उनाड
एका मित्राशी व्हाट्सएप्प वर चॅट करत होतो,
सांगत होता गेले काही महिने जाम बिझी आहे,
पण आज मात्र अक्खा दिवस 'उनाड'पणा केलाय,
तेवढा मी लकी आहे!
त्यानी 'उनाड' पणा केलाय,
आता माझी जळजळ!
क्षणात आयुष्यभरातले काही 'उनाड'क्षण
वहीची पानं अंगठ्यानी सोडल्या सारखे सपासप सुटले,
अश्या ह्या उनाड पानांच्या वह्या...
काहींच्या बोटांनी मोजता येतील इतक्याच
तर काहींच्या शंभर पानी काहींच्या दोनशे!
काहींच्या तीनशे पानी!!
ही त्यांचीच कहाणी..
अशी पानं आयुष्यात लहानपणी जास्त येतात,
मग तेव्हा त्या पानांची होते रद्दी,
आणि कालांतराने वय, जावाबदारी जस जशी वाढत जाते,
तस तशी विकत घ्यावी लागते तीच रद्दी.
मे महिना, दिवाळी, गणपती,
कधी विकेन्डला चिकटलेल्या सुट्ट्या,
कधी कंटाळा आलाय म्हणून मारलेली दांडी,
कधी एखादी व्यक्ती खूप वर्षांनी भेटली की येणारा आठवणींचा पूर,
त्यात गप्पाटप्पा, खाओ पियो, ऐश, मजा...
कधी मंदिराची पायरी कधी किल्ल्याचा बुरुज,
कधी वन-टू वन-टू कधी टांगा कधी सायकल कधी टमटम कधी बस,
कधी एकटाच असला की फुल्ल,
कोणी सोबतीला असला की वन बाय टू,
कधी जुना वाडा कधी घरीच वेडा,
कधी दूर तर कधी शेजाऱ्यांच्यातच हरवलेला!
आपल्या विश्वात रंगलेला,
तो 'उनाड' दिवस!...
करता येईल का हो काही जुगाड!?
अहो करता येईल का हो काही जुगाड!?
कारण 'उनाड' दिवसाचे करता येत नाही हो 'रिजर्वशन',
तो भेटतो चोरून कुठेही केव्हाही ठरलेलं नसतं 'डेस्टीनशन'
आता घ्यावी लागते ना प्रत्येक गोष्टीची 'परमिशन'
प्रत्येक गोष्टी खाली असते 'कंडिशन'
#सशूश्रीके | २६ डिसेम्बर २०१५
Mast...
ReplyDelete