Posts

The Americans, TV Series Review

Image
The Americans ह्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड 2013 मध्ये FX चॅनेलवर आला. १०पैकी ८.३ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी १३ भागांचे पाच सीझन झालेले आहेत. आता शेवटचा, सहावा सीझन मागच्याच महिन्यात सुरु झालेला आहे, गेल्या ५वर्षात ह्या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ती शीगेला जाऊन पोचली आहे. विश्वासावरचा अविश्वास आणि अविश्वासावरती विश्वास किव्वा जो आहे तो कशावरून तोच, जो तुम्हाला वाटत आहे? असं काही तरी अजब कोडं घेऊन ह्या मालिकेची सुरुवात होते. एका रशियन गुप्तहेराला पकडून त्याला 'किडनॅप' करायचे काम आटोपल्यावर कळते की त्याला पकडणारे स्वतः २ रशियन्स गुप्तहेर आहेत, नुसते रशियन्स नाहीत ते एक जोडपं आहे, १९६० मध्येच रशियन्स ने अश्या जोडप्यांना 'तयार' करायला सुरुवात केलेली, त्यापैकीच एक गुप्तहेर जोडपं म्हणजे 'फिलीप' आणि 'एलिझाबेथ', कथानकाचे २ प्रमुख नायक, त्यांची दोन मूलं आणि त्यांच्या शेजारीच राहणारा FBI एजेंट त्याचे कुटुंब ह्यांच्या आजूबाजूला ही सर्व मालिका रंगवण्यात आलेली आहे. फिलिपची ट्रॅव्हल अजेंसी आणि एलिझाबेथ 'हाऊस ...

आनंद गानू.

Image
जगातली सर्वात आवडती व्यक्ती कोण, असा कोणी प्रश्न विचारला तर नक्कीच डोळ्यासमोर काही चेहरे येतात, पहिला चेहरा असतो, नेहमी पहिला तो म्हणजे आनंद काका आनंद गानू.   कपाळावर गंध, कानात वाळा जंन्नत-ए-फिरदौस किंवा अशाच कुठल्यातरी अत्तराचा कापूस, कोपर्याच्या आणि मनगटाच्या मध्ये फोल्ड केलेला फुल शर्ट, पॅन्ट, हातात अंगठ्या, कोल्हापुरी किव्वा बाटा चप्पल असा साधा आमचा आनंद काका, आणि सतत हसतमुख 😊 म्हणजे आनंद काका ला कोणी पाहिलं तर तुमचा मूड कसा ही असो, तुमच्या चेहऱ्यावर नकळतच एक आनंद छटा उमलणारच, बर मी ही अतिशयोक्ती करत नाहीये, आनंद काका माहीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी लिहिलेल्या वर्णनाला १०१% पाठिंबा मिळणार हे नक्की! 👌 तर, असा हा बाबांचा मित्र पण, त्यांचं बालपण एकत्रच गेलं... ब्राम्हण वाडीत काका राहायचे जवळच्याच एका इमारतीत माझे वडील, अरुण-आनंद अशी जोडी. बाबांबद्दल खूप नवीन नवीन काय काय सांगायचा काका, हो.. माझ्या साठी नवीनच ना, तुझे बाबा गाड्या काय छान काढायचे, सरळ रेश तर पट्टीविना वगैरे, बाबा असे तसे, आणि मी पण हे सर्व ऐकून आपण किती नशीबवान आहोत, असे बाबा आणि काका...

सही कशाला हवी, सही माणसं हवीत!

Image
बोरीवलीत असतानाची गोष्ट, गोखले विद्यालयात होतो, ३/४ थीत असेन, शाळेत आम्हाला एक फॉर्म दिला, हेल्पेज इंडिया संबंधित, घरोघरी जायचं आणि पैसे गोळा करायचे, सगळ्यांनाच एक एक कागद दिलेला, नाव / पत्ता / सही आणि पुढे रक्कम वगैरे तक्ता असलेला कागद. मला तर खरं हे करायला आवडायचं नाही, पण प्रत्येकाला करणं भाग होतं, मी ओळखीच्या लोकांना आधी भेटायचो, मग घरी आलेल्या पाहुण्यांना, मग सोसायटीची अनोळखी दारं असं आठवडा भर तरी चाललं असेल, तो फॉर्म कधी एकदा पूर्ण भरतोय असं झालेलं. शेवटी आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पण गेलो, एका अनोळखी दरवाज्याची बेल वाजवली, एका आजोबांनी उघडला दरवाजा, मी त्यांना फॉर्म दाखवला, त्यांनी चष्मा नीट अड्जस्ट करून फॉर्म पाहिला, आणि हसत हसत ५ रुपयांची नोट दिली, मी त्यांना त्यांचं नाव वगैरे लिहायला सांगितलं, त्यांनी हातानेच नको नको केलं, म्हणाले तू तुझ्या नावाने देशील का? (किव्वा असच काही तरी बोलले, मला नक्की आठवत नाहीत त्यांचे शब्द) त्यांचा हात थरथरत होता, वयामुळे असेल... असो, मी काही बोललो नाही, फॉर्म वर त्यांचं नाव लिहिलं... त्यांची सही नाही मिळाली! तो दिवस आहे आणि आजचा, म...

मोठी गाडी, मोठा टीव्ही, मोठं घर

मित्राची जागा होती एका चाळीत, नाव आठवत नाही, शनिवार पेठ आणि घाटाच्या बरोबर मध्ये, चाललं तरी हालायचा मजला, जागा इतकी लहान की जेमतेम ३लोकांनी पाय पासरले तर लागतील एकमेकांना, यामुळे घरात सगळच लहान... लहान टीव्ही, लहान फ्रीज, लहान आरसा, लहान पंखा, पण मनं मोठी असतात ह्यांची, हसतमुख चेहरे दिसतात नेहमी, टेबलावर चहा बिस्किटे येतातच, काहीच नाही तर माठातल्या पाण्याचा भरलेला तांब्या! हे सगळं छान वाटतं! 👌 आणि आपण सगळ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो! मोठी गाडी मोठा टीव्ही मोठं घर 😏 #सशुश्रीके 

चाळीत राहावं एकदातरी! एक गुळगुळीत अनुभव 👌

Image
चाळीत.. गुळगुळीत असतं सगळं, म्हणजे सगळं कसं एक्सपेरियन्स असलेलं, चढताना उतरताना हात लागून लागून झालेले लाकडी कठडे, जीने, भिंतींचे कोपरे.. सगळं कसं गुळगुळीत... पावसात सोडून इतर वेळी असलेल्या जळमटंयुक्त खिडक्या, त्यातून डोकावणारी पिंपळाची पानं, ती ही त्याच माजल्यावरची... भिंतीतून जन्माला आलेली. पहिला मजला संपला न प्यासेज मध्ये शिरलं की 'दिल के टुकडे टुकडे...' वगैरे झालेल्या फारश्या, त्याची डागडुजी साठी वापरलेलं ठिसूळ सिमेंट, कोणाची तरी वाट पहिल्यासारखी वाटणारी एक म्हातारी, अजून पुढे गेलं की २-३ आजोबा, त्यांच्या हातात पेपर... आणि कोणी ऐको न ऐको, एकमेकांकडे न बघता चाललेली बडबड, अजून जरासं पुढे गेलं की कानावर नकळत राज्य करणारी आकाशवाणी, दरवाज्यातून डोकावणारी मुलं, फिस्कटलेल्या रांगोळ्या, वाळत घातलेले पण वाऱ्याने पडलेले कपडे... हे सगळं रोज पाहायचो! परत एक मजला चढायचो, हो... २मजली होती आमची ब्राह्मण वाडी, परत वरच्या लिहिलेल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात दिसायच्या, घडायच्या... एका बंद दरवाज्या पाशी येऊन मी थांबायचो, लगतच्याच उघड्या...

खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी... ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका. (Series Review)

Image
खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका.   खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे #NARCOS मलिका. अमेरिकेत गुन्हेगार साक्षीदाराला गायब करतो, कोलम्बियात 'पाब्लो' ने कोर्टच गायब केलं! - 'स्टीव्ह मर्फी.' आता हा पाब्लो कोण न हा स्टीव्ह कोण! सांगतो सांगतो... तर हा पाब्लो आहे ना तो खलनायक आहे मालिकेचा, मालिकाचे नाव आहे 'नार्कोस'... (अमली पदार्थांची निर्मिती/तस्करी करणारे ते 'नार्कोस') त्या पाब्लोच्या मागे लागलेला पोलीस म्हणजे स्टीव्ह आणि त्याचा सहकारी पण आहे एक हावी नावाचा, दोघे DEA agent . दोघे मिळून त्या पाब्लोला पकडायला जे शक्य असेल ते सर्व करत असतात, अगदी शेवट पर्यंत! असं सगळं आहे बघा, म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार ह्यामधली झकाझकी, पण ह्यात वेगळं काय असा प्रश्न पडला असेल! तर वेगळेपण असय की ही कथा सत्य कथेवर आधारित आहे, जवळपास ५ ते १०% भाग रेकॉर्डेड चित्रफितींचा वापर करून सादर केलेला आहे, फारच डोकेबाज पद्धतीने तेव्हाच्या बातम्या आणि काही खाजगी चित्रफीती वापर करून वास्तविकता अजून प्रभावीपणे दाखवण्...

#XYZ आणि कॉलेजचे दिवस...

Image
       आमच्या कॉलेज मध्ये एक एक नग भरले होते त्यातला एक होता नाव त्याचं #XYZ, काय डेंजर होता हा! म्हणजे... आमच्या मधला असून ही एखाद्या मास्तरा सारखा दिसणारा, पोलिशी कपडे म्हणजे खाकी पॅन्ट काळे बूट, चेहऱ्यावर १/२छोटे वार, गहू वर्णीय ... नाना पाटेकर चा लांबचा नातेवाईक म्हणा हवं तर! 'बघ ह्याची कशी घेतो' असं हसत म्हणणारा, दुसर्या क्षणात गंभीर चेहर्याने ज्याची घ्यायची आहे त्याला हाक मारणारा! की मग चालू...        एक किस्सा सांगतोच त्याचा - भूक लागली पण खिश्याला कोण विचारतय, पोरांकडे पैसे नसायचे (कोणाकडे ही नाहीयेत, हे हॉटेलात शिरल्यावर कळायचं) पण हॉटेलात जाऊन खायला मात्र हवं! हे कळल्यावर XYZ सांगायचा 'बिंदास जेवा, मी भरतो बिल' ... बिल टेबलावर येण्याआधीच कैशीयर कडे जाऊन पैसे मागायचा! कैशीयर म्हणायचा 'इतके इतके झाले पैसे.' त्यावर XYZ गंभीर आणि दाणेदार आवाजात सांगे '५००ची नोट दिली की... वरचे सुट्टे कोण देणार!?' हे सगळं वरच्या आवाजात असला कॉन्फिडेंटली बोलायचा की बास रे बास! उलट आम्हाला खायला घालून ह्याला पैसे...