।। प्रश्नावली ।।
बाबा बाबा दमलास का?
बाबा बाबा दमलास का?
ऑफिसच्या कामांनी थकलास का?
जरा मोबाईल बाजूला ठेवतोस का?
मग टीव्ही समोर असा बसतोस का?
माझ्याशी जरा खेळतोस का?
खेळणी जरा मांडतोस का?
पत्त्यांचा बंगला करतोस का?
गाड्यांची रांग मांडतोस का?
घोडा घोडा करतोस का?
बेडरूम मध्ये पिलो फाईट करायची का?
की सायकल घेऊन मला बाहेर नेतोस का?
तुला भूक लागली का?
खोटे जेवण देऊ का?
का... का तू गप्प का?
माझाशी तू खेळ ना...
माझाशी तू कट्टी का?
मग मी पण तुझाशी कट्टी जा...
पाय आपटले जोरात,
केला दंगा तोऱ्यात,
भोकाड पसरलं, तेवढ्यात...!
आतून आवाज आला...
'रेडी आहे वरण भात!'
जेवण जेवण करतंय कोण?
भरवायला बाबाला सांगतंय कोण?
माझ्याकडे बोट दाखवतंय कोण?
अन्वया आमची आणि कोण!
एक घास आजीचा, एक आबांचा
एक काका अन एक मावशीचा...
'भात संपतोय का नाय!?...
की बोलावू आता पोलिसांना??'
नको नको म्हणते रडत रडत...
संपवते घास हसून परत!
आता जो जो करायची का?
उद्या सकाळी शाळेत जायचं ना?
बिग येलो बस येईल ना!?
तुला न घेताच जाईल ना!
बापरे बापरे नको नको...
चला ब्रश करू, करू झोपायची तयारी!
आई आई 'अस्यसी बुधकौशिक...'म्हण!
आणि बाबा बाबा तू पाय चेप!
येलो लाईट इज ओंन नाव!
वी आर गोइंग टू स्लीप नाव...
स्लीप इज कमिंग धीरे... धीरे...
आईच्या हातात तिचा हात रे.
डोळे मिटले अन्वयाचे,
तसा लागला बाबा लिहायला,
उठणार नाही वेळेत आता,
म्हणेल उशीर झाला झोपायला!
सकाळी आता हेच ऐकणार..
"बाबा बाबा दमालास का?
बाबा बाबा दमालास का?"
चल उठ लवकर उशीर होईल...
मग बॉस तुला करेल 'व्वा!'
ऑफिसातनं संध्याकाळी लवकर ये...
येताना मला 'गंमत' घेऊन ये :)
बाबा बाबा 'गंमत' आणलीस का...
बाबा 'गंमत' विसरलास का!?
बाबा बाबा दमलास का?
बाबा बाबा दमलास का?
#सशुश्रीके । १८ एप्रिल २०१६
💕
ReplyDelete