लहानपणी शिकलेली 'ह्यूमन साइकोलॉजी'

लहानपणी शिकलेली 'ह्यूमन साइकोलॉजी' :)

बोरिवालीत मिनल मावशीकडे राहायचो तेव्हाची गोष्ट, मी ४थीत असेन. आमच्या बिल्डिंग मध्ये एक 'ह्यूमन साइकोलॉजी' का काय ते शिकणारी विद्यार्थीनी होती, माझ्यासाठी मोठी ताई अश्या वयाची. तीने मावशीला विचारले की मला एका दिवसासाठी भाड्याने नेता येईल, म्हणजे... भाड्यानी म्हणजे पैसे देऊन वगैरे नाही, तिच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून मला तीला तिच्या कॉलेज मध्ये न्यायचं होतं.

मावशी हो म्हणाली, सुट्टीचाच दिवस होता वाटतं, किंवा शनिवार, कारण १०-११च्या वेळी काहीच गर्दी नव्हती ट्रेनला, जाताना मस्त चंगळ! जिथे माझं लक्ष जाई ते माझे... उदाहणार्थ चंपक, ठकठक झालच तर मँगोला वगैरे! ट्रेन मध्ये बसल्यावर मैंगो बाइट पण आल्या तिच्या पर्स मधून! प्रवास तरी फुल पैसा वसूल! आता कुठल्या ठिकाणी नेमके गेलेलो आठवत नाही, असो तिथे गेल्यावर मोठ्या शाळेत आल्यासारखं वाटलं! एका क्लासरूम मध्ये आलो आम्ही, तीने एक ५-६ चित्रांचे कागद ठेवले माझ्यासमोर, उंदीर आणि सिंह असलेली, मला म्हणाली ती ताई की आता तुला जसं सुचेल चित्र पाहुन तसं लिही प्रत्येक चित्राच्या खाली... मी काय लिहिले वगैरे पुढचे काही आठवत नाही.

पण त्या गोष्टी ज्या सहजा सहजी मिळायच्या नाहीत त्या एका दिवसात मिळाल्या, अजुन ही विसरता आला नाहीये तो दिवस! कोणाला काही हवे असेल तुमच्याकडून तर त्यासाठी तो/ती तुमचे लाड नक्की करतो हे मला कळून चुकले तेव्हा :)

आता अन्वयाला ही ते कळणार काही दिवसातच!

#सशुश्रीके । ३० ऑक्टोबर २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!