ह्यूमन साइकोलॉजी' :) बोरिवालीत मिनल मावशीकडे राहायचो तेव्हाची गोष्ट, मी ४थीत असेन. आमच्या बिल्डिंग मध्ये एक 'ह्यूमन साइकोलॉजी' का काय ते शिकणारी विद्यार्...

आक्षी!

Image
आक्षी! ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे! नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं ' आक्षी ' एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा  - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी! असो, एसटी थांबली की पु.लं.च्या त्या यस्ट्यी सारख्या सर्व घटना पार पाडून झाल्या आणि एकदाचं त्या स्तंभावर ब्यागी ठेवल्या की सुरू व्हायची शर्यंत त्या मे महिन्याच्या सुट्टीच्या आखुड वाटणाऱ्या सुट्टीशी, माझी! उतरल्या उतरल्या आधी दिसायचा स्तंभ, पण माझं लक्ष्य असायचं ते एका हातगाडीवर, ती असली की माझ्या खिश्यात्ल्या एका रुपयाला जणू हजार रुपयांची किंमत यायची, एक रुपया वडा पाव, कुंठेकर काकांचा! पोटात कितीही ऐवज असला तरी तो वडा-पाव खाल्ल्याशिवाय माझी गाडी पुढे जायची नाही, गेले कित्त्येक वर्ष ते वडा-पाव एक रुपयालाच विकतात म्हणजे दर वर्षी वडयाचा आकार कमी व्हायचा, मग ...

दीड वाजला...

Image
१ वाजायला आला आता भूता सारखा लिफ्ट नी खाली जाणार लिफ्टचा दरवाजा उघडणार मी चावी काढणार किल्लीचं बटण दाबणार गाडी डोळा मारणार मी गाडीत गाडी रस्त्यावर रस्ता वर जाणार बीफोर बीथ्री बीटू बी१ रस्ता गाडी खाली मी गाडी वर ब्लूटूथ कन्नेक्ट गाणी ऑन सपा सप दिल चाहता है पांढऱ्या पट्ट्या १२०वर क्रुझ कंट्रोल आधी मागे मग पुढे… डोळे उघडे… डोकं बंद डोकं बंद… रस्ता चालू रस्ता चालू … शेवटचा सिग्नल तो ही चालू पार्किंगचं बटण… फाटक चालू गाडी बंद, मी जमिनीवर… गाडीला हात तोंडात हम्म हम्म सो गया हम्म हम्म ये जहां लिफ्ट बी जी एम वन टू टूवनफोर… चावी फिरवून मी आत… काळोख अंधार चाचपडत, मोजे येथे बूट तिथे किल्ली ची कीर कीर डोकं चालू काय लिहू … समीर झोप आता दीड वाजला #सशुश्रीके । २८ ऑक्टोबर २०१४

ती सोलापुरी चादर...

Image
'ती सोलापुरी चादर' एक बारा-तेरा वर्षांपूर्वींचा किस्सा.. आम्ही १०-१२ जण इंदौरला ट्रेननी गेलेलो, आणि येतानाही ट्रैननीच आलो, तेव्हा अमृताशी लग्न झालेले नव्हते, मी आणि आई गोगटे कुटुंबियांबरोबर गेलेलो, असो... तर झालं असं, की येताना मस्त खिड़कीत बसलेलो, बाहेरची मस्त हवा त्यात मध्य रात्र! मला आली झोप, मस्त लागली ना डूलकी! तेव्हढ्यात समोरून एक ट्रेन आली... भरधाव, हवा आणि आवाज दोघांचा इतका झटका बसला की मी डोक्याखाली ठेवलेली सोलापुरी चादर 'स्वाहः' झाली! पुणे जवळ आले, आवरावरी सुरु झाली, बैग्स वगैरे... सर्व सामान आणि चादरी गोळा करायला सुरुवात झाली, पण एक चादर मिळे ना! सासरेबुवा शोधतायत चादर, 'एक चादर कमी कशी!' मी ही मला काही माहीत नसल्याप्रमाणे चादर शोधु लागलो. शेवटी असा निष्कर्ष निघाला की सूरतला सगळे झोपलेले असताना स्टेशन वर चादर चोरीला गेलेली असावी! काही वर्षांपुर्वी मी बोलता बोलता कबूलीजवाब दिला की... मीच हरवली ती चादर, झालेला किस्सा आत्ता जसा मांडलाय तसाच मांडला. फरक इतकाच की तोंडी मांडला. ससरेबुआ राग आणि हास्य ह्यांचे मिश्र गणित मांडून मो...

आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव!

Image
दुबई मेट्रो! आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास  (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव! नेमकी आज मेट्रो मध्ये तोबा गर्दी, त्यात इथे मुंबई सारखं वरती पकडायला काही नसतं, त्यामुळे मेट्रोनी पिकअप घेतला की सगळे टेन्शन मध्ये येतात! ज्यांना बाजूच्या स्टील बार्सचा आधार असतो किंवा जे टेकून उभे असतात त्यांचं चालून जातं हो, पण ज्यांना कसलाच आधार नाही त्यांचे वांदे, मग ह्याच्यापायावर पाय, त्याच्या कंबरेत/पोटावर हात, कुठेतरी(कोणालातरी) पकडून उभे राहायचा सभ्य प्रयत्न! आणि मग मेट्रोला एकदाची स्थिर गती प्राप्त झाली की मग पूर्ववत अवस्थेत येउन कोणी जोक झाल्यासारखं हस्तं, कोणी शरीराला भोक पडल्यासारखं तोंड करतं, कोणी अशी खुन्नस देतात की विचारू नका! सगळे आपल्या आपल्या स्वभावा नुसार 'रीएक्ट' होतात. #सशुश्रीके । २१ ऑक्टोबर २०१५

'द मार्षन'

Image
'द मार्षन' ३आठवड्यांपूर्वी 'एवेरेस्ट' (आइमैक्स थ्रीडी) पाहिला, मग मागच्या आठवड्यात 'द वॉक' (आइमैक्स थ्रीडी) आणि आज हा!  'द मार्षन' (मैक्स थ्रीडी) तीनही एकसेबढ कर एक!!! 'एवेरेस्ट' आणि 'द वॉक' हे दोन्ही उत्कृष्ट 'थ्रीडी' अनुभाव साठी पहावे असे... आणि 'द मार्षन' खास 'मैट डेमन' साठी पहावा! अप्रतिम गंभीर विषय असून विरंगुळायुक्त अश्या काही विचित्र 'जॉनर'चा 'द मार्षन' ****