"चख ले ये मुरब्बा"



"चख ले ये मुरब्बा"
हे गाणं आणि अमित त्रिवेदी हा खरच एक 'मुरब्बा' आहे 👍👌

आज शफल वर गाणी ऐकत होतो, आणि मुरब्बाचं डूएट व्हर्जन लागलं, लयबद्ध... टीपटाप... सहज... साथीला व्हाओलीन... इलेक्ट्रॉनिक गिटार... बेस गिटार... स्मूद ज्याझ्झ... अमितचा स्वतः चा आवाज... कविता सेठ चा गोड'खारा' आवाज... अँड आइस ओंन केक म्हणजे स्वानंद किरकिरे साहेबांचे शब्द.

अमिताभ स्लो मोशन मध्ये त्याच्या 'फॅन' नी आणलेला 'मुरब्बा' चाखतो! काय मस्तय सीन तो, हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा परत एकदा ऐकावच लागतं, कधी कधी तीनदा कधी चारदा.

आत्ता ह्या लेखा निमित्त ५व्यांदा ऐकतोय

ले...चख ले मुरब्बा
किसी का संजोया हुआ तुझ तक आया है
ले... चख ले ये मुरब्बा
किसी का कदरदारियों का सरमाया है ये
दिल मै रख ले रख ले ये... मुरब्बा

ह्या कडव्या नंतर जो काय सोलो गिटार पीस आहे!
बास रे बस!!! (2:32-2:47)

ह्याच अलबम मधल्या बाकीच्या गाण्यांमध्ये अजून वक गाणं पण मस्तय, 'अक्कड बक्कड' गायलंय मोहित चौहाननी... अक्कड बक्कड बंबे बो, एस्सी नब्बे पुरे सौ...
सौ सौ बरस का हुआ, ये खिलाडी ना बुढा हुआ. 😊
रेव्हकिस्से तो बडे औसम औसम... यहां सुख दुख के सारे मौसम मौसम... असे हलके फुलके शब्द आणि चटपटीत संगीत.

काय जमलंय अमितला, त्याचे इतर चित्रपट संगीतही खूप 'हटके' आहे.

★ उडान - डिप्रेशन आल्यास लगेच ही गाणी ऐकायची
★ आयेशा - ह्यातलं 'शाम' गाणं, कोणी चुकवू नये असा काही माहौल तयार केलात साहेबांनी ह्यात, स्वतः गायले ही आहे!
★ लुटेरा - आर.डी.बर्मन ची गाडी आहे आणि आणि त्यात अमित त्रिवेदी ड्रायव्हर आहे, आणि तुम्ही बॅक सीट वर आरामात बसला आहात असा 'फील' आहे.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...