Posts

तहान

त तहा तहान तहान तहान कधी आईच्या प्रेमाची कधी बापाच्या शाब्बाशीची कधी आजी-आजोबांच्या लाडाची कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची कधी प्रेयसीच्या झलकेची कधी बायकोच्या मिठीची कधी मुलांच्या ओढीची कधी मिटते कधी वाढते कधी लहान कधी महान तहान तहान तहान तहान म्हणजे तडफड तहान म्हणजे वणवण तहान म्हणजे कोरड तहान अगदी कहर तहान नाही संपत तहान ठेवते जिवंत तहान मिळवे पाणी तहान चाळवे भूक तहान करवे तमाशा तहान एक आशा तहान हीच भक्ती तहान हाच परमेश्वर तहान कधी पुण्य तहान कधी पाप तहान शिकवी तहान घडवी तहान तहान तहान तहा त #सशुश्रीके | १५ जानेवारी २०१५

डबल दंड!

Image
२००५ च्या वेळची गोष्ट, मी सांताक्रूझला हॉटेल 'ह्यात' समोर एका एड अजेंसी मध्ये कामाला होतो, दर शुक्रवारी रात्री/बेरात्री (कामाच्या लोड जसा असेल तसा, कधी कधी शनिवारी पहाटे/सकाळी ही निघालेलो आहे) निघायचो पुण्याला, माझा फर्स्ट क्लास पास होता लोकलचा, किंग्सर्कल - सांताक्रूज - किंग्सर्कल, पण नेमका शुक्रवारी लोच्या व्हायचा, तिकिटाला रांगेत कोण उभे राहणार, आणि मग दादर पर्यंत जाण्यासाठी फर्स्टकलास उतरून सेकण्ड क्लास ला कोण जाणार! म्हणजे दोन गुन्हे एका मागो माग एक, पहिला म्हणजे तब्बल तीन स्टेशन्स विना तिकीट आणि तो ही फर्स्टक्लास मध्ये! २-३ वेळेला केला हा प्रकार, पण अपराध्याची भावना घे/ठेऊनच, बिंदास नाहीच. पण मग तो दिवस आलाच, मस्त वेळेत निघालेलो कामं आटपून, माहीम येताच साक्षात टीसी आला डब्यात, मला विचारणी केली, मी गपचूप पास दाखवला 'काही न बोलता.' टीसी ने ही 'काही न बोलता' दादर आल्यावर हात धरून मला प्लॅटफॉर्म वर आणले. माझ्याकडे जेमतेम पुण्याला बसनी जाता येईल इतकेच पैसे, मनात म्हणालो झालं! आता आज कसला जातोय मी पुण्यात 'वेळेत' जरा तोंड पडलेलं पाहून म्हणाला...

आपला 'फील्लमी' #सशुश्रीके

Image
'इश्क'सिनेमा लागलाय टीव्हीवर, ९७चा मूवी...  तेव्हाच जुदाई, परदेस, विरासत, यशवंत, चाची४२०, औझार, दिल तो पागल है वगैरे सिनेमे आलेले... खूप सिनेमे पाहिले, तेव्हा अरुण / विशाल थिएटर मध्ये स्टॉल चे १० आणि बाल्कनीचे १५ रुपये तिकीट असे आणि सायकल स्टँडचं २रुपये, हातात जास्तीचे पैसे असतील तर त्याचे शेपू समोसे आणि अजून पैसे असतील तर माझा/थम्सअप/लिमका... माझा एक सिनियर मित्र होता उमेश म्हणून, तो नसला तर मी एकटाच सिनेमा पाहायला जायचो, नवी सांगावी पासून ते दापोडी सायकल वरून, मध्ये रेल्वे फाटक लागायचे, ते ओलांडले की बाजारात खरे शेंगदाणे घ्यायचे खिशात कोंबायचे... की थेटरात खादाडगिरी सुरु! लोकांना कळलं की म्हणायचे एकटा काय जातोस सिनेमाला!? मला काहीच गैर वाटायचं नाही, नंतर मुंबईला जॉब लागला.. तिथे ही एकटाच पहायला जायचो, राहायला किंग्सर्कल.. चालत चालत सायनला जायचो, हम-तुम, मैंने प्यार क्यू किया, इक्बाल हे २००५चे सिनेमे मी तिथे पाहिले. मग दुबईत एकटा सिनेमा पाहायची वेळ अगदी १-२वेळाच आली, पण एकटा सिनेमा पहायची मजा आणि दुःख वेगळंच... सिनेमा चांगला असो नसो, थिएटर मध्ये बसायचा आनंद ...

नवीन वर्ष

नवीन वर्षात काय नवीन असणारे!  प्रत्येक दिवस नवीनच असतो ना!!  काय कौतुक राव ह्या नवं वर्षाचं,  पण बहुतेक सगळ्यांना नवं वर्षाची नवी रेजोलुयशनं चालू करायची असतात तर काहींना मागच्या वर्षी केलेली रेजल्युशनांना 'जान्दो' करत अजून काहीतरी तीर मारायचे असतात! कोणी डायरीचं पाहिलं पान, तर कोणी जिमचा दरवाजा उघडतो,  कोणी एखादं व्यसन बंद करतो तर कोणी 'जंकफूड' हे सर्व एक आठवड्या पासून एक महिन्यापर्यंत लोक्स टिकवतात,  मग फेब्रुवारी उगवतो, उत्साह हळू हळू मावळत जात असतो,  मे पर्यंत ७०% लोकांच्या नकळत ते सर्व 'रजोल्युशन'चे समीकरण साफ बदलले/विसरलेले असतात. मग नोव्हेम्बर येतो... मग "बघता बघता संपलं की रे वर्ष! कसल्ले सपासप जातात राव दिवस" असे संवाद सगळीकडून ऐकायला मिळतात. मग बारावा महिना उजाडतो मावळायला!  आणि मी असाच काहीसा स्टेटस अपडेट टाईप करतो. #सशुश्रीके | ३१ डिसेम्बर २०१५

फार्गो सीजन टू

Image
फार्गो सीजन टू फार्गो नावाचा एक इंग्रजी चित्रपट येऊन गेलाय, त्या चित्रपटावरच आधारित एक मालिकाही सुरु झाली, एक सर्वसाधारण माणूस परिस्थिती मुळे कसा अपराधी होतो ह्याची उत्तम मांडणी केली आहे, ब्लॅक कॉमेडी अप्रतिम! असो, त्याच मालिकेचा दुसरा सीजन आलाय ह्या वर्षी, मागच्याच आठवड्यात दहावा आणि शेवटचा एपिसोड पाहिला, कथानक आहे मिनेसोटा ह्या अमेरिकन भागातील दोन माफीयांच्या भांडणाचं, त्या भांडणात खूप व्यक्तीचित्र त्यांची कहाणी अगदी सखोलीने मांडली आहे. फार्गो सीजन 2 जास्त आवडला कारण 1979 चा अमेरिकन काळ ज्या पद्धतीने मांडलाय... तोडच नाही! त्यावेळचे कपडे, केशरचना, गाड्या, इमारती अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या पर्यंत सर्वच बाबतीत 1979! 👍 म्हणजेच 'आर्ट डिरेक्षन' बाबतीत फार्गो टीमला मी 10/10 देईन! ह्या सीजन मध्ये अजून एक जमेची बाजू म्हणजे 'सस्पेन्स', होय पहिल्या भागात ठेवलेला एक विषय मध्ये मध्ये उकरत थेट शेवटच्या भागात डोके काढतो! त्याच काळातली विविध गाणी वापरून अगदी उपयुक्त ठिकाणी त्यांचा वापर करून दिग्दर्शकानी उत्तम कामगिरी केली आहे, बारकाव्यांबद्दल सांगायचं झालं ...

उनाड

एका मित्राशी व्हाट्सएप्प वर चॅट करत होतो, सांगत होता गेले काही महिने जाम बिझी आहे, पण आज मात्र अक्खा दिवस 'उनाड'पणा केलाय, तेवढा मी लकी आहे! त्यानी 'उनाड' पणा केलाय, आता माझी जळ...

ड्रील्लिंग!

Image
माझा मित्र अभिजीत आलेला दुबईत, आम्ही गप्पा मारत होतो, आई पण आलेली तेव्हा दुबईत. माझी मुलगी अन्वया अगदी वर्षभरा एवढी लहान होती त्यामुळे तिच्यासाठी बेबी मॉनिटर ठेवलेला बेडरूम मध्ये. आई वेळेत झोपते आणि अभिजीत आल्यानी गप्पाटप्पा चालू त्यामुळे आई बेडरूम मध्ये जाऊन झोपली, अन्वया बायकोच्या (अमृताच्या) मांडीवर, मी आणि अभिजीत बाहेर हॉल मध्ये गप्पा मारत बसलेलो. साडे बारा वगैरे वाजले असतील, ड्रील्लिंग चा आवाज येऊ लागला, आणि चार पाच मिनिटानंतर मात्र डोक्यात जायला लागला आवाज, मी वैतागून बोललो कोण इतक्या रात्री ड्रिल करतंय ते पण दुबईत! मग उलगडा झाला की आई आत बेडरूम मध्ये झोपली आहे, ती घोरत आहे आणि बेबी मॉनिटर ऑन आहे आणि त्यामुळे ड्रील्लिंगसदृश आवाज येत आहे. हे समजल्यावर मी अभिजीत, अमृता इतके हसायला लागलो की अन्वयाची झोपमोड झाली! हे आठवून आठवून आत्ता पर्यंत ५-६ वेळा तरी तोंडावर हसू आलेलं असेल! #सशुश्रीके । २० डीसेम्बर २०१५ Traditional baby monitors , which are sometimes called baby alarms, operate on a radio system that is similar to a walkie-talkie. A basic baby monitor comes...