फार्गो सीजन टू

फार्गो सीजन टू



फार्गो नावाचा एक इंग्रजी चित्रपट येऊन गेलाय, त्या चित्रपटावरच आधारित एक मालिकाही सुरु झाली, एक सर्वसाधारण माणूस परिस्थिती मुळे कसा अपराधी होतो ह्याची उत्तम मांडणी केली आहे, ब्लॅक कॉमेडी अप्रतिम!

असो, त्याच मालिकेचा दुसरा सीजन आलाय ह्या वर्षी, मागच्याच आठवड्यात दहावा आणि शेवटचा एपिसोड पाहिला, कथानक आहे मिनेसोटा ह्या अमेरिकन भागातील दोन माफीयांच्या भांडणाचं, त्या भांडणात खूप व्यक्तीचित्र त्यांची कहाणी अगदी सखोलीने मांडली आहे.

फार्गो सीजन 2 जास्त आवडला कारण 1979 चा अमेरिकन काळ ज्या पद्धतीने मांडलाय... तोडच नाही! त्यावेळचे कपडे, केशरचना, गाड्या, इमारती अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या पर्यंत सर्वच बाबतीत 1979! 👍 म्हणजेच 'आर्ट डिरेक्षन' बाबतीत फार्गो टीमला मी 10/10 देईन!

ह्या सीजन मध्ये अजून एक जमेची बाजू म्हणजे 'सस्पेन्स', होय पहिल्या भागात ठेवलेला एक विषय मध्ये मध्ये उकरत थेट शेवटच्या भागात डोके काढतो!

त्याच काळातली विविध गाणी वापरून अगदी उपयुक्त ठिकाणी त्यांचा वापर करून दिग्दर्शकानी उत्तम कामगिरी केली आहे, बारकाव्यांबद्दल सांगायचं झालं तर एखाद्या सुपरमार्केट चा प्रसंग असेल तर त्या वेळचे सर्व प्रोडक्टस जसे आहेत तसे दाखवले आहेत! कुठेच 'शंका' येत नाही, एवढच काय तर एकही व्यक्ती/प्रसंग 'उगाच' आहे असे वाटत नाही!

चित्रपट दीड ते दोन तासाचा असतो त्यामुळे दोन मिनिटे जरी कथानक सोडून काही प्रसंग असल्यास आपल्याला तो खटकतो, पण तब्बल साठ मिनिटांचा एक एपिसोड - असे दहा एपिसोड असून सुद्धा एक अन एक मिनिट पूर्ण घट्ट शाईच्या ठिपक्या प्रमाणे ठळक वाटतो!

ह्या सर्व गोष्टींमुळे हल्ली मला इंग्रजी चित्रपटांपेक्षा मालिका पाहण्यात जास्त रस निर्माण झाला आहे!

फार्गो / ब्रेकिंग बॅड / द ब्रिज / द किल्लींग्स सारख्या मालिका असाव्यात नाही तर नसाव्यात!

अजून एक सांगायचं राहिलं, मालिकेच्या सुरुवातीला दर वेळी, 'ही सत्य कथा आहे आणि ह्यातली सर्व पात्रे खरी आहेत, पण त्यांच्या सांगण्या वरून आम्ही नावे बदलून कथा मांडत आहोत' असा मजकूर दाखवतात. हे बघून मी जरा 'गूगल' केले तर कळाले की ही सत्य घटना वगैरे नसून एका कादंबरी वर आधारित आहे. तरीही मालिका बघताना त्या 'युक्ती' चा वापर छान होतो, तुमच्या डोक्यात कुठे ना कुठे तरी तो 'ट्रूस्टोरी'चा खोटा का होईना समज राहतो, आणि कथानक अजून रोमांचित वाटायला मदत होते!

बघाच फार्गो सिरीज! 4स्टार्स फ्रॉम मी 👍👌

#सशूश्रीके | २६ डिसेम्बर २०१५

Comments

  1. arre tu shevti nantar ya the bridge (http://www.imdb.com/title/tt2406376/) baddal boltoyes ka? karan ajun ek the bridge navachi serial aahe. Kalawe

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...