नवीन वर्ष
नवीन वर्षात काय नवीन असणारे!
प्रत्येक दिवस नवीनच असतो ना!!
काय कौतुक राव ह्या नवं वर्षाचं,
पण बहुतेक सगळ्यांना नवं वर्षाची नवी रेजोलुयशनं चालू करायची असतात तर काहींना मागच्या वर्षी केलेली रेजल्युशनांना 'जान्दो' करत अजून काहीतरी तीर मारायचे असतात!
कोणी डायरीचं पाहिलं पान, तर कोणी जिमचा दरवाजा उघडतो,
कोणी एखादं व्यसन बंद करतो तर कोणी 'जंकफूड'
हे सर्व एक आठवड्या पासून एक महिन्यापर्यंत लोक्स टिकवतात,
मग फेब्रुवारी उगवतो, उत्साह हळू हळू मावळत जात असतो,
मे पर्यंत ७०% लोकांच्या नकळत ते सर्व 'रजोल्युशन'चे समीकरण साफ बदलले/विसरलेले असतात.
मग नोव्हेम्बर येतो... मग "बघता बघता संपलं की रे वर्ष! कसल्ले सपासप जातात राव दिवस"
असे संवाद सगळीकडून ऐकायला मिळतात.
मग बारावा महिना उजाडतो मावळायला!
आणि मी असाच काहीसा स्टेटस अपडेट टाईप करतो.
#सशुश्रीके | ३१ डिसेम्बर २०१५
Comments
Post a Comment