ड्रील्लिंग!

माझा मित्र अभिजीत आलेला दुबईत, आम्ही गप्पा मारत होतो, आई पण आलेली तेव्हा दुबईत. माझी मुलगी अन्वया अगदी वर्षभरा एवढी लहान होती त्यामुळे तिच्यासाठी बेबी मॉनिटर ठेवलेला बेडरूम मध्ये. आई वेळेत झोपते आणि अभिजीत आल्यानी गप्पाटप्पा चालू त्यामुळे आई बेडरूम मध्ये जाऊन झोपली, अन्वया बायकोच्या (अमृताच्या) मांडीवर, मी आणि अभिजीत बाहेर हॉल मध्ये गप्पा मारत बसलेलो.

साडे बारा वगैरे वाजले असतील, ड्रील्लिंग चा आवाज येऊ लागला, आणि चार पाच मिनिटानंतर मात्र डोक्यात जायला लागला आवाज, मी वैतागून बोललो कोण इतक्या रात्री ड्रिल करतंय ते पण दुबईत!

मग उलगडा झाला की आई आत बेडरूम मध्ये झोपली आहे, ती घोरत आहे आणि बेबी मॉनिटर ऑन आहे आणि त्यामुळे ड्रील्लिंगसदृश आवाज येत आहे.

हे समजल्यावर मी अभिजीत, अमृता इतके हसायला लागलो की अन्वयाची झोपमोड झाली!
हे आठवून आठवून आत्ता पर्यंत ५-६ वेळा तरी तोंडावर हसू आलेलं असेल!

#सशुश्रीके । २० डीसेम्बर २०१५






Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!