Posts

कहाण्या WW2 च्या

Image
• नाझींनी केलेल्या लाखो लोकांच्या अत्याचारा पैकी ही एक बाई ,  सुदैवाने वाचलेली, तिचे अनुभव आणि तिच्या मुलांकडून आणि मग नातवंडांकडून तिच्या बद्दल झालेले कौतुक खरच पाहण्यासारखं आहे! एके दिवशी आपल्या मुलाला तिने ही कहाणी सांगितली, 'मला सर्वात छान वाढदिवस भेट काय मिळाली असेल!?' मुलगा सांगत होता, काय असेल नेमकं... एखादा ड्रेस, अमुक तमुक. तर तिने हा किस्सा सांगितला... ती होलोकोस्टच्या एका कैंपात असताना तिची एक मैत्रण दिवसभर गायब होती, त्यावेळी एखादं ओळखीचं असणं म्हणजे फारच दुर्मिळ, आई वडील बहिणी भाऊ सगळे वेगळे झालेले असायचे, असो... दिवसभर गायब असलेल्या आपल्या मैत्रिणीबद्दल तिला काळजी वाटू लागली, आणि त्यावेळी कुठलीही व्यक्ती अशी गायब होणे म्हणजे 'मरणे' असाच अर्थ असायचा, पण ६च्या आसपास ती मैत्रीण भेटली, म्हणाली 'आज लेबर कॅम्प मध्ये जास्त काम केलं, आणि एक जास्तीचा ब्रेड मिळवला, तुझा वाढदिवस होता ना, तुला ब्रेड द्यायचा होता मला...' अस म्हणत तिने ब्रेड हातात दिला माझ्या. हे बघताना ऐकताना खड्डा पडला हो! लोकांना काय काय पाहावं करावं लागतं आयुष्यात, आपण खरच कि...

Prahaar: The Final Attack - 1991

Image
धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है... काय सुंदर गाणं, आणि जबरदस्त सिनेमा! पाहून नक्कीच डोळ्यातून पाणी आणणारा.. पीटर डिसोझा आणि मेजर चौहान! ह्या दोघांमधलं चित्रपटाच्या मध्यंतरा आधीचं नातं, गुरु-शिष्य, तणावाच्या प्रसंगातही हसवायला लावणारे ट्रेनिंग, त्यात काही न विसरण्या सारखे संभाषण... डूब भाई डूब, मध्येच प्रत्यक्ष अँटी-टेररिस्ट ऑपेरेशन मुळे पाय गमावणारा पीटर, आणि तेव्हाचा तो 'स्लो-मो' सीन! केवळ कमाल, मध्यंतरानंतचा मेजर चौहान... हतबल डिसोजा कुटुंब, स्थानिक गुंडांनी केलेला छळ, हे सर्व पाहून मूठ आवळली जाते नकळत! मला हे माहीत नव्हतं की खुद्द नाना पाटेकरने दिग्दर्शित केला आहे, हे कळल्यावर अजून एकदा पहावासा वाटतोय 'प्रहार' ... Prahaar: The Final Attack - 1991 #सशुश्रीके      धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है पलकों में यादों की डोली, भीतर खुशी हंस रही है ये खुशी तुम हो, तुम ही तुम मेरी जानम करू ऐतबार चेहरों के मेले में, चेहरे थे गुम एक चेहरा था मैं, एक चेहरा थे तुम जाने क्या, तुम ने दे दिया मुझ को जहां मिल गया होठों पर बा...

तो हरवलाय...

जाड भिंगाचा चश्मा, दोरीने डागडूजी करून गळ्यात अडकवलेला... पूर्ण पांढरे केस,२-३एमएम वाढलेली दाढी, ती पण पूर्ण पांढरी... मळलेला फूल बह्यांचा शर्ट, अखूड राखाडी प्यांट, समोरचे बहुतेक अर्धे दात गैरहजर, स्लीपर्स झीजून कागद झालेल्या, दुपारच्या भर उन्हात तो साठीतला जीव अजुन ही दिसतो, "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय" १०-१२ वर्ष झाली असतील... तेव्हा पासून बघतोय,  त्या दोन-तीन च्या भर उन्हात  "भंगार बाटलेय, भंगार बाटलेय" आमच्या घरी मी वीकेंडलाच सापडायचो, तेव्हा दुपारची आवरावरी व्हायची महिन्या दोन महिन्यातून,  मी आमच्या इथे येणाऱ्या चार पाच भंगारवाल्यांपैकी ह्या भंगारवाल्याचा आवाज नीट ओळखायचयो,  थांबवायचो... नको ते सामन बाजूला ठेवत,  आणि पाहिजे त्या सामानाचं वजन करत.. "२० रुपये होतात सह्येब..." तेवढ्यात आई यायची...  मग २० चे २५ व्हायचे. नंतर मी दुबइत गेलो,  आता वर्षातून एक-दोनदाच जमतं, पण तेव्हाही हा भंगारवाला दिसतोच! ३-४ वर्षांपूर्वी त्यानी आइला एक पत्र दिलेले, आइला सांगितलं की मी आलो की मला हे द...पेपर मध्ये पब्लिश करायला सांगा,  (त्यानी मला ८ वर्षांपुर्वी वि...

The Most Embarrassing Moment

The Most Embarrassing Moment का काय असतं त्यातलं एक... आई वर्षभर बाहेरगावी राहायला गेल्याने मी मिनल मावशी कडे राहिलो... आईची बालमैत्रिण, जाम कडक होती, पानात वाढलं ते खायचं, अमुक अमुक वेळ अभ्यास व्हाय...

👉 नॉस्टॅल'जीया' 👈

Image
मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड... जूना ऐशट्रे, जूने जुळे सॉल्टपेपर, जुन्या मधुबाला पासून जुन्या ऐर्नोल्डचे रैंडम जुने पोस्टर्स, जूना फिडोडीडो नी जुन्या चार्ली चैप्लिनचे जुने स्टीकर्स, ताज्या अंड्यांच्या जुन्या क्रेटची इमारत, बाजूला फ्रेश स्लाइस-पावांच्या लाद्यांचे डोंगर, काउंटर वरची जुनीच 'स्टील्ल'बेल्ल, कोपऱ्यातली नीळी कैडबरीची जुनी तिजोरी, जुन्या शोकेस मधला जूना हुक्का... जुन्या छतावरचे काचेचे चंबूयुक्त जुनेच प्राकाशलट्टू... 'आज नगद कल उधार' ह्याची पाटी नसलेले जुने दरवाजे, जुन्या खांद्यावर रुमाल आणि कपाळावर घाम असलेले जुने 'वेट'र्स... भेजा न खीमा न डबलफ्राययुक्त जूना पदार्थफलक, बऱ्यापैकी जुनी पांढरीजाड कपबशी, त्यात साय...

राजू भैया!

Image
काही लोकं कधीच विसरू शकणार. त्यातला एक म्हणजे... राजू भैया! युपी/बिहार वाला पिळदार मिश्या आणि भटजी शेंडी वाला, मे महिन्याच्या सुट्टीत आक्षीला जायचो तेव्हा दुपारी आणि संध्याकाळी ह्याच दर्शन व्हायचच, कधी घरातून, कधी अंगणातून, तर कधी थेट रस्त्यावर, मी जिथे असेन तिथून. तोडकं मोडकं मराठी बोलायचा, अमिताभला अजून ही येत नाही मराठी उच्चार नीट अगदी तसच. असो शेवटी युपी/बिहार वालाच! पिळदार मिश्या आणि भटजी शेंडी वाला, 'गोला ले लो गोला... गोळा शरबत गोलाsssss' घरी असलो की हातातला उद्योग टाकून रस्त्यावर धावत जायचो, आजी-आजोबा जाम रागवायचे.. घसा खराब होइल, आई रागवेल! पण मी कसला ऐकतोय!!! जीभ लाल काळी नीळी... माझा आवडता 'काला खट्टा' - दोनेक गोळे संपवल्या शिवाय जाऊ द्यायचो नाही त्याला! काही नतद्रष्ट कोळी पोरं खुप त्रास द्यायची बिचार्‍याला! उगाच गोळे खात एक्स्ट्रा सरबत वगैरे.. त्यावर सब्जा दे, बर्फ दे... मला खुप राग यायचा त्यांचा! पण काय करु शकलो नाही कधी, त्या भैयाला पैसे देऊन परत घरी यायचो! कधी नसले तर 'बाद मै दे दे ना याद से!' असं म्हणत मागेल ते द्यायचा अगदी प्र...

बिंदास चिखल!

आज भिजलो... माझ्या छकुली बरोबर भिजलो! हातात दोघांच्या छत्री होती... पायात दोघांच्या मस्ती होती तिच्या साठीचा 'मडी पडल'... माझ्यासाठी तोच तो पूर्वीचा चिखल नाच बाबा नाच करत होती ती... पण नाचायला लाजत होतो मी मग म्हणाली जम्प जम्प... आता मी मारली उडी केला दंगा मग काय केला मस्त बिंदास चिखल... तोच तो जुना... बिंदास चिखल! #सशुश्रीके । जुलै २०१६